आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

कारगिल युद्ध भारत पाकिस्तान यांच्यातील १९९९ मध्ये झालेले युद्ध…

भारत पाकिस्तान यांच्यातील दुश्मनी काही नवीन नाहीये.अगोदर पासूनच पाकिस्तानला सीमारेषेभागात नको त्या ठिकाणी घूसखोरी करताना अनेक वेळेस पकडले आहे. तरीसुद्धा पाकिस्तान भारतीय हद्दीत घुसून जमीन हडपण्याचा प्रयत्न करत असतोच.

असाच प्रयत्न त्यांनी 1999 मध्ये सुद्धा केला होता. कारगिलच्या शिखरांवर त्यांनी बंगर बनवले होते.  परंतु हे करतेवेळेस त्यांना भारतीय जवानाच्या साहसाची जराशीही कल्पना नव्हती. भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला घुटने टेकवण्यास भाग पाडले. आपण कारगिलच्या युद्धाची गोष्ट करत आहोत.

new google

कारगिल युद्ध

आज जाणून घेऊया की कारगिलचे युद्ध सुरु कसे झाले होते?

सन 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान संबंध  मैत्रीपूर्वक ठेवण्याचे सर्व प्रयत्न दोन्ही देशांकडून केले जात होते. प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांच्या प्रयत्नातून संबंध मैत्रीपूर्वक होत सुद्धा होते. एवढंच नाही तर यांनी पंजाब पासून लाहोर पर्यंत बस सेवा सुद्धा सुरु केली होती. जिची सुरवात स्वतः वाजपेयी यांनी पाकिस्तानात जाऊन केली होती.

परंतु या सर्व घडामोडीमागे पाकिस्तानी सैना काही दुसराच प्लॅन तयार करत होती, ज्याची भारतीय सैन्याला थोडीशीही चाहूल नव्हती. पाकिस्तानी सैन्याचे लक्ष होते ते कारगिल वर कब्जा करण्याचे. कारगिलमध्ये बर्फवृष्टी होत असताना पाकिस्तानी आणि भारतीय सैनिक कारगिलच्या शिखरावरून खाली उतरत असत. अनेक दिवसापासून हे असेच सुरु होते.

1999 मध्ये भारतीय सैनिक शिखराच्या खाली उतरले परंतु त्यांना या गोष्टीचा अंदाज नव्हता की पाकिस्तानी सैनिक खाली उतरणार नाहीयेत. पाकिस्तानचे सैनिक वरच राहिले होते. 3 मे 1999 ला भारतीय सैनिकांनी माहिती मिळाली की वरती घुसखोर आहेत. एका गुप्तचराने सांगितलेल्या संदेशामध्ये असं लिहलं होत की वरती बंदूकधारी अनेक लोक आहेत जे तिथे  तंबू ठोकून राहत आहेत.

यानंतर असं काही होणार होते ज्याचा कुणालाही अंदाज नव्हता. भारतीय सैनिकांच्या मते ते कुणीतरी ईतर घुसखोर असतील, कारण त्या वेळी अश्या छोट्या- मोठ्या घुसखोऱ्या भारतीय सैनिकांना नवीन नव्हत्या. 5 मे 1999 ला भारतीय सैनेने एका तुकडीला वरती पाठवण्याचा निर्णय घेतला. ज्या तुकडीचे नेतृत्व करत होते “कॅप्टन सौरभ कालिया”.

कारगिल युद्ध
source- twitter

कॅप्टन कालिया आणि त्यांचे 5 साथीदार जेव्हा वरती पोहचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण तेथे कोणी घुसखोर नसून  मजबूत हत्यारांसह गोळा- बारूद असलेली शेकडो पाकिस्तानी सैनिक होते. कॅप्टन कालिया यांनी आपल्या टीमच्या एका सैनिकाच्या माध्यमातून भारतीय सैनेला संदेश पाठवला की, वरती पाकिस्तानी सैनिकांनी कब्जा केला आहे.

कॅप्टन कालिया यांनी आपल्या साथीदाराला सैनिकांना निरोप देण्यास पाठवले आणि अन्य साथीदारांना सोबत घेऊन पाकिस्तानी सैनिकांना प्रतीउत्तर दिले.

कालिया दुश्मनासमोर ताठ  मानेने उभे होते. त्यांच्या रणनीती समोर मोठ्या संखेने असलेले पाकिस्तानी सैनिक सुद्धा फिके पडू लागले. परंतु आपला व आपल्या साथीदारांचा गोळा- बारूद संपत आला आहे हे त्यांच्या लक्षत आले आणि पाकिस्तानी सैनिकांनी चारी बाजूंनी घेराव घालून त्यांना बंदी बनवले.

पाकिस्तानने कॅप्टन कालिया यांचा अनेक प्रकारे छळ केला. 22 दिवस त्यांना त्रास दिल्यानंतर जेव्हा त्यांच पार्थिव भारतीय सैनिकांना पाठवण्यात आले तेव्हा ते पाहून संपूर्ण भारतीय जवानांचे रक्त सळसळू लागले.

कॅप्टन कालिया यांचे दात आणि शरीराचे हाडे पूर्णपणे तोडण्यात आले होते. एवढंच नाही तर पाकिस्तानी सैन्यांनी त्यांचे डोळेसुद्धा काढून घेतले होते. त्यानंतर त्यांना गोळी मारण्यात आली होती.

भारतीय सैनिक आपल्या साथीदाराच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी उत्सुक होते. आणि येथूनच सुरवात झाली ती, भारत -पाकीस्तानमधी “कारगिल युद्धाला ”

पुढच्या लेखात जाणून घेऊया कारगिल युद्धातील अनेक वीर जवानांबद्दल ज्यांनी आपल्या
उत्कृष्ट कामगिरीवर पाकिस्तानी सैनिकांची बत्ती गुल केली होती.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : पर्यावरणातील सर्वात मोठी समस्या… निर्वनीकरण!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here