आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

देवघरच्या ऐतिहासिक मंदिरांचा इतिहास!

झारखंडच्या देवघर मध्ये अनके रमणीय स्थळे आहेत जेथे अनेक हिंदू तीर्थक्षेत्र आणि मंदिरे आहेत. येथे असलेल्या अनेक बौद्ध धर्माच्या मठामुळे या शहराला “बोद्धनाथ धाम” सुद्धा म्हटले जाते.

समुद्र सपाटीपासून लगभग 833 फूट उंचीवर असलेले देवघर हे अनेक चांगल्या मूर्ती आणि मंदिरांचे माहेरघर असल्यासारखाच आहे. यामुळेच या शहरात दरवर्षी 7 ते 8 लाख भाविक येत असतात. यामुळेच देवधर अनके प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे.

देवघरला जाण्यासाठी आसपासच्या शहरातुन अनेकबस आहेत. शहर भारताच्या मुख्य मार्गांवर असल्यामुळे येथे जाण्या- येण्यासाठी तुम्हाला जास्त अडचण येणार नाही.

तसे पाहता देवघरमध्ये अनेक प्रसिद्ध स्थळे आहेत. परंतु यातील सर्वांत प्रसिद्ध असे मंदिर आहे ते म्हणजे “बाबा बैद्यनाथ मंदिर “.भारतातील सर्वांत जास्त पुजल्या जाणाऱ्या शिव मंदिरापैकी एक हे मंदिर आहे. हे पवित्र स्थळ देवी आदिशक्ती मा सतीच्या 52 शक्तीपीठांपैकी एक आहे.

या ऐतिहासिक शहरात हिंदू देवी देवतांची 21 अन्य मंदिर सुद्धा आहेत. या मंदिरात दर्शनासाठी दूर दुरून अनेक भक्त येत असतात. त्यांची अशी श्रद्धा आहे की या मंदिरात पूजा केल्यामुळे त्यांचे दुःख कमी होऊन जिवन समृद्ध होण्यास सुरवात होते.

देवघर

यातील दुसरे प्रसिद्ध असे मंदिर आहे ते म्हणजे “नौलखा मंदिर “. देवघर आपल्या पौराणिक व धार्मिक मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. आणि तेथील नौलखा मंदिर अध्यात्मिक शक्तींसाठी तसेच ऐतिहासिक घटनांसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर राधा – कृष्ण यांचे आहे.

146 फूट उंच असलेल्या या मंदिराची निर्मिती  एका संताने केली होती. जो 1948 मध्ये श्री बालानंद ब्रम्हचारी नावाने ओळखले जात असत. या मंदिरात संपूर्ण भारतातून अनके भक्तगण येत असतात.

रामकृष्ण मिशन विद्यापीठ :

भारताचे एक प्राचीन आणि ऐतिहासिक असलेले  हे मिशन विदयापीठ ओळखले जाते. हे सर्वांत जुने शिक्षण संस्थान आहे. याची स्थापना 1922 मध्ये केली गेली होती. स्वामी विवेकानंद यांच्या अनके शिष्यानी या जागी अध्ययन केले होते.

मंदरा पर्वत :

 

देवघर


देवघर  मधील मंदरा पर्वत भाविकांसाठी एक श्रद्धेचे ठिकाण आहे. या पर्वताच्या बाबतीत अनेक गोष्टी इथे प्रचलित आहेत. या पर्वताबद्दल असेही म्हटलं जाते की, समुद्र मंथनच्या वेळी  समुद्रातून अमृत काढण्यासाठी या पर्वताचा उपयोग केला गेला होता. यामुळे हिंदूंसाठी हे पवित्र स्थान आहे. या पर्वताच्यावरती एक मंदिर सुद्धा आहे जे जैन धर्माचे 12 वे तीर्थकार वासुपूज्य यांचे आहे. ही जागा देवधरच्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here