आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

दीप अमावस्या कि गटारी?… वाचा सविस्तर…!


श्रावण महिन्याच्या सुरुवातीस येणाऱ्या आषाढ अमावस्‍येला ओडिशा मध्ये चितलगी अमावस्‍या , तेलंगाना आणि आंध्रप्रदेश मध्ये चुक्कला अमावस्‍या म्हणतात. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये “गटारी” अमावस्‍या म्हणतात. काही तळीराम आणि मांसाहार प्रेमी या दिवशी गटारी अमावस्या साजरी करतात. हेच लोक यादिवशी यथेच्छ मद्यपान आणि मांसाहार करून गटारी मध्ये लोळतात. श्रावण महिन्यात अनेक लोकं मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन वर्ज्य करतात.

हा एक महिना सुरू होण्याआधी या पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. या दिवशी भरपूर प्रमाणात मांस-मच्छी खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते. पुढील संपूर्ण श्रावण महिना सण-वार आणि उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो.

जे नियम पाळत नाही तेही हा दिवस मात्र जोरात साजरा करतात. कारण पिनारांना तर पिण्याचा बहाणा पाहिजे. त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच. मुळात आपल्या धर्मात गटारी नावाचा कोणताही सण नाही. हे नाव काही तळीरामांनी दिले आहे. मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच हा दिवस असतो.

दीप अमावस्या 

गटारी
दीप अमावस्या

या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदील, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात. त्यांची पूजा करता. मग गूळ घालून कणकेचे उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे असे गोडधोड करून नैवेद्य दाखवतात. तसेच अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. आपल्या आयुष्यातील अंधार नष्ट करून तो आपल्याला प्रकाश देतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण.

 

हिंदू धर्मामध्ये या अमावस्येचे अनन्य साधारण महत्व आहे. दीप अमावस्येनंतर श्रावण मासाला सुरूवात होते. श्रावण मास म्हणजे व्रत वैकल्यांचा महिना. या महिन्यात बरेच सण समारंभ साजरे केले जातात. नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाला, गौरी-गणपतीहे सण येतात. श्रावण महिन्यानंतर सर्व सणांना सुरूवात होते. श्रावण महिना भगवान शंकराला खूप प्रिय आहे, म्हणून या पवित्र महिन्यात सर्व शिवभक्त भगवान शिवाच्या भक्तीत मग्न होतात.

 

श्रावण महिन्यात लोक हलके व शाकाहारी भोजन घेतात. तसेच , सोमवारी उपवास ठेवून भगवान शिवांना विशेष प्रार्थना करतात. यंदाच्या वर्षी आषाढी अमावस्या २० जुलैला येत आहे. त्यानंतर २१ जुलै पासून श्रावण मासाला प्रारंभ होत आहे. २१ जुलैपासून मध्य भारत आणि दक्षिण भारतासाठी श्रावण महिना सुरू होईल.

गटारीचे दुष्परिणाम 

गटारी
गटारी

श्रावण महिन्यामध्ये पाउस पडण्यास सुरुवात होते. पावसाळ्यामध्ये आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो आणी या सर्व आजारांचे मुल कारण असते पावसाळ्यातील खान पान आणि त्यामुळे होणाऱ्या पोटाच्या समस्या. या महिन्यात अनेक लोक हे तेलकट , मसालेदार , कांदा लसून , मांसाहार, मद्यपान यांना वर्जित करतात. या दिवशी दारू,आणि मांसाहाराचे सेवन करण्याची वाईट प्रथा सुरु झाली आहे.

यामुळे  पोट खराब आणि मग अन्य आजारांना बळी पडतात. आता ही अमावस्या आपल्या कशी साजरी करायची हे आपल्यावर अवलंबून आहे. या दिवशी दिव्याचे पूजन करून जीवनातील अंधकार दूर व्हावा अशी प्रार्थना करून की खाऊन- पिऊन गटारीत लोळून?

कोरोन व्हायरसने परत आपले रौद्र रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आपण घरामध्येच राहून आपल्या परिवारासोबत हा सन साजरा करावा ही  विनंती आहे. कारण आपण या एकादिवसासाठी एकत्र येऊन सर्वांना धोक्यात आणण्यापेक्षा घरीच राहिलेले बरे दीप अमावस्या  तर पुढच्या वर्षी पण येणारच आहे.


आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल : असिरेश्वर (गुप्तेश्वर) महादेव मंदिर श्रावण विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here