आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

महाराष्ट्रातील या गावच्या शाळेतील मुले एकमेकांना चप्पल बनवून गिफ्ट देतात…!

 

गरिब आणि मध्यमवर्गीय घरातील अनेक मुलांना कधी वेळेवर शाळेचा ड्रेस तर कधी वेळेवर बूट मिळत नाही, ही जरी खरी गोष्ट असली, शिक्षणाची आवड असल्यास या सर्व गोष्टीमुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहत नाही. अनेकदा बिना चप्पल, बूट अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपण शाळेत जाताना पाहिलेय.

 

new google

आज आम्ही तुम्हाला अश्याच एका गावातील विद्यार्थ्याविषयी सांगणार आहोत जे आपसातील बंधुभाव जपत एकमेकांना मदत म्हणून स्वतः चप्पल बनवून दुसऱ्याला भेट देत असतात..

 

महाराष्ट्र
महाराष्ट्र

महाराष्टातील औरंगाबाद जिल्ह्यातील बरखेडी खुर्द जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थी आपली जुनी-पुराणी अर्धवट तुटलेली चप्पल एका कोपऱ्यात जमा करतात. आठवड्याच्या शेवटी हेच विद्यार्थी एका तासात या चप्पलांची दुरुस्ती करून त्या पुन्हा वापरण्याजोग्या करतात.

 

एवढंच नाही तर यांनतर जर आपल्यातीलच कोणत्याही विद्यार्थ्यांना चप्पलची गरज असेल तर त्या चप्पल त्याला भेट म्हणून दिल्या जातात. याने विद्यार्थ्यांतील आपसातील बंधुभाव आणि एकमेकांना मदत करण्याचा दृष्टिकोन जाहीरपणे दिसून येतो.

 

मुख्याध्यापकांच्या मते या विद्यार्थ्यांमध्ये आपसात बंधुभाव वाढावेत आणि त्याना आपल्या आई वडिलांच्या परिस्थितीची कल्पना यावी यामुळे ते असा आठवड्याला एकदा शेवटचा तास घेतात.

 

2500 पेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या या गावात अधिकतर मजूर वर्ग,आणि अल्पभूधारक शेतकरी राहतात. या शाळेततील विद्यार्थ्यांपैकी मुलींची संख्या ही मुलांपेक्षा जास्त आहे. एक मुख्याध्यापक आणि 2 शिक्षिका असलेली ही शाळा पहिली ते पाचवी वर्गापर्यंत भरवली जाते.

 

शाळेत एक मुख्याध्यापक खोली आणि बाकी एका एका वर्गाला एक खोली एवढंच बांधकाम असून, बाकी सर्व मोकळे पटांगण आहे. येथे 2018 पासून शैक्षणिक मूल्यांसह सामाजिक आणि बंधुभाव वाढण्यास मदत होणाऱ्या अश्या पद्धतीचे कार्यक्रम राबवले जातात.

 

महाराष्ट्र
महाराष्ट्र

मुख्याध्यापक सांगतात कि कधी काळी आमच्या काही विद्यार्थ्यांच्या पायात चप्पल नसायच्या, परंतु मुलांच्या या कार्यामुळे आज सर्व मुलांच्या पायात चप्पल आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात एक आत्मविश्वास तयार होत आहे. आणि सगळी मुले रोज शाळेत येऊ लागली आहेत. अशी परिस्थिती एका वर्षाअगोदर नव्हती.

 

ते म्हणतात कि, अगोदर आमच्या अनेक विद्यार्थ्यांच्या पायात चप्पल नसल्यामुळे त्यांना शाळेत येतेवेळी, जातेवेळी पायात खडे रुतत असत. यामुळे एवढ्या लांब मुले शाळेत येण्यास कंटाळा करत असत. परंतु आजघडीला आम्ही मूल्यमापन करून या मुलांनाच एकमेकांना मदत करण्यास शिकवले असून त्यांना स्वतःही या कामात गोडी वाढत आहे एवढंच काय तर मुलांची विचार करण्याची शक्ती सुद्धा प्रबळ होत आहे.

 

 

समोर चालून सामाजिक जीवनात आपल्यावर येणाऱ्या जिम्मेदारीचे महत्व त्यांना कळण्यास या मुख्यमापन कार्यक्रमातून समजत आहे. ही बाब आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आहे. मूल्यमान कार्यक्रमाअंतर्गत मुले अनेक कामात सुद्धा स्वतःहून सामील झाले.

 

शाळेतून आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे मुले अनेक कामात स्वतःहून भाग घेऊ लागले आहेत. थोड्याच दिवसापूर्वी पावसाळ्यात शाळेच्या गेटसमोर एक मोठा खड्डा पडला होता. ज्यामुळे पावसाचे पाणी त्यात साचून मुलांना जाण्या- येण्यास अडथळा निर्माण होऊ लागला. तर सर्व विद्यार्थ्यांनी मिळून तो खड्डा बुजवण्याचानिर्णय घेतला. आणि स्वतःमाती आणि दगडे आणून तो खड्डा बुजवला..

 

मुख्याध्यापक सांगतात ज्या पद्धतीने या मुलांमध्ये एकमेकांची मदत करण्याची आणि बंधू भाव जपण्याची गोडी लागली आहे. तश्याच प्रकारे गावातील अन्य नागरिकांनी सुद्धा शाळेसाठी बंधुभाव जपून शाळेचीकाळजी घेतली पाहिजे.
आणि मुलांच्या भावी शिक्षणासाठी गावातर्फ लागणारी आवश्यक मदत त्यांच्या मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना मिळावी. जेणे करून या मुलांच्या उज्जल भविष्यासाठी ती कामा येईल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. हिटलरनी खरोखर आत्महत्या केली होती का?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here