आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
मधुबाई भारताची एकमेव ट्रान्सजेंडर महापौर आहे
किन्नर हा शब्द आपल्या कानावर पडताच आपल्या मनात अलगच विचार यायला लागतात. आपल्या पैकी काही लोक त्यांच्याकडे अत्यंत क्षुल्लक नजरेने पाहतात. परंतु काही जन त्यांचा सन्मान पण करतात. आज किन्नर हे आपल्या प्रमाणेच अनेक क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. काही दिवसांपूर्वीच किन्नरांना बी.एस.एफ.(सीमा सुरक्षा बल) मध्ये काम करण्यास परवानगी मिळाली आहे._
लक्ष्मी नारायण त्रिपाठी , पद्मिनी प्रकाश , शांता खुरई , कल्कि सुब्रमण्यम , रुद्राणी क्षेत्री , मानवी बंदोपाध्याय ह्या काही भारतातील प्रसिध्द किन्नर व्यक्तिमत्व आहेत. ज्यांनी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परंतु; आज आपण अशा किन्नर व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना भारतातील सर्वप्रथम किन्नर महापौर म्हणून निवडून येण्याचा मान मिळालाआहे. त्यांच्या बद्दल जाणून घेवूया या लेखामधून….

किन्नर मधुबाई भारताच्या छत्तीसगड राज्यातील रायगडच्या महापौर आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत मधूबाईने रायगड महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत एकूण ३३१६८ मते मिळविली आणि प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे महावीर गुरुजी यांना ४५३७ मतांनी पराभूत केले.
मधुबाई भारताची एकमेव ट्रान्सजेंडर महापौर आहे.”लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. हा विजय मी माझ्यासाठी लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद मानतो. असे मधुबाई तिच्या विजयानंतर म्हणाली .
मधुबाई यांचा जन्म एका दलित समाजात झाला होता. त्यांचे पूर्वीचे नाव नरेश चौहान होते. आठवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी किशोरवयातच आपले घर सोडले. त्यानंतर ती स्थानिक किन्नर समाजात सामील झाली.
महापौर बनण्यापूर्वी त्यांनी अनेक कामे केले त्यामध्ये, रायगडाच्या रस्त्यावर गाणे, असो किंवा मग हावडा मुंबई मार्गावर रेल्वेमध्ये नाचणे. यामधून कमावलेल्या ६००००ते ७०००० रुपयांच्या बजेटवर त्यांनी महापौरची निवडणूक लढवली.
एकावेळेस मुलाखत देताना मधुबाई म्हणाली होती कि ; मला निवडणूक लढवण्याचे काहीही गरज नव्हती परंतु काही स्थानिक लोकांच्या आग्रहाखातीर मी लढवण्याचा निर्णय घेतला होता. मधुबाई यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश न घेता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
१५ एप्रिल २०१४ च्या सुप्रीम कोर्टात (NALSA) कायदा पास झाला, ज्याने भारतातील ट्रान्सजेंडर लोकांना कायदेशीर मान्यता दिली. आणी त्याच्या केवळ ९ महिन्यानंतर ४ जानेवारी २०१५ रोजी त्यांचा या निवडणुकीत विजय झाला. हा विजय एलजीबीटी समुदायासाठी अतिमौल्यवान होता. तिच्या अजेंडाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वच्छता.
एका मुलाखतीत ती म्हणते की, येथे चांगले रस्ते नव्हते. गल्ली बोळ नेहमी गलिच्छ आणि कचर्याच्या ढिगाऱ्याने भरलेली असे. काही गरीब अनाथ, भिकारी लोकं थंडीतही उघड्यावरच झोपलेले असायचे. तेंव्हा मी या निवडणुकीत भाग घेवून त्यांच्यासाठी काहीतरी करायचे ठरवले.
तिने अनेक लहान उद्याने, बागांची उभारणी, तलावांची साफ सफाई यांसारखे अनेक कम केले आहेत. तसेच मधुबाई यांनी शहरातील वाहतुकीचे अनेक प्रश्नही मिटवले आहेत.
प्रत्येक मनुष्याने त्यांचे लिंग निवडणे हा त्यांचा हक्क आहे, असे कोर्टाने म्हटले आहे. या निर्णयाद्वारे सरकारला नोकरी, शिक्षण आणि इतर सुविधांमध्ये ट्रान्सजेंडर लोकांसाठी कोटा स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत.
ट्रान्सजेंडर लोक, ट्रान्ससेक्सुअल, क्रॉस-ड्रेसर आणि अन्य लिंग नसलेल्या भारतीयांना सामान्यत: हिज्रा म्हणून संबोधले जाते. त्यांना कधी कधी तर अत्यंत दुर्लक्षितपणाचा सामना करावा लागतो. त्यापैकी बरेच लोक गरीबीत राहतात. काहीवेळा इस्पितळात त्यांना वैद्यकीय सेवेस देखील नकार दिला जातो. हि आपली मानसिकता आता बदलायला हवी.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा: या पुणेकर काकांनी तब्बल ६६ वर्षे हाताची नखेच कापली नव्हती!