आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

मागासलेल्या भागात राहणारा हा क्रिकेटर बनलाय जगातील सर्वांत मोठा टी -२० क्रिकेटर…!


 

टी -20 क्रिकेटचा बादशाह. जगातला सर्वांत मोठा क्रिकेटर.. कायरन पोलार्ड आपल्या उत्कृष्ठ खेळाच्या बळावर आज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खूप नावाजलेला आहे. 500 टी-20 सामने खेळणारा एकमेव टी -20 क्रिकेटर आहे. परंतु एक वेळ अशी होती कि या क्रिकेटरला एक वेळ खायला सुद्धा पैसे नव्हते.

12नोव्हेंबर 1987ला त्रिनिडाड च्या टकारिगुआ मध्ये कायरन पोलार्ड चा जन्म झाला होता. लहानपनापासूनच वडिल नसल्यामुळे कायरन च्या आईवर त्याची आणि त्याच्या don बहिणीची जिम्मेदारी होती. कायरनची आई त्या तिघांना घेऊन टुनापूना-पिआरको मध्ये आली, जी जागा ड्रग्स, मारपीट,खून खराबा साठी प्रसिद्ध होती.

कायरन पोलार्ड समोर 2 रस्ते होते एक चुकीचा मात्र सोपा, आणि दुसरा सरळ पण अतिशय कठीण. कायरन ने त्या वेळी दुसरा मार्ग निवडला आणि क्रिकेट खेळण्यास सुरवात केली.

क्रिकेटचा मार्ग सुद्धा नव्हता सोपा..

सरळ मार्ग जरी निवडला असला तरी तो कायरन साठी सोपा नव्हता. तो जिथे राहायचा त्या जागी फक्त 6 महिने क्रिकेट खेळले जायचे, आणि बाकी 6 महिने फुटबॉल आणि अथेलेटिकस.. लहानपनापासूनच पोलार्ड मध्ये क्रिकेट मध्ये विशेष छाप सोडण्याची कला होती, परंतु त्याची ओळख जगाला झाली ती प्रायमरी शाळेमध्ये.

 

तो सुरवातीला टेस्ट आणि वनडे सामने खेळायचा. त्याचे स्वप्न होते कि देशासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे.

 

2006 साली कायरन पोलार्डला वेस्टइंडिजकडून अंडर19 क्रिकेट टीम मध्ये जागा मिळाली. त्यानंतर अंतररष्ट्रीय आणि फर्स्ट क्लास क्रिकेटसाठी त्याची निवड झाली. दुसऱ्याच वर्षी टी-20 वर्ड कप झाला. आता अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी -20 फॉर्मॅटची जादू वाढत चालली होती. लोक दिवसेंदिवस या फॉर्मॅटचे चाहते होत चालले होते.

 

 कायरन पोलार्ड कसा बनला हिटर?

 

क्रिकेट
क्रिकेट

 

2008 साली झालेल्या स्टैनफोर्ड आणि इंग्लैंड च्या सामन्यात कायरन पोलार्डने 2 विकेट घेतले आणि इंग्लडची टीम 99 रणावर ऑल आउट झाली. स्टैनफोर्डच्या टीम ने 7.2 ओव्हर मधेच या सामन्याय 10 विकेट राखून विजय मिळवला.
या सामन्याच्या नंतरच पोलार्डला लगभग एक मिलियन डॉलर मिळाले होते.

 

पोलार्ड ला आणखी फेमस होण्याची संधी मिळाली तो 2009 साली भारतामध्ये. हैद्राबादमध्ये खेळलेल्या सामन्यात पोलार्ड ने 18 बॉलमध्ये 54 रणांची विजयी खेळी साकारली होती. मोठी गोष्ट ही होती कि या सामन्यात पोलार्डने ब्रेटली, स्टुअर्ट क्लार्क सारख्या अंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या बॉलला सीमारेखेपार पाठवले होते.

याच सामन्यातील त्याचा खेळ पाहून मुंबई इंडियंसनी साडे पाच करोड मध्ये आपल्या टीम मध्ये जोडले. त्या वर्षी त्याला जास्त खेळण्यास संधी मिळाली नाही.

पोलार्डने आतापर्यंत 30 टीमसाठी क्रिकेट खेळले आहे. 2016 पासून 2019 पर्यंत त्याला परत अंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम मध्ये स्थान मिळालं नव्हतं. परंतु सेलेकटर बदलल्यानंतर पोलार्ड ला अंतरराष्ट्रीय टीम मध्ये स्थानही मिळाले आनी तो टि -20 फॉर्मॅटचा कर्णधार पण झाला.

पोलार्डच्या 15 वर्ष्याच्या करिअरमध्ये तो अनेक वादात अडकला होता. परंतु त्याला जे हासील करायचं होते ते मिळवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली. पोलार्डची हीच इच्छा होती कि तो आपल्या आईला एक चांगल जिवन देईन. आणि त्यात तो संपूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here