आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारतातील हे स्मारके आहेत खऱ्या प्रेमाची निशाणी…!

प्रेम. आजपर्यंत अनेक राजे- महाराजे यांनी आपल्या प्रियजणांसाठी अनेक ठिकाणी स्मारके बांधलीत. आपण करत असलेल्या व्यक्तीची इच्छापूर्ती अथवा तिच्याबद्दल आपले प्रेम  दाखवून देण्यासठी त्या स्मारकांची निर्मिती करण्यात आली.स्मारक हे नेहमीच ऐतिहासिक महत्वाचे आठवण करून देतात.

प्रेमाच्या स्मारकांच्या या यादीमध्ये भारतातील अनेक महत्वाच्या इमारती आणि किल्ले आहेत. जे आपल्याला त्यांच्यातील स्नेह, प्रेमाची आठवण करून देत असतात.या इमारतीला आजसुद्धा प्रेमाची मिसाल म्हणून सांभाळून ठेवण्यात आले आहे.

यातील काही इमारती दुःख व यातनांची कहाणी सुद्धा सांगतात. प्राचीन काळातील या ऐतिहासिक इमारती आणि त्यांच्या राजकीय भिंती मनाला खुश करून जातात. जाणून घेऊया काही प्रसिद्ध प्रेमाच्या निशाणी असणाऱ्या स्मारकांबद्दल….

ताजमहाल, आग्रा (उत्तरप्रदेश)

प्रेम

संपूर्ण जगामध्ये ताजमहाल पेक्षा सरस प्रेमाची निशाणी एकसुद्धा नाहीये. पांढऱ्या संगमच्या दगडापासून बनवलेला ताजमहाल शाहजानं ने 1631 ते 1648 च्या दरम्यान आपल्या प्रिय मुमताज साठी बनवला होता. मुमताज महल आणि शाहजहाँच्या आठवणी देणाऱ्या या महालात मुमताजची कबर आहे. शाहजहाँ आणि मुमताजच्या या प्रेमाच्या निशाणीला दुनियेच्या सात आश्रर्यात सामील केल आहे.

चितौडगढ किल्ला, उदयपूर (राजस्थान)

प्रेम

 

चितौडगढ किल्ला हा फक्त दुनियेतील मोठा किल्ला नाही तर यूनेस्कोच्या हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट असलेला एकमेव किल्ला आहे. किल्ल्याच मुख्य आकर्षण हे तीन माजली राणी पद्मावतीचे महाल आहे. हा किल्ला फक्त उंच आणि विशालच नाहीये तर याची शिल्पकला सुद्धा पर्यटकांना अचंबित करून टाकते.

चितौडगढ किल्ला राणी पद्मावती आणि राजा रतन रावल सिंह यांच्या प्रेमाचे प्रतिक मानल्या जतो.राजा रतन रावल यांनी राणी पद्मावतीला स्वयंवरमध्ये कठीण परीक्षा देऊन जिंकून या  किल्यामध्ये आणले होते.

चितौडगढ किल्ला राणी पद्मावती आणि राजा रतन रावल सिंहच्या प्रेमाची विशेष निशाणी आहे. किल्ल्याचा भिंती त्यांच्या ऐतिहासिक प्रेमाची साक्ष देतात.

रूपमती मंडप, मांडू (मध्य प्रदेश )

प्रेम

एका पठारावर असलेला हा रूपमती मंडप ऐतिहासिक वास्तुकला म्हणून प्रसिद्ध आहे. हा किल्ला मांडू शहरात आहे. जमिनीपासून 366 मिटर उंच असलेला हा रूपमती ऐतिहासिक मंडप पर्यटकांना सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे. या मंडपातून पाहताना खालून वाहणारी नर्मदा नदीचे दृश्य अत्यंत मनमोहक दिसते.

मांडू राजकुमार बाज बहादूर आणि राणी रूपवती यांच्या प्रेम कहाणीमुळे प्रसिद्ध आहे. मांडूचा शेवटचा शासक सुलतान  बाज बहादूर हा राणी रूपवतीच्या गोड आवाजामुळे तिच्या प्रेमात पडला होता. त्याने रानिसमोर प्रेमविवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला असता राणीने  त्याच्यासमोर एक शर्त ठेवली होती.

राणीच्या शर्तनुसार तिच्याशी विवाह करण्यासठी राजाला एका श्या महालाची निर्मिती करावी लागणार होती, ज्या महालातून गोदावरी नदी दिसेल  असा महाल निर्मल करू शकले तरच राणी त्यांच्याशी विवाह करेल. याच अटीची पूर्तता करण्यासठी बाज बहादूर यांनी रूपमती मंडपची निर्मिती केली. आणि राणी  रूपवती सोबत प्रेमविवाह केला. अश्या रीतीने या दोघांच्या प्रेमाची साक्ष असलेला रूपमती मंडप सर्वांसमोर आला.

मस्तानी महाल (शनिवार वाडा), पुणे.महाराष्ट्र

प्रेम

1730 मध्ये पेशवा बाजीराव यांनी बांधलेला शनिवार वाडा अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष आहे. पुण्याचा गौरव आणि मान असलेला शनिवार वाड्यामध्ये पेशवा बाजीराव यांची प्रेमिका मस्तानी यांच वास्तव्य होते. धार्मिक अडचणीमुळे पेशवाई मध्ये मस्तानीला पेशवा बाजीरावची पत्नी म्हणून स्वीकार केल्या जात नव्हते तेव्हा पेशवा बाजीराव यांनी पुण्यात मस्तानी महाल बांधला.आणि मस्तानीस तेथे वास्तव्यास ठेवले.

हालाकी सध्या शनिवारवाड्यातील मस्तानी महाल संपूर्ण नष्ट झाला असला तरीही काही अवशेष आजही शनिवार वाड्यात सापडतात. किल्ल्याच्या दरवाज्यावर आज सुद्धा एका पाटीवर “मस्तानी महाल ” असं स्पष्ट लिहलेले दिसते. मस्तानी पेशवा बाजीराव यांची दुसरी पत्नी बुंदेलखंडची राजकुमारी होती.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल : गटारी की दीप अमावस्या? 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here