आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
सारा अल-अमीरी : अरब देशाच्या मिशन मंगल चे नेतृत्व करणारी पहिली महिला

महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्यास खांदा लाऊन काम करत आहेत. मग ते शिक्षण ,राजनीती, असो किंवा अंतराळ क्षेत्र असो. आपण कल्पना चावला पासून सुनिता विलियम्स बद्दल ऐकलेच असेल. परंतु आज आपण जाणून घेणार आहोत सारा अल अमीरी या महिला शास्त्रज्ञांबद्दल ज्यांना संयुक्त अरब अमिरात सारख्या मुस्लीम आणि पुरुष प्रधान देशाने आपल्या पहिल्या मिशन मंगल साठी प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. कोण आहे हि महिला जाणून घेऊया या लेखातून….
सारा बिंट यूसिफ अल अमीरी ह्या संयुक्त अरब अमीरातच्या वैज्ञानिकांच्या अध्यक्षा आणि अमीरात मंगळ मोहिमेच्या उप प्रकल्प व्यवस्थापक आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्रिमंडळात त्या प्रगत विज्ञान राज्यमंत्री आहेत. अमीरी यांनी शारजाच्या अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले आहे. येथूनच अमीरी यांनी पदवी मिळविली.
सारा अल-अमीरी यांना एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये नेहमीच रस होता परंतु संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्या वेळी कोणतेही अंतराळ प्रोजेक्ट होत नव्हते. अमीरीने आपल्या करिअरची सुरूवात (Emirates Institution for Advanced Science and Technology) येथे केली होती. जिथे अमीरी यांनी दुबईसॅट -१ आणि दुबईसॅट -२ या प्रोजेक्टवरही काम केले.

दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये वरिष्ठ भूमिका घेण्यापूर्वी आमीरी युएईच्या हवामान बदल आणि पर्यावरण मंत्रालयात कार्यरत होत्या. २०१६ मध्ये मध्ये त्यांना अमीरात विज्ञान परिषदेच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले होते.
आज ती एमिरेट्स मार्स मिशन, होपची विज्ञान प्रमुख आहे. कोलोरॅडो बोल्डर, कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले आणि रिझोना स्टेट युनिव्हर्सिटी यांचा या अभियानात महत्वाचा हिस्सा आहे.
नोव्हेंबर २०१७ मध्ये लुईझियानामध्ये होप मार्स मिशनबद्दल आंतरराष्ट्रीय टीईडी कार्यक्रमात बोलणारी तीपहिली एमिराती महिला ठरली आहे.
ऑक्टोबर २०१७ मध्ये अमीरी यांना संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्रिमंडळात प्रगत विज्ञान राज्यमंत्री म्हणून नियुक्त केले गेले. जागतिक वैज्ञानिक सहकार्य वाढविण्याच्या प्रयत्नात, अल अमीरी यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये अनेक
अमेरिकन वैज्ञानिक संस्थांचा दौरा केला.
जगातील अनेक देशांप्रमाणेच संयुक्त अरब अमिराती आता मंगल ग्रहावर अंतराळ यान पाठविण्याचा विचार करीत आहे. संयुक्त अरब आपल्या पहिल्या अंतर्देशीय अभियानाची लगाम एका महिलेच्या हातात देत आहे हि कमालीची बाब आहे. या अभियानाची जबाबदारी सांभाळणारी वैज्ञानिक सारा अल-अमीरी म्हणाली की या अभियानासाठी तयार होण्यासाठी त्यांना सहा वर्षांचा कालावधी लागला आहे.

युएईच्या प्रगत तंत्रज्ञानाचे राज्यमंत्री असलेली सारा अल-अमीरी यांनी चिंताग्रस्तता व्यक्त केली आणि सांगितले की
त्यांच्या टीमने सहा वर्षाहून अधिक काळ या मोहिमेसाठी गुंतवणूक केली आहे. मुख्यतः रेड प्लॅनेटविषयी अधिक जाणून घेण्याचे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.
या मोहिमेद्वारे हवामानाचा बारकाईने अभ्यास करून मंगळातील नापीक, धूसर वातावरणामागील कारण शोधून काढता येईल. एकेकाळी रेड प्लॅनेटमध्ये पृथ्वीसारखेच महासागर होते. ज्यामुळे कोरड्या व धूळयुक्त ग्रहाचे रूपांतर झाल. हे कोडे सोडविणे अद्याप एक रहस्य बनलेले आहे. एका मुलाखतीत अमीरी म्हणतात की; विश्वाची विशालता आणि अंतराळातील गुंतागुंत नेहमीच तिला उत्साही आणि मंत्रमुग्ध करते, ज्यामुळे तिची उत्सुकता वाढतच राहते.

मिशन मंगळ यूएईसाठी एक प्रचंड महत्वाचेआहे. अरब ने आतापर्यंत फक्त पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह सोडले आहेत. त्यांनी होप किंवा अरबी भाषेत “अल-अमल” नावाचे त्यांचे स्वदेशी अंतराळ यान अमेरिकन वैज्ञानिकांच्या मदतीने तयार केले गेले आहे.होप हे अंतराळ यान जपानी रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित होईल.
त्याला रेड प्लॅनेटला पोहोचण्यासाठी साधारण सात महिण्याचा वेळ लागण्याची शक्यता आहे. हे अंतराळयान जपानच्या दुर्गम तनेगाशिमा अवकाश केंद्रातून १५जुलै, 12:51:27 सकाळी (युएई ची स्थानिक वेळ) प्रक्षेपित करण्यात येणार होते. परंतु प्रतिकूल हवामानामुळे या अभियानाला पुढे ढकलण्यात आले आहे.
सारा अल-अमीरी यांचे हे मिशन जर सफल झाले तर त्यांचे नाव अंतराळ क्षेत्रातील अनेक दिग्गज शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये समाविष्ठ होईल आणि हि अरब साठी नक्कीच सन्मानाची बाब असेल.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा : इंडियाज ड्रोन सायन्टिस्ट एन.एम. प्रताप.