आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

धनंजय मुंडे यांचा भाजपाच्या महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेपासून राष्ट्रवादीच्या मंत्रिपदापर्यंतचा प्रवास


 

सध्या नेपोटीसम विषयी सर्वच ठिकाणी खूप चर्चा होत आहे. तसेच काही आता राजकारणातही बघायला भेटत आहे.अनेक नेत्यांचे मुले हे केवळ वंश परंपरेनेच राजकारणात सहज उतरतात परंतु राजकारणात यशस्वी होणे हे सर्वांच्याच नशिबात नसते. त्यामुळेच प्रत्येकाला आपला ठसा राजकारणात उमटवता येत नाही. परंतु काही जन या मिळालेल्या संधीचे सोने करून घेतात.

आज आपण अशाच संघर्षमय जीवनातून सफल झालेल्या राजानेत्याबद्दल जाणून घेणार आहोत. हा राजनेता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर, परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे हे होय. त्यांच्या संघर्षमय जीवनाविषयी जाणून घेवूया या लेखामधून…..

new google

धनंजय मुंडे

धनंजय पंडितराव मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ रोजी बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण परळी येथूनच पूर्ण केले. त्यापुढील शिक्षण त्यांनी डॉ.बाबासाहेब आबेडकर मराठवाडा विद्यापीठातून घेतले.तसेच त्यांनी कायद्याची पदवी एल.एल.बी.हि पदवी पुणे येथे घेतली.

शिक्षण पूर्ण झाल्या नंतर गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय मुंडे यांनी गाव पातळीपासून राजकारणास सुरुवात केली. २००२ साली धनंजय मुंडे यांनी प्रथम जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी पण झाले. परंतु राजकारणात एक म्हण आहे महाराष्ट्राला काका पुतणे हे नाते जास्त चालत नाही. आणि त्याच प्रमाणे २० वर्ष भाजप आणि काका गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत राहणाररया धनंजय यांनी एन.सी.पी. मध्ये प्रवेश घेतला.

सलग २० वर्ष त्यांनी अनेक पद सांभाळली होती. १९९६ मध्ये धनंजय मुंडे भाजपाच्या महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) अध्यक्ष झाले. त्यानंतर दोनदा ते भाजपच्या महाराष्ट्र युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते. नंतर त्यांनी दोन वेळा भाजपच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले.

 

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे

त्यानंतर धनंजय यांना भाजपच्या महाराष्ट्र युवा मोर्चाचे अध्यक्ष केले गेले. महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात ते सातत्याने अग्रभागी राहिले आहेत. भाजपा पक्षाच्या नियमात असे म्हटले आहे की जो कोणी भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोडेल तो मूळ मंडळाचा म्हणजेच भाजपाचा प्रदेश सरचिटणीस बनतो.

 

परंतु धनंजय मुंडे यांच्या सोबत तसे झाले नाही. काका (गोपीनाथ मुंडे यांच्या प्रभावामुळे) भाजपाने त्यांना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बनवले नाही.

 

त्यापूर्वी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार म्हणून धनंजय यांचे नाव जाहीर केले होते. आणि त्यांना निवडणूक प्रचारासाठी काम करायला लावले होते , पण निवडणुकीच्या एक महिन्यांपूर्वीच गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव बाजूला करून त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांना परळी येथून उमेदवारी दिली. येथूनच मग त्यांचे सबंध बिघडू लागले.

परंतु यावेळी समस्येचे समाधान करण्यासाठी, गोपीनाथ मुंडेजींच्या वतीने (भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन) गडकरीजी यांनी धनंजय मुंडे यांना आश्वासन दिले कि, त्यांना जिल्हा परिषदेत मला सामावून घेण्यात येईल. त्यातील आधीच निवडलेला नेता असल्यामुळे धनंजय यांनी गडकरीजींना विचारले मला परळीतून निवडणूक लढवण्याचे तिकीट का नाकारले गेले आणि त्या जागी पंकजाला कसे काय मिळाले.

आपल्या पोटाच्या मुलींना समोर आणण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय यांना बाजूला सारले हे जेंव्हा धनंजयच्या  लक्षात यायला लागले तेंव्हाच त्यांनी भाजप ला सोडचिठ्ठी दिली आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश घेतला.

 

त्यांनी २४ डिसेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सध्या ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री आहेत. २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले तेंव्हा त्यांनी पंकजा मुंडे यांना जवळपास 31000 मतांच्या आघाडीने पराभूत केले.

 

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे

 

ते सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे एक धडाडीचे नेते म्हणून प्रसिध्द आहेत.पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचे ते अगदी जवळचे आहेत. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचा कार्यकाळ उच्च सदनातील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट एलओपी म्हणून मानला जात आहे.

 

त्यांच्या आक्रमक भाषण आणि संघटनात्मक कौशल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे कौतुक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हला बोल यात्रा आणि शिव स्वराज्य यात्रेमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय भूमिका होती.

 

त्यांच्या वक्तृत्व कौशल्यामुळे ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे “फायर ब्रॅंड ” नेते मानले जातात. त्यामुळेच त्यांचे पक्षात तसेच वजन आहे.

 

परळी मतदर संघात निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शहा  पासून नरेंद्र मोदी  यांनी सुद्धा भरभरून सभा घेतल्या होत्या. यामुळेच सर्वांचेच लक्ष परळी विधानसभेच्या निकालावर होते. परंतु जनतेने एका मोठ्या राजनेत्याच्या मुलीला न निवडता गोर गरीबांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांना निवडून दिले. ते पण तब्बल ३१००० मतांच्या आघाडीने. तेंव्हापासूनच परळी मध्ये राष्ट्रवादीचा डी.एम. हा एक ब्रॅंडच निर्माण झाला आहे.

 

कोणी जरी मदतीसाठी गेले तर त्याची तुरंत दखल घेवून धनंजय मुंडे योग्य ती कार्यवाही करतात त्यामुळेच ते परळीच्या जनतेच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here