आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

डॉ.महेश कुमार मलानी हे पाकिस्तानच्या राष्ट्रीय विधानसभेवर निवडून येणारे पहिले हिंदू उमेदवार ठरले आहेत.

 

२०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय विधानसभेची निवडणूक पार पडली यामध्ये इमरान खानची पार्टी एक प्रबळ पार्टी म्हणून चर्चेत आली आहे. या निवडणुकीत इमरान खान सोबत आणखी एक व्यक्ती आहे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे ते म्हणजे डॉ.महेश कुमार मलानी. पाकिस्तानसारख्या कट्टर मुस्लीम देशात राष्ट्रीय विधानसभेवर एका हिंदूने निवडून यावे हि तर कामालीचीच गोष्ठ आहे हीच कमाल डॉ.महेश कुमार मलानी यांनी केली आहे.

आजच्या या लेखामध्ये जाणून घेवूया डॉ.महेश कुमार मलानी यांच्या बद्दल सविस्तर …..

डॉ.महेश कुमार मलानी
डॉ.महेश कुमार मलानी

पाकिस्तानमध्ये (non muslim)लोकांना मतदान करण्याचा आणी निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळाल्याच्या तब्बल १६ वर्षानंतर २०१८ मध्ये, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) डॉ.महेश कुमार मलानी हे पाकिस्तानच्या राष्ट्रीय विधानसभेवर निवडून येणारे पहिले हिंदू उमेदवार ठरले आहेत.

डॉ.महेश कुमार मलानी यांनी दक्षिण सिंध प्रांतातील राष्ट्रीय विधानसभा (NA२२२ ) थापारकर २ हि जागा १६ विरोधी उमेदवारांना पराभूत करून जिकली. महेश कुमार मलानी यांना १०६६३० मते मिळाली तर त्यांचे विरोधक ग्रँड डेमोक्रॅटिक अलायन्सचे अरबब झाकाउल्ला यांना ८७२५१ मते मिळाली. पाकिस्तानी हिंदू असलेले महेश कुमार हे राजस्थानी पुष्कर्ण ब्राह्मण आहेत.

१९८० च्या दशकापासूनच डॉ.महेश कुमार मलानी यांच्या कुटुंबाचे बेनझीर भुट्टो आणि त्यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीशी संबंध आहेत. महेश मलानी यांचे मोठे बंधू जगदीश मलानी हे सिंध प्रांतीय विधानसभेचे सदस्य होते. तसेच त्यांचा दुसरा भाऊ मोतीराम मलानी हा राष्ट्रीय विधानसभेचा सदस्य होता.

डॉ.महेश कुमार मलानी
डॉ.महेश कुमार मलानी

१९९३ मध्ये जगदीश मलानी यांचा एका अपघातात मृत्यू झाला, त्यावेळी डॉ.महेश  कुमार मलानी हे पाकिस्तानच्या हैदराबादमधील सरकारी रुग्णालयात बालरोग तज्ञ म्हणून रुजू होते. परंतु भावाच्या अकालीन निधनामुळे त्यांनी सरकारी रुग्णालयाला राजीनामा दिला आणि राजकारणात येण्यासाठी ते थारपारकर परत आले.

 

मालानी हे २००३-२००८ मध्ये पीपीपीने नामनिर्देशित केलेल्या राखीव जागेवर खासदार होते. २०१३ मध्ये सिंध विधानसभेची थापारकर २ हि सर्वसाधारण जागा जिंकल्यानंतर डॉ.महेश कुमार मलानी हे पाकिस्तानच्या प्रांतीय विधानसभेचे पहिले गैरमुस्लिम सदस्य झाले होते. गेल्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी सिंध विधानसभेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले होते.

२००२ मध्ये तत्कालीन अध्यक्ष जनरल (निवृत्त) परवेझ मुशर्रफ यांनी घटनेत दुरुस्ती केल्यावर बिगर मुसलमानांना संसद व प्रांतिक असेंब्लीच्या सर्वसाधारण जागांवर मतदान करण्याचा आणि निवडणूक  लढण्याचा अधिकार मिळाला होता. त्यांच्यासाठी आता पाकिस्तानच्या सिनेट, राष्ट्रीय व प्रांतीय असेंब्लींमध्येही जागा राखीव आहेत.

डॉ.महेश कुमार मलानी
डॉ.महेश कुमार मलानी

पाकिस्तानमधील महिला आणि बिगर मुस्लिमांना खासदार होण्यासाठी दोन संधी मिळतात. प्रथम २७२ सर्वसाधारण जागांवर कोठूनही निवडणूक लढवून आणि दुसरी राष्ट्रीय विधानसभेत प्रतिनिधित्व असलेल्या पक्षाकडून उमेदवारी मिळवल्यानंतर.
२०१८ मार्चमध्ये, थारपारकर येथील पीपीपीच्या कृष्णा कुमारी सिनेटवर निवडून आलेल्या पहिल्या हिंदू महिला झाल्या. सिंधमधील महिलांसाठी राखीव जागेवर त्यांची निवड झाली होती.

महेश कुमार मलानी आणि मुस्लिम मतांच्या विभाजनामागे हिंदू एकत्रित झाले. यामुळेच मालानी यांना उमेदवारी दिली गेली असा अंदाज तहरीक-ए-इंसाफच्या रमेशकुमार वंकवानी यांनी वर्तवला होता.

भारताप्रमाणेच पाकिस्तानच्या राजकारणातहि वंशवाद हा महत्वाचा घटक आहे. मलानी यांनी जकाउल्लाह यांना जिंकून दिले होते ते २००४ ते २००७ दरम्यान सिंध प्रांताचे मुख्यमंत्री अरब गुलाम रहीम यांचे चुलत भाऊ आहेत.याचाच फायदा त्यांना अनेकवेळा झाला. बहुतेक राजकीय राजवंशांप्रमाणेच मलानी देखील धनाढ्य कुटुंबातील आहेत. व्यवसाय आणि शेतीमध्ये त्यांची फार मोठी गुंतवणूक आहे. ते अशा मतदारसंघात आहेत ज्यात ७० %हिंदू अनुसूचित जातीतील लोक समाविष्ठ आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :  हे आहे भारत -चीन यांच्यातील वादाचे कारण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here