आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
मानावांप्रमानेच शहरे पण नाशवंत असतात. एका ठराविक वेळी त्यांचा (जन्म ) उदय होतो, त्यांचा भरभराट होतो, आणि कालांतराने त्यांचा ऱ्हास होतो. इतिहासामध्ये अशी अनेक शहरे आहेत जी नष्ट केली गेली आहेत, नष्ट झाली आहेत, बुडाली आहेत किंवा त्यांचा त्याग करण्यात आला आहे.
या अनाकलनीय हरवलेल्या शहरांनी जगभरातील कोट्यावधी प्रवासी आणि, इतिहासकार , आणि खजाना शोधणाऱ्या लोकांच्या कल्पनांना उधान आणले आहे. पूर्वीच्या सभ्यातांच्या बद्दल जाणून घेण्याबद्दल आपण उत्सुक असाल तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, भारतातील अशीच हरवलेली शहरे. चला तर जाणून घेऊया या रोचक शहरांबद्दल या लेखामधून……
१ ) पोम्पुहार (Poompuhar) Tamil Nadu.

पोम्पुहार हे दक्षिण भारताच्या तामिळनाडू राज्यातील मायलादुथुराई जिल्ह्यातील एक शहर आहे. कधिएकेकाळी कावेरूपोम्पाटिनम म्हणून ओळखल्या जाणारे एक भरभराट प्राचीन बंदर शहर पोम्पुहार हे शहर सुरुवातीस काही वर्षे चोला राजांची राजधानी होते.
संगम-युगातील तमिळ महाकाव्य, सिलापथिकरम आणि मनिमेकालाई हे पोम्पुहार शहर आणि तेथील लोकांच्या जीवन शैलीचे तपशीलवार वर्णन करतात. कावेरी नदीच्या किनारावर वसलेले हे शहर बहुतेक समुद्राच्या वादळाने इ.स. ५०० च्या सुमारास वाहून गेले होते. २००६ मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने पाण्याच्या पृष्ठभागाखाली सर्वेक्षण केले ज्याद्वारे या प्राचीन शहराचे पाण्यात बुडलेले अवशेष उघडकीस आले.
पोम्पुहार यथे १३ व्या शतकातील मासिलामानी नाथर कोइल मंदिर आहे. या मंदिरावर समुद्राच्या लाटांनी बरेच नुकसान झाले आहे परंतु , हे समुद्र किनाऱ्यावरील मंदिर आजही चीनी आणि तमिळ वास्तुकलेचे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन आपल्या समोर करते.
२ ) हम्पी ( Hampi) karnatak.

इ.स.पू. १३३६ ते १५६५ या काळात विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपी वर संगमा, सलुवा, तुलुवा आणि अरविडू या चार राजवंशांनी राज्य केले. या राजघराण्यातील राज्यांनी 500 हून अधिक स्मारके बांधली ज्यांनी त्या कालीन लोकांची मने जिंकून घेतली होती. युनेस्कोचे जागतिक वारसा स्तळ आहे.
कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यात असलेले हे ठिकाण आजच्या वेळी हिंदू धर्माचे पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे. हम्पीची सुंदरता हि, शक्तिशाली तुंगभद्रा नदी, ताडाचे झाडच झाड, केळींच्या बागा, आणि शेतात दूर दूरपर्यंत पसरलेले भाताचे शेत हि आहे. १४ व्या शतकात हम्पी हे विजयनगर साम्राजाची राजधानी होती.
येथे उरोपियान आणी पर्शियन पर्यटकांनी फार मोठा इतिहास ठेवला आहे. पर्यटकांनी ठेवलेला इतिहास, विशेषत: पोर्तुगीज म्हणत होते की तुंगभद्रा नदीजवळ हंपी हे समृद्ध, श्रीमंत आणि भव्य शहर होते. तेथे असंख्य मंदिरे,शेत आणि व्यापार बाजार होते. इ.स. १५०० पर्यंत हम्पी- विजयनगर हे बिजीन्ग्नंतर चे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर होते. आणि भारतातील त्या काळाचे सर्वात श्रीमंत शहर होते.
पर्शियन आणि पोर्तुगीज व्यापारी सुद्धा या शहराकडे आकर्षित झाले होते. विजयनगर साम्राज्य हे मुस्लीम राय्कार्त्यांच्या युतीमुळे पराभूत झाले होते. १५६५ मध्ये मुस्लिमांनी हम्पी शहर जिंकले आणि उद्वस्त करून टाकले. विजया उत्सव म्हणून ओळखला जाणारा हम्पी उत्सव हा कर्नाटक सरकारकडून दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित केल्या जातो.
जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात विठ्ठा मंदिरात पुरंदरदास आराधनाचा उत्सव प्रसिद्ध आहे. कवी-संगीतकार पुरंदरदास यांच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा केला जातो.
३ ) मुझिरीस (muziris) kerala.

इ.स.पू. पहिल्या शतकात, केरळमधील मुझिरीस हे भारतातील सर्वात महत्वाचे व्यापारी शहर होते. ते एक प्रमुख बंदर होते ज्याद्वारे अनेक मालांची निर्यात होत असे. रोमन लेखक प्लिनी यांनी ‘नेचुरल हिस्ट्री’ या पुस्तकात मुझिरिसला “भारताचे पहिले एम्पोरियम” म्हटले होते.
त्या कालीन प्राचीन काव्यासंग्रहांच्या नुसार केरळच्या पेरियार नदीवर सुंदर वाहने, परदेशी व्यापारी येथे सोने घेऊन येत आणि येथून काळी मिरी घेऊन वापस जात. केरळच्या कोडुंगल्लूर शहरात छोट्या छोट्या इमारतींमुळे प्रसिध्द असलेला मिझीरीस हेरीटेज प्रोजेक्ट हा भारतातील सर्वात मोठा पुरातत्व प्रकल्प आहे.
पट्टानम उत्खनन या नावानेही ओळखल्या जाणार्या या प्रकल्पाला मसाल्याच्या मार्गावर एक भरभराटीचे व्यापार बंदर होते याचा पुरावा सापडला आहे. यामध्ये अनेक स्मारके आणि धार्मिक स्थळे देखील आढळली जी प्राचीन काळापासूनची आहेत.
मुझिरीसचे ऐतिहासिक आणी सांस्कृतिक महत्व परत स्थापित करण्यासाठी, केरळ सरकारच्या पर्यटक विभागाने एक पर्यटन प्रकल्प सुरु केला आहे.
या प्रकल्पाची कल्पना केरळ परिषदेच्या ऐतिहासिक संशोधनातर्फे पट्टानम येथे झालेल्या मोठ्या उत्खनना आणि शोधानंतर झाली. या प्रकल्पात मध्य केरळमधील इतर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि महत्वाची स्थळे आहेत. मुझिरीस हेरिटेज प्रकल्पाचा एक भाग म्हणून १६ व्या शतकातील किल्ला असलेल्या कोट्टापुरम जवळील जागेचे खोदकामही मे २०१० पासून सुरु केले गेले.
४ ) लोथल ( Lothal) Gujarat.

सिंधू संस्कृतीचे एक महत्त्वपूर्ण आणि भरभराट व्यापार केंद्र लोथल हे जगातील सर्वात प्राचीन डॉकयार्ड होते. पूर्व पश्चिम ३७ मीटर आणि उत्तर दक्षिण २२ मीटर अंतरावर पसरलेले हे डॉकयार्ड साबरमती नदीच्या प्राचीन मार्गशी जोडलेले होते. हे शहर सिंधमधील हडप्पा शहर आणि सौराष्ट्र द्वीपकल्प यांच्यातील व्यापार मार्ग होता.
त्या काळी आजचा आसपासचा कच्छ वाळवंट हा अरबी समुद्राचा एक भाग होता. सिंधू संस्कृतीतील भारतातील सर्वात महत्त्वाच्या पुरातत्व स्थळांपैकी एक, लोथलचा शोध १९५४ मध्ये लागला होता आणि भारतीय पुरातत्व संस्थेने (एएसआय) १९५५ ते १९६० या काळात येथे खोदकाम झाले होते.
५ ) पट्टादकल (Pattadakkal)Karnataka.

नागारा आणि द्रविड वास्तुशिल्पाच्या संयोजनाने कर्नाटकमधील पट्टडकल, चालुक्य राजवंशाच्या अंतर्गत विकसित झालेल्या कलात्मक शैलीच्या उच्च बिंदूचे वर्णन करतात. मलाप्रभा नदीच्या काठी वसलेल्या या युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळामध्ये आठव्या शतकातील अनेक शिवमंदिर आणि जैन अभयारण्य आहे.
या समुहातील एक उत्कृष्ट नमुना म्हणजे विरुपक्ष मंदिर, कांचीच्या पल्लव राजांवर पतीच्या विजयाच्या स्मरणार्थ राणी लोकमहादेवींनी बांधले होते.कर्नाटक सरकार दरवर्षी विरुपक्ष मंदिर उत्सव , मल्लिकार्जुन मंदिर उत्सव आणि चालुक्य उत्सव (तीन दिवसांचा नृत्य महोत्सव) आयोजित करते.
हे आहेत भारतातील काही प्रमुख पुरातन शहरे ज्यांचा शोध लावल्या गेला आहे. आपल्याला हि माहिती जरूर आवडली असेल.अशाच नवनवीन आणि रोचन माहितीसाठी वाचत राहा युवाकट्टा वरील लेख..
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा : ज्वालामुखीतून निघतोय चक्क निळ्या रंगाचा लावा .!