आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

हे आहेत भारतातील विषारी आणि धोकादायक असे साप, कमी वेळातच होऊ शकतो माणसांचा मृत्यू…


आपल्या सभोवताली अनेक खतरनाक जनावर असतात परंतु त्या जनावरांपेक्षा सर्वात सुंदर आणि धोकादायक जीव आहे साप. भारतातील घनदाट जंगल हे विषारी सापांसाठी मुख्य निवास स्थान आहे. भारतामध्ये लगभग २७० प्रजातीचे साप आढळतात. त्यापैकी जवळपास ५० प्रजाती ह्या विषारी आहेत.

परंतु यापैकी १५-२० प्रजाती ह्या अत्यंत विषारी आहेत. त्यांचा दंश झाल्यास मृत्यू होणे जवळपास निश्चितच आहे. दरवर्षी भारतामध्ये ४५००० लोकांचा मृत्यू या विषारी सापांच्या चावल्यामुळे होतो. आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊया

new google

भारतातील ५ अत्यंत विषारी आणि जीवघेण्या सापांबद्दल सविस्तर…..

१ ) इंडियन कोब्रा , नाग (Indian cobra)

साप

इंडियन  कोब्रा या सापाला भारतीय नाग या नावानेही ओळखतात. इंडियन कोब्रा हा भारतामध्ये आढळणारा एक अत्यंत विषारी साप आहे. या सापाला शेतकऱ्याचा मित्र पण म्हणतात. महाराष्ट्र आणि काही दुसऱ्या राज्यांमध्ये तर या सापाची पूजा केली जाते. नागपंचमी हा सन या सापांच्या पूजेसाठी प्रसिध्द आहे.

हा साप जास्त आक्रमक नाही परंतु भारतामध्ये सापांनी चावल्याने होणाऱ्या मृत्युंमध्ये या सापाचे शिकार सर्वात जास्त आहेत. याचे एक कारण हे पण आहे कि, हा साप सर्वत्र आढळतो, उंदीर हे या सापांचा मुख्य आहार आहे या मुळे हा साप शिकारीसाठी मानवी वस्तींमध्ये, शेतामध्ये  आणि अधिकांश शहरी भागांमधेही आढळतो.

इंडियन कोब्रा यासापांमध्ये  (synaptic neurotoxin) नावाचे अत्यंत घातक विष असते. या सापाच्या चावल्याने तोंडातून फेस निघतो. डोळ्यांसमोर अंधकार होतो. शरीराला अर्धांगवायू होतो, वेळेवर उपचार नाही मिळाल्यास मृत्यू होतो. या नागाची लांबी १ मीटर ते १.५ मीटर (३.३ से ४.९ फुट) पर्यंत होऊ शकते.

श्रीलंका मधील काही प्रजाती तर ६.९ ते ७.९ फुट लांब वाढू शकते. अनेक लोक कोब्रा (नाग) आणि किंग कोब्रा ( नागराज ) यांना एकाच समजतात परंतु हे सत्य नाही. नागराज किंगकोब्रा भारतामध्ये आढळणारा सर्वात लांब साप आहे ज्याचा नाग इंडियन  कोब्रा प्रजातीशी काहीही संबंध नाही.

२ ) इंडिअन क्रेट , कवड्या (Indian Krait)

साप

इंडियन  क्रेट हा भारतातील सर्वात जास्त विषारी साप आहे. हा साप एकदा चावल्यास एवढे विष सोडतो कि त्याने ६० माणसांचा मृत्यू होऊ शकतो. या सापाच्या १२ विविध प्रजाती आहेत. हा साप चावल्याने भारतात दरवर्षी लगभाग १०००० लोकांचा मृत्यू होतो.

या सापाला कॉमन क्रेट , ब्लू क्रेट या नावाने पण ओळखले जाते. अंगावर पांढरे पट्टे असणारा हा अतिशय सुंदर साप भारतासह बांगलादेश आणि दक्षिणपूर्व आशिया मधेही आढळून येतो. या सापाची लांबी सरासरी ०.९ मीटर ( ३ फूट ) असते. परंतु हा साप १.७५ मीटर ( ५ फुट ९ इंच ) पर्यंत वाढू शकतो.

या सापाचे मुख्य भोजन म्हणजे उंदीर, विंचू , पाल , बेडूक यांसारखे छोटे जीव असतात. हा साप रात्रीच्या वेळेतच बाहेर पडतो आणि जमिनीवर झोपलेल्या माणसांना याचा दंश होतो. या सापाचे विषाचे दात खूप लहान असतात म्हणून हा चावल्यास जास्त दुखत पण नाही .

या सापांमध्ये  प्रीसानेप्तिक आणि पोस्टसिनेप्तिक न्युरोटोक्सिन हे विष असतात. ज्यामुळे मासपेशींना लकवा होतो. पोटात गाठ पडल्यासारखे होते. योग्य उपचार न मिळाल्यास ४ ते ८ तासांमध्ये मृत्यू होऊ शकतो. या सापाला  सायलेंट किलर या नावानेही ओळखतात.

३ ) रसेल वाईपर , घोणस ( Russell viper)

साप

रसेल वाईपर या सापाला कोरीवाला किंवा घोणस या नावाने ओळखतात. हा साप इंडियन क्रेट पेक्षा कमी विषारी आहे तरीपण हा साप भारतातील सर्वात घातक साप आहे. एकदम रागीट आणि अत्यंत वेगवान असतो हा साप. याच्या चावल्याने दरवर्षी भारतात २५००० लोकांचा नृत्यू होतो. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे.

हा साप पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा अपसमज आहे, की रसेल वाईपर सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात. या सापाचे विष Vasculotoxic प्रकारचे आहे. हे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते.

विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणा‍र्‍या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. थोड्या वेळाने नाकपुड्या, कानांतून व गुदद्वारातून रक्त स्रवू लागते. विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू ओढवू शकतो.

४ ) सॉ स्केल्ड वाईपर (saw scaled viper)

What is the natural habitat of the Indian Saw-Scaled Viper in ...

सॉ स्केल्ड वाईपर नावाचा हा साप लांबीला छोटाच असतो परंतु आक्रमक , रागीट शैली आणि घटक विष हे या सापाला अत्यंत धोकादायक बनवते. भारतात दरवर्षी ५००० च्या आसपास मृत्यू या सापाच्या चावल्याने होतात. या सापाच्या पाठीवर अरीसारखे खवले असतात म्हणूनच याला सॉ  स्केल्ड वाईपर म्हणतात.

या सापाला राग आल्यास अतिशय भयावह आवाज करतो. या प्रजातीच्या सापांमध्ये : (neurotoxins, cardiotoxins, hemotoxins,आणि cytotoxins) हे विष असते. हा साप महाराष्ट्र , राजस्थान , उत्तर प्रदेश, याठिकाणी जास्त प्रमाणात आढळतो. या प्रजातीमधील साप हे जगातील सर्वात जास्त सर्पदंश आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूला कारणीभूत आहेत.

५ ) किंगकोब्रा , नागराज (king cobra)

In Kerala, 3 Men Guarded King Cobra Eggs For Over 100 Days. See Pics

किंग कोब्रा किंवा नागराज हा भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात जास्त लांबीचा विषारी साप आहे. याची लांबी सरासरी १३-१५ फुट असते. हे साप वर्षावन, दलदलीचा प्रदेश, बांबूचे वन यामध्ये राहतात. सर्वात अलग आवाज आणि घर बनवण्याची कला  हि या सापाला सर्वात अलग बनवते.

किंगकोब्रा हा सर्वात लांब १८.९ फुट मलेशिया मध्ये पकडल्या गेला होता. नंतर त्याला ब्रिटन च्या लंडन झु मध्ये ठेवण्यात आले होते. स्वतःला धोक्यामध्ये बघतच हा साप आपली फडी पसरवतो आणि जमिनीवरून ६ फुट पर्यंत उंच उचलतो. तसेच लांब लांब श्वास घेऊन हा साप भयंकर फुंकर सोडतो.

या सापाचे विष तांत्रिक प्रणाली (nervous system)वर परिणाम करते. ज्यामुळे बेहोशी , डोळ्यांपुढे अंधारी येणे, शरीराला लकवा होणे यांसारखे प्रभाव होतात. या सापाच्या एका दंशामध्ये २ छोटे चम्मच विष आपल्या शिकारीच्या शरीरात सोडतो. ज्यामुळे एक सामान्य व्यक्ती अर्धा तास आणि ५४०० किलो वजनाचा हत्ती ३ तासांमध्ये मारू शकतो. हे साप सरासरी २० वर्ष जगतात. उंचाव चढणे असो किंवा पाण्यामध्ये पोहणे सर्व गोष्टींमध्ये किंगकोब्रा अव्वल स्थानी आहे.

किंग कोब्रा: पहा व्हिडिओ

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here