आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

 

आजच्या लेखामध्ये जाणून घेऊ कोठारी बंधू यांच्याविषयी सविस्तर….

अयोध्या राम मंदिर – बाबरी मश्जीदीच्य अनेक वर्षांपासून चालत आलेल्या विवादावर (Ram Mandir Babri Masjid Controversy)अखेरीस ९ सप्टेंबर २०१९ रोजी ऐतिहासिक निर्णय न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी घोषित केला.
या निर्णयानुसार राम मंदिराची विवादित २.७७ एकर जमीन हि रामजन्मभूमी (राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्टला देण्यात आली.

new google

त्यासोबतच मस्जिद बांधण्यासाठी वैकल्पिक ५ एकर जमीन अयोध्येमध्ये सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचा आदेशही कोर्टाने सरकारला दिला आहे.

कोठारी बंधू
कोठारी बंधू

गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या राम मंदिर – बाबरी मस्जिद विवादामध्ये सर्वात मोठे आंदोलन १९९० मध्ये झाले होते. ३० ऑक्टोबर १९९० रोजी विवादित परिसरामध्ये बनलेल्या बाबरी माश्जीदिच्या घुमटावर कोठारी बंधू (रामकुमार कोठारी आणि शरद कोठारी) यांनी सर्वप्रथम भगवा झेंडा फडकावला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन्ही भावांचा मृत्यू झाला होता.

अयोध्येच्या राम मंदिर आंदोलनाचा उल्लेख होताच कोठारी बंधूंचे (Kothari Brothers)नाव सर्वप्रथम घेतले जाते. कोठारी बंधूंनी सर्वप्रथम बाबरीवर भगवा फडकावून सर्व कारसेवकांमध्ये सनसनी पसरवली होती. पोलीस प्रशासनाला आव्हान देत हे दोघे भाऊ माश्जीदिच्या घुमटावर चढले होते आणी भगवा फडकावून आरामात खाली यातरले होते. त्यानंतर कोलकत्ताच्या कोठारी भावंडांची सर्वत्र चर्चा झाली होती.

कारसेवा करण्यासाठी कोठारी बंधू कोलकत्त्याहून अयोध्येमध्ये आले होते.

कोलकत्ताच्या बडा बाजारामध्ये राहणारे राजकुमार कोठारी आणी शरद कोठारी हे दोघे सख्खे भाऊ होते. दोघेही भाऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जुडलेले होते आणी नियमित शाखेमध्ये जात असत. १९९० च्या अयोध्या राममंदिर आंदोलनामध्ये कारसेवा करण्याचा निश्चय दोन्ही भावांनी घेतला होता. यावेळी राममंदिर आंदोलन शिगेला पोहचले होते.

कोठारी बंधू
कोठारी बंधू

विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनावरून अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक कारसेवामध्ये भाग घेत होते. राम आणी शरद कोठारी यांनी सुद्धा २२ ऑक्टोबर १९९० रोजी कोलकत्त्याहून रेल्वेने अयोध्येला रवाना झाले होते. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक हेमंत शर्मा यांनी शरद आणी राम कोठारी अयोध्येमध्ये पोहोचल्यापासून ते भगवा फडकावाण्यापर्यंतचा प्रवास त्यांच्या “अयोध्या के चश्मदीद” या पुस्तकात लिहिला आहे.

२०० किमी पायी चालत कोठारी बंधू अयोध्येमध्ये पोहचले होते.

अयोध्येमध्ये जाण्यापासून लोकांना थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने रेल्वे आणी बस सेवा स्थगित केली होती. आजमगढ जवळच्या फुलपूर येथे पोहचल्यावर त्यांना कळाले कि समोरचा रस्ता बंद आहे. पुढे रस्ता बंद झाला होता तरीही निराश न होता दोन्ही भाऊ पायी पायी अयोध्येच्या दिशेने निघाले.

त्यांनी पायी पायी 200 किलोमीटरचा प्रवास केला. राम आणि शरद कोठारी हे २५ऑक्टोबरला फूलपूर येथून निघाले आणि ३० ऑक्टोबरला सकाळी अयोध्येत पोहोचले. यावरूनच त्यांच्या असीम रामभक्तीची कल्पना केली जाऊ शकते.

सर्वप्रथम बाबरीवर चढणारे कोठारी बंधू

कोठारी बंधू
कोठारी बंधू

राम आणी शरद कोठारी ३० ऑक्टोबरला अयोध्येच्या विवादित परिसरामध्ये पोहोचणाऱ्या लोकांमध्ये सामील होते. त्यावेळी अयोध्येमध्ये आचारसंहिता लागू होती. उ.प पीएसी चे ३०००० जवान तैनात होते. यांना न गुमानता कारसेवकांचा एक समूह अशोक सिंघल, उमा भारती,आणी विनय कटियार यांसारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली विवादित परिसराकडे आगेकूच करत होता. ३० ऑक्टोबर पर्यंत अयोध्येमध्ये लाखोंच्या संखेने कारसेवक जमा झाले होते.

या कारसेवकांनी विवादित परिसरातील पोलीस बैरिकेडिंगची तोडफोड केली आणि ५००० कारसेवक विवादित परिसरात येऊन पोहचले. याचदरम्यान, शरद कोठारीने बाबरी मशिदीच्या घुमटावर चढून पोलिसांना चकमा दिला. त्यानंतर रामकुमार कोठारीही घुमटाजवळ पोहोचले. दोन्ही भावांनी बाबरी मशिदीच्या घुमटावर भगवा फडकावला आणी बघता बघता सर्वत्र चर्चेचा विषय बनले.

पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू

३० ऑक्टोबर रोजी बाबरीवर फगवा फडकवल्या नंतरही दोघे भाऊ अयोध्येमध्येच कारसेवा करण्यासाठी थांबले होते. त्यानंतर २ नोव्हेंबर १९९० रोजी विनय कटिहार यांच्यासोबत दोघेही भाऊ हनुमानगडी जात होते. परंतु रस्त्यामधेच पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दोघेही भाऊ पोलिसांच्या गोलीबारापासून बचाव करण्यासाठी लाल कोठी गलीच्या एका घरामध्ये लपून बसले होते. थोड्याच वेळाने पोलीस जेंव्हा त्या घरासमोर आली तेंव्हा दोघेही कोठारी बंधू पोलिसांच्या गोळीचा शिकार झाले. गोळी लागल्यानंतर त्यांचा जागीच जीव गेला. त्यांच्यासोबत अन्य  १६ जन गोळीबारात मरण पावले होते.

बहिणीचे लग्न बघू शकले नाही दोघेही बंधू

कोठारी बंधू
कोठारी बंधू

राम कुमार आणि शरद कोठारी यांची बहीण पौर्णिमा कोठारी यांचे डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात लग्न होणार होते. रामकुमार आणि शरद कोठारी यांनी त्यांचे वडील हिरालाल कोठारी यांना कारसेवा करण्याची परवानगी मागितली तेंव्हा त्यांनी नकार दिला. एवढे बोलल्यावर हिरालाल यांनी दोन्ही भावंडांना तातडीने अयोध्याहून परत येण्याच्या अटीवर जाण्यास परवानगी दिली.

हिरालालजी यांनी आपल्या दोन्ही मुलांना आपली खुशाली पोस्टकार्डाने कळवत राहण्यास सांगितले. दोघेही कोठारी बंधू आपल्या बहिणीला पत्र पाठवत असत.दोघांच्या मृत्यूंची वार्ता जेंव्हा कोलकत्ता येथे पोहचली तेंव्हा त्यांच्या परिवारामध्ये सन्नाटा पसरला होता. पोलिसांनी दोन्ही भावांचे प्रेत परिवारास देण्यास नकार दिला.राम कुमार आणि शरद कोठारी यांच्या मोठ्या भावाने शरयू नदीच्या किनाऱ्यावर त्यांच्यावर अंतिम संस्कार केला.

कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ काही दक्षिणपंथी संघटनांनी २ नोव्हेंबर ला शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे. २०१५ मध्ये कोठारी बंधू यांची बहिण पोर्णिमा कोठारी आपल्या भावांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त एक कार्यक्रम करणार होती परंतु तत्कालीन अखिलेश सरकारने या कार्यक्रमास परवानगी नाही दिली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : पाकिस्तानमधील प्रसिद्ध हिंदू मंदिरांविषयी तुम्हाला माहिती आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here