आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

फिरायला जाण्यसाठी हि ६ ठिकाणे आहेत उत्तम पर्याय…!

 

लॉकडाऊननंतर फिरायला जाण्यासाठी हि 6 ठिकाणे आहेत उत्तम पर्याय…! तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अश्या ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जेथे फिरन्यास जाण्यासाठी तुम्हाला नक्कीच आवडेल.

 

new google

जर तुम्ही सुद्धा लॉकडाऊन नंतर फिरायला जाण्याचा प्लॅन तयार करत असाल तर या ठिकाणांचा विचार नक्कीच करा. येथे तुम्ही बेफिकीर होऊन नक्कीच फिरण्याचा आनंद घ्याल…

 

ठिकाण

 

लैंडोर, उत्तरप्रदेश :

 

उत्तरप्रदेशमधील लैंडोर मसूरी पासून अवघ्या 6 किमी वर वसलेलं आहे. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी फिरन्यास जाण्यापेक्षा या ठिकाणी तुम्ही तुमची सुट्टी आनंदात घालवाल. येथे खाण्या-पिण्यापासून ते राहण्याच्या सोयी अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहेत.

 

म्हणजे बजेट मध्ये फिरायचं असल्यास तुम्ही या ठिकाणाचा विचार नक्कीच करू शकता. याठिकाणी किरायाने गाडी घेऊन आजूबाजूच्या एरियात फिरण्याची अलग मजा आहे. ती अनुभवायला एकदा अवश्य इथे भेट द्या.

 

तवांग, अरुणाचलप्रदेश:

पहाडीवर असलेल्या अत्यंत सुंदर आणि मोकळ्या वातावरनातील तवांग फिरण्यासाठी अत्यंत चांगली जागा आहे. येथे रोड ट्रिप, ट्रेकिंग सारख्या सर्वच गोष्टीचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

 

येथील लोक या जागेचे नैसर्गिक सौदर्य मोठ्या प्रयत्नाने सांभाळून ठेवतात,म्हणूनच तवांग आजपर्यंत आपली सुंदरता टिकवून ठेवण्यास यशश्वी झाला आहे. याठिकाणी सोलो ट्रिप, असो अथवा ग्रुप ट्रिप तुम्ही अजिबात बोअर होणार नाहीत, याची गॅरंटी आमची.

 

किब्बर, हिमाचलप्रदेश:

किब्बर तुमच्या ट्रिप साठी अत्यंत सुविधाजनक पर्याय आहे. येथे निसर्गाचे निरागस सौदर्य पाहण्यासाठी नेहमी पर्यटक येत असतात. किब्बर गावात पोहचल्यानंतर तुम्हाला एकदम ढगात पोहचल्यासारखं वाटेल.सुट्टीचा आनंद घेण्यास हिमाचलप्रदेश मधील किब्बर एक चांगला पार्याय आहे.

 

आरुवैली (खोरे) , काश्मीर:

पहलगामपासून फक्त 12 किमी अंतरावर असलेले आरुवैली खोरे फिरण्यासाठी लक्षवेधी जागा आहे. उंचच उंच देवधरची झाडे आणि खाली बर्फाची पडलेली चादर या जागेला अजूनच सुंदर बनवते. या खोऱ्यात राहण्यासाठी जम्मू – काश्मीर पर्यटक कडून खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

तेथे राहून तुम्ही तुमचा सुट्टीचा आनंद नक्की घ्याल. तेथून थोड्याच लांबीवर जंगलात फ्रोजन धबधबा सुद्धा आहे,जो पाहण्यासाठी लांबून पर्यटक येथे येत असतात.

 

अराकुवैली, आंध्रप्रदेश:

गालिकोंडा हिल्स मध्ये समुद्रसपाटीपासून 3000 फूट उंचावर अराकूवैली आहे. या जागेला सुंदर आणि प्रसिद्ध बनवण्यामागे ईस्टर्न घाटाचा मोठा वाटा आहे. येथे मोकळ्या आकाशाखाली खुल्या जागेवर टेंट लावून रात्र काढण्यात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात.

 

मुनस्यारी, उत्तराखंड:

बर्फाखाली झाकलेले दगड आणि छोटे-छोटे झाडे झुडपे या ठिकाणची शान आहेत. मुख्य म्हणजे मुनस्यारी 4 ग्रामपंचायतच्या हद्दीत वसलेलं आहे. मुनस्यारीच्या आसपास जोहारी, बरपटिया जातींचे समुदाय स्थयिक आहेत.

 

जर तुम्ही स्थानिक लोकांच्या संस्कृतीविषयी अथवा त्यांच्या राहणीमानाविषयी जाणून घेण्यास उत्सुक असता, तर येथे येणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण यांची संस्कृती आणि राहणीमान तुमच्यासाठी नक्कीच माहितीपूर्ण ठरेलं…

 

तर ही होती काही आमच्या नजरेतील भारतातील फिरण्यासारखी ठिकाणे जर तुम्ही लॉकडाऊन नंतर फिरण्यास जाण्याचा बेत आखत असाल तर या जागेचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल. = भारतातून हि शहरे हरवली होती..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here