आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!

ऐतिहासिक वारसा व त्यांच्या कहाण्या ह्या सर्वांनाच वाचायला व पाहायला आवडतात. पूर्वीच्या राज्य महाराज्यांचे कार्य आणि त्यांनी निर्माण केलेल्या सुंदर अश्या वास्तू आजसुद्धा आपणास तेथे जाण्यास भाग पाडतात. आज आम्ही अश्याच एका ऐतिहासिक स्थळाबद्दल बोलणार आहोत, ज्याचा ऐतिहासिक वारसा खूप मोठा आहे.

बादामी गुफा
बादामी गुफा

कर्नाटकच्या बागलकोट जिल्यातील ऐतिहासिक अश्या बादामी गुफा आहेत . या गुफा संपूर्णपणे दगडांना कोरून तयार केल्या आहेत. याच कारणामुळे ह्या गुफा संपूर्ण दुनियेमध्ये प्रसिद्ध आहेत. या गुफेमध्ये मंदिरासोबतच बादामी किल्ला सुद्धा आहे.

बादामी गुफेमध्ये लोकप्रिय पर्यटन स्थळ, धबधबे यांच्या सोबतच पुरातत्व संग्रलायातील वस्तू सुद्धा पाहायला मिळतात. या जागेवर असलेल्या भूतनाथ मंदिराची भव्यता पाहन्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात. दगडांना कोरून बनवलेल्या ह्या गुफेत अनेक मंदिर आहेत. बादामीवर आतापर्यंत अनेक राजशाही सत्तांनी राज्य केले त्यात प्रामुख्याने शाही राजवंश, मुगल, मराठे आणि मैसूर साम्राज्य यांचा समवेश होता.

जाणून घेऊया  बादामितील  भेट देण्यासारखी ठिकाणे:

बादामी गुफा मंदिर:

गुफा
गुफा

अत्यंत सुंदर अश्या आणि प्राचीन इतिहास लाभलेल्या या मंदिराच्या निर्मितीचे श्रेय सहाव्या आणि सातव्या शतकातील बादामी चालुक्यांना जाते. शहरात असलेल्या एका भव्य मंदिराला जातील रूप देण्याच कार्य यांनी केले होते. गुफा मंदिर चालूक्य यांच्या वास्तुकलेचे सर्वांत आच्छर्यकारक उदाहरण आहे.

मंदिर खड्ड्यांमध्ये असल्यामुळे आसपासच्या जागेवर मोठ्या प्रमाणत दगड आहेत. यांची वास्तुकला उत्तर भारत आणि दक्षिण भारतिय काळाचे एक उत्तम मिश्रित उदाहरण आहे. बादामी मध्ये ४ गुफा आहेत. पहिली गुफा हि भगवान महादेव यांना समर्पित केलेली आहे. या गुफेमध्ये शंकरांच्या लगभग ८१ मुर्त्या आहेत. ज्यात शंकराचे “नटराज” रुपी मूर्ती सुद्धा आहे.

बादामी गुफा
बादामी गुफा – युवाकट्टा

येथेच दगडाच्या वरच्या बाजूला आणखी एक गुफा आहे. यात दुसरे मंदिर आहे जे पूर्णपणे श्री विष्णु यांना समर्पित आहे. भगवान विष्णू यांना हिंदू परंपरेनुसार ब्रम्हांडरक्षक मानले जाते. तिसरी गुफा ७० फूट रुंद आहे. ज्यातील मंदिरामध्ये भगवान विष्णूंच्या विविध रूपातील मुर्त्या प्रस्थापित केल्या गेल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने नरसिंह अवतार, वराह अवतार , हरिहर अवतारातील मुर्त्यांचा समवेश आहे. सोबतच नागफड्यातील विशाल मूर्ती या मंदिराची शोभा आणखीनच वाढवते.

चौथी गुफा भगवान महावीर यांना समर्पित आहे. हे जैन धर्माचे २४ वे तीर्थकर आहेत. पहिल्या ३ गुफांच्या लगभग १०० वर्षानंतर या मंदिराचा शोध लागला होता. या जागी दर्शन करण्यासठी प्रवेश शुल्क आकारल्या जातो . १५ वर्षापेक्षा कमी वय असेलल्या मुलांसाठी प्रवेश निशुल्क आहे तर, बाकी लोकांना प्रत्येकी १० रुपये शुल्क आकारण्यात येतो.

विदेशी पर्यटकांसाठी प्रवेश  शुल्क १०० रुपये आकारण्यात येतो.

भूतनाथ मंदिरांचा समूह :

या भूतनाथ मंदिराची निर्मिती बलुआ दगडांपासून केली गेली आहे. जो याठिकाणी मोठ्या प्रमाणत प्रसिद्ध आहे. या मंदिरांना ७व्या शतकात बादामी चालूक्य यांनी बनवले होते. देवी भूतनाथ यांच्यास्ठी या ठिकाणी अनके मंदिरांची निर्मिती करण्यात आली होती त्यामुळे या ठिकानाला देवी भूतनाथ मंदिर समूह अस नाव देण्यात आले. देवी भूतनाथ देवाधीदेव महादेव याचा अवतार असल्याच म्हटल जाते.

बादामी किल्ला :

तुम्ही जर प्राचीन किल्ले पाहण्यास नेहमी आतुर असता तरच तुम्हाला या किल्ल्यावर जाता येईल. कारण आता हा किल्ला संपूर्णपणे पडल्या गेला असून एका जुन्या खंडर सारखा दिसायला लागला आहे. परंतु किल्ल्याच्या अंतर्गत बांधकाम आणि वास्तुकाम पाहून तुम्ही त्या काळील कलांचा अंदाज बांधू शकता. हा किल्ला ई. सन.५४३ मध्ये चालूक्य राजा पुलकेशी यांनी बांधला होता.

या किल्ल्याच्या सुरम्य अश्या प्रवेशवाटा आणि भिंती पर्यटकांना मंत्रमुग्ध करत असत. इ .स. ६४२ मध्ये पल्लवांच्या येण्याने हा किल्ला संपूर्णपणे नष्ट झाला. येथील मागे घडलेल्या काही दुर्भाग्यपूर्ण घटनांमुळे हा किल्ला आता पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. परंतु जर तुमची जास्तच इच्छा असेल तर तुमच्या रिस्कवर जाण्यासाठी तुम्हाला विशेष पास दिला जाऊ शकतो.

मालेगिट्टी शिवालय:

शिव मंदिराच्या वरच्या भागाला मालेगिट्टी मंदिर आहे. शिव मंदिराच्या सहाव्या शताब्दीमध्ये या मंदिराची निर्मिती केली होती. हे मंदिर बादामिच्या प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. चालूक्य साम्राज्याची राजधानी असलेल्या या बादामी शहरात
अनेक पर्यटन स्थळे आहेत. प्राचीन काळातील राजांचे अवशेष आणि स्मारकांच्या शोधात या ठिकाणीकाही वेळा खोदकाम सुद्धा करण्यात आले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल :  भारतातील खऱ्या प्रेमाची निशाणी आहेत हि शहरे..!