आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

तामिळनाडूच्या या रहस्यमय ठिकाणांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

 

निसर्गाच्या सानिध्यात अनेक असे अद्भुत स्थळ आहेत जेथे भेट देऊन माणूस मंत्रमुग्ध  होऊन जातो. अनेक जणांना अश्या ठिकाणी जाण्याची व त्या ठिकाणांबद्दल माहिती घेण्याची तीव्र इच्छा असते. आज आम्ही तुम्हाला तामिळनाडूच्या अश्याच काही रहस्यमय ठिकाणांबद्दल सांगणार आहोत ज्यांना पाहून तुम्हाला आश्चर्य  होईल कि आजसुद्धा असे ठिकाण आहेत. उत्कृष्ट वास्तुकला, समृद्ध इतिहासानी सजलेल्या तामिळनाडूचे हे ठिकाणे कोणालाही आकर्षित करतील.

 

new google

कार्तिकेय मुरुगा यांचे सिक्क्कल सिंगारवेलावर मंदिर:

तामिळनाडू

 

तामिळनाडूच्या या सिक्कल सिंगारवेलावर मंदिराची खास गोष्ट हि आहे कि येथे प्रस्थापीत मूर्तीतून घाम येतो. या मंदिरात दरवर्षी नोव्हेंबरमध्ये एक उत्सव साजरा केला जातो. ज्यात भगवान सुब्रमण्य यांच्या दगडाच्या मूर्तीला घाम येतो. हा उत्सव सुरापदमन या राक्षसावर भगवान सुब्रमण्य यांच्या विजयाचे प्रतिक मानले जातो.

 

तर मूर्तीला येणारा घाम हा या राक्षसाला मारण्यासाठी आलेल्या भगवान सुब्रमण्य यांच्या रागाचे प्रतिक आहे अस समजले जाते. उत्सवाच्या शेवटी घाम कमी होत जातो. ते पाणी सौभाग्य आणि समृद्धी ची निशाणी समजून भक्तांवर शिंपडले जाते.

 

तंजावूर मंदिर:

तामिळनाडू

कला आणि वास्तुकला यांचा सुंदर संगम असलेले तंजावर शहर हे तंजावूर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.या मंदिराला “ब्रम्हदेशेश्वर मंदिर” नावाने सुद्धा ओळखले जाते.  पहिला राजा चोलयाने या शिवमंदिराची निर्मिती केली होती. हे मंदिर चोल वंशाच्या सर्वात महत्वाच्या स्मारकांपैकी एक आहे.

 

मंदिराच्या भिंतीवर पौराणिक आकृत्या, कहाण्याची सजावट करण्यात आली आहे. भिंतीवर चोल वंशजांच्या जटील प्रतिकृती कोरल्या गेल्या आहेत.

 

मंदिराच्या भिंतीवर त्या काळचे राजे फ्रांस रोबर्ट आणि एका चीनी व्यक्तीच्या मिळत्या जुळत्या आकृत्या आहेत. परंतु यांची पक्की ओळखआजूनही झालेली नाहीये. इतिहासकारांच्या मते वास्को-द गामा हा भारतीय जमिनीवर पाय ठेवणारा पहिला व्यक्ती होता. जो या मंदिराच्या बांधकामाच्या ५०० वर्षानंतर आला होता.

 

यावरून अस समजल जाऊ शकत कि भारतीय राजा  चोलने अगोदरच अन्य देशांसोबत अंतरराष्ट्रीय व्यवहार स्थापित केला असेल. जर हो तर त्या वेळी परिवहन आणि फिरण्याचे साधन काय होते हेही शोधणे मुश्कील होऊन बसले आहे.

 

राम सेतू पूल:

हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ, प्रभू श्री रामांची यशोगाथा “रामायण” ग्रंथामध्ये रामसेतूचा उल्लेख आहे. माता सीतेला रावणाच्या
तावडीतून सोडवण्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान बांधलेला हा पूल पर्यटकांना आजसुद्धा हजारो वर्षानंतर
दिसतो. या पुलाला “एडम ब्रिज” नावाने सुद्धा ओळखल्या जाते.

 

हा पूल भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानच्या सागरावर आहे. प्राचीन ग्रंथानुसार हा पूल वानर सेनेने प्रभू श्री राम यांच्या आदेशानुसार चुना आणि दगडांपासून बनवला होता. दगडांना पाण्यात टाकताच ते बुडू लागले परंतु त्यावर भगवान श्री राम याचं नाव लिहून टाकल्यास ते दगड पाण्यावर तरंगत होते.

 

काही वैद्यानिक आणि पुरातत्ववाद्यांनी या पुलाच्या अस्तित्वामागेच्या या कहाणीला खोटी असल्याच म्हटल आहे. परंतु रामेश्वरम जवळ सापडलेल्या पाण्यावर तरंगणार्या दगड याचं उत्तर सुद्धा ते शोधू शकले नाहीत.

 

नाचीयार कोइल – कल गरुड:

जगातल्या सर्वांत रहस्यमय मंदिरांपैकी एक मंदिर आहे ते म्हणजे तामिळनाडूच्या कुंभकोणममध्ये ज्याचे नाव आहे ” नाचीयार कोइल – कल गरुड’.या मंदिरात भगवान विष्णू यांची प्रसिद्ध असी मूर्ती आहे. दरवर्षी येथे उन्हाळ्यात एक मोठी यात्रा भरली जाते.

 

खास गोष्ट म्हणजे या यात्रेतील मिरवणुकीत भगवान विष्णुंची फोटो मंदिरातून बाहेर काढली जाते. अस म्हटल जाते कि जशी फोटो मंदिराच्या बाहेर काढली कि लगेच फोटोचे वजन वाढण्यास सुरवात होते. आणि मिरवणूक संपून जशी फोटो मंदिराच्या जवळ येईल तसे तिचे वजन कमी होण्यास सुरवात होते. मूर्तीच्या या वजन कमी जास्त होण्याच्या बदलांनी अनके वैद्यानिक आणि  शंसोधकाना सुद्धा अचंबित करून सोडले आहे.

 

कृष्ण बटरबॉल:

 

तामिळनाडू

तामिळनाडूचे ऐतिहासिक शहर महाबलीपुरममध्ये एक मोठ्या पहाडावर ५ मीटर रुंद आणि २० फूट उंच आकाराचा
मोठा दगड मागच्या अनके वर्षापासून बिना हलता -डुलता उभा आहे. हा दगड कधीही पहाडीवरून थोडाशी इकडे तिकडे हालत नाही.

 

अंदाज आहे कि मागच्या १२०० वर्षापासून हा दगड असाच उभा आहे.या दगडाचे अंदाजे वजन २५० टन यापेक्षाही जास्त असू शकते. १९०८ मध्ये मद्रास चे राज्यपाल यांनी हा दगड हलवण्यासाठी ७ हत्ती लावले होते,परंतु ७ हत्तींची टाकत सुद्धा या दगडाला त्याच्या जागून हलवू शकली नाही.

 

आजपर्यंत कोणीही या गोष्टीचा पता लावू शकले नाही कि , एवढा मोठा दगड एवढ्या वर्षापासून कसा टिकला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल :  भारतातील खऱ्या प्रेमाची निशाणी आहेत हि शहरे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here