आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

जेंव्हा जेंव्हा स्वतंत्रता लढ्याची गोष्ट काढली जाते, तेव्हा एका विरांगनेचे नाव नेहमी अग्रेसर असते. ती वीरांगना म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई.

१८५७च्या राष्ट्रीय लढ्यात महत्वाचे कार्य करणारी हि वीरांगना. आझादीच्या लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या राणीचे कार्य संपूर्ण स्त्रीयांसाठी एक उत्तम उदाहरण आहे.

पूर्वीपासून झांशीच्या ब्रिटिशांशी असणार्‍या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वत: इस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात-झांशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानात लोकांना हळहळ वाटेल.

परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्र्वास वाटेल का, अशी शंका व्यक्त करून-ब्रिटिश सरकारला एक प्रकारचे आव्हान दिले.  कंपनी सरकारच्या बेजबाबदार, अनैतिक कृत्यांना, कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणार्‍या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या. हे धारिष्ट दाखविल्यामुळेच त्यांना स्वातंत्र्यदेवता म्हटले गेले.

राणी लक्ष्मीबाई
राणी लक्ष्मीबाई

परंतु कधी तुम्ही झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झेलेल्या झाशी शहरात कधी गेला आहात का?
तुम्हाला जर ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यात रस असेल तर एकदा या शहरास अवश्य भेट द्या.

१८५७ च्या स्वतंत्र लढ्यात झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची एक महत्वाची भूमिका होती. अगोदर झाशीवर चंदेल वंशजांची सत्ता होती. परंतु नंतर राजा गंगाधररावच्या मृत्यूनंतर लक्ष्मीबाई ने झाशीवर राज्य केले.

१८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झांशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झांशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती.

परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मण रावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना – मारोपंत तांब्यांना – खजिनदार केले. लक्ष्मण रावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली.

झाशी उत्तर प्रदेशच्या कानपूर जवळ आहे.आणि हे शहर बुंदेलखंडाच्या प्रमुख शहरांपैकी एक आहे. आज सुद्धा झाशीच्या वीर गाथा इतिहासप्रेमी पर्यटकांना येथे येण्यासाठी मजबूर करतात.

राणी लक्ष्मीबाई

झाशीमध्ये फिरण्यासारखी ठिकाणे:

झाशीमध्ये तस पाहिलं तर फिरण्यासारखी बरेच ठिकाणे आहेत.पण त्यात अनेक इतिहासप्रेमी प्रामुख्याने भेट देतात ते या खालील ठिकाणी.

झाशी किल्ला:

झाशी शहराचा शोर्यपूर्ण इतिहास आजपर्यंत लोकांना सांगणारा हा झाशीचा किल्ला एका पहाडीवर असणारा हा किल्ला त्याकाळी राणी लक्ष्मीबाई आणि चंदेल वंशजांचे निवास्थान होता. हा किल्ला झाशीच्या गौरवशाली इतिहासचा
पुरावा आहे.

झाशीच्या किल्ल्याने १८५७ च्या लढ्यामध्ये एक महत्वाची भूमिका निभावली आहे. कारण १८५७ च्या लढ्यात भारत हा या लढ्याचा केंद्रबिंदू होता.
किल्ल्याच्या भिंतीवर रंगवण्यात आलेले झाशीच्या राणी आणि इंग्रजांमधील लढाईचे वर्णन करतात.

सहकारी संग्रहालय:

सरकारी संग्रहालय झाशीमध्ये एक लोकप्रिय स्थळ आहे. या संग्रह्लायार १८५७च्या लढ्यातील अनेक वीरांचे हत्यार, कपडे, मूर्ती आणि त्या काळातील चलनी सिक्के संग्रहित केले आहेत. संग्रहलायामध्ये ठेवलेली चंदेल वंशजांची सामग्री त्यांचे जीवन शैली बद्दल अनके माहिती देऊन जातात. या संग्रालयात हत्यार, शस्त्र आणी गोळा-बारूदचे प्रदर्शन भरले जाते.

राजा गंगाधर राव यांची समाधी:

झाशीचे राजा आणि राणी लक्ष्मीबी यांचे पती महाराज गंगाधरराव यांची समाधी येथे आहे. या समाधीची निर्मिती राणी लक्ष्मीबाई यांच्यामार्फत २१ नोव्हेंबर १८५३ साली गंगाधरराव यांच्या निधनानंतर
केली होती. लक्ष्मी तलावाच्या बाजूला असलेली हि समाधी झाशीशहराची एक प्रमुख ऐतिहासिक स्मारक आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल :  भारतातील खऱ्या प्रेमाची निशाणी आहेत हि शहरे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here