आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

जाणून घेऊया बिहार मध्ये पूर येण्यासाठी जबाबदार असणाऱ्या काही गोष्टींबद्दल सविस्तर……

वर्षाचे मध्यवर्ती महिने भारतासाठी नैसर्गिक संकटांचा काळ म्हणून ओळखले जातात. सुरुवातीस काही राज्य कडक उन्हामुळे त्रस्त असतात. त्यानंतर मान्सून मध्ये पुराचे तडाखे सहन करतात. मग त्यामुळे लाखो लोक बेघर होतात तर हजारो हेक्टर पिके उध्वस्त होतात. गेल्या २० वर्षात भारतात ५४७ लाख करोड रुपयांचे नुकसान झाले आहे.

पुरामुळे दरवर्षी सर्वात जास्त बिहार मध्ये नुकसान होते. दरवर्षी केंद्र आणी राज्य सरकार पूर येऊ नये यासाठी अनेक घोषणा करतात परंतु पावसाला सुरु होताच त्या नेत्यांच्या घोषणा याच पुरामध्ये वाहून जाताना दिसतात. आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेऊया बिहार मध्ये पूर येण्यासाठी जबाबदार असणाऱ्या काही गोष्टींबद्दल सविस्तर……

Floods, a deadly annual feature – How long before it sinks in

 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बिहारमध्ये पुराने हाहाकार माजवला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बिहारमध्ये यावर्षी वीज पडून १००+ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच पुरामुळे शेकडो लोकांना आपला
जीव गमाववला आहे. लाखो लोकांचे जीवन या पुरामुळे प्रभावित झाले आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या पुराच्या या समस्येवर सरकारचे अनेक घोषणा केलेली असतानाहि परिस्थिती जशास तशीच आहे. गेल्या ४० वर्षापासून म्हणजेच १९७९ पासून बिहारमध्ये सतत पूर येत आहेत. बिहार सरकारच्या जलसंपदा विभागाच्या मते, दरवर्षी राज्यातील ६८८०० चौरस किलोमीटर प्रदेश पूरात बुडतो.

चला जाणून घेऊया बिहार दरवर्षी पूरात का बुडतो याचे करणे.

१ ) नेपाळ मधून येणारे पाणी. 

गेल्या अनेक दिवसांपासून बिहार आणि नेपाळच्या सीमा भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. उत्तर बिहारमधील अररिया, किशनगंज, फर्बिसगंज, पूर्णिया, सुपौल, मधुबनी, दरभंगा आणि
कटिहार जिल्ह्यात पूरचे पाणी शिरले आहे. कोसी, कमला, बागमती, गंडक, महानंदासह उत्तर बिहारच्या सर्व छोट्या-मोठ्या नद्यांच्या काठावरील शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. नेपाळमध्ये जेव्हा जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा
नेपाळ त्याच्या धरणाचे दरवाजे उघडते. यामुळे नेपाळला लागून असलेल्या बिहारमधील जिल्ह्यांमध्ये पूर येतो.

२ ) फराक्का धरणामधून सोडले जाणारे पाणी

बिहार

फराक्का धरण बनल्यानंतर बिहारमध्ये नदींचा कटाव वाढला आहे. गंगा नदीच्या उपनद्या घेऊन येणाऱ्या गाळामुळे हि समस्या निर्माण होत आहे. कोसी, गंडक आणि घाघरा या बिहारमधील हिमालयातून येणाऱ्या गंगेच्या उपनद्या मोठ्या प्रमाणात गाळ घेऊन येतात. तो गाळ गंगेमध्ये जमा होतो यामुळे आजूबाजूच्या भागात पाणी पसरण्यास सुरवात होते. नदीत गाळ नसल्यास आणि पाण्याचा प्रवाह कायम राहिल्यास अशी समस्या येणार नाही.

३ ) तटबंदीची कमी

१९५४ मध्ये बिहारमध्ये १६० किमी तटबंद होता. त्यावेळी २५ लाख हेक्टर जमीन पुरामुळे प्रभावित झाली होती. आजच्या वेळी येथे ३७०० किमी तटबंदी केलेली असताना पुराचे प्रभावित क्षेत्र वाढून ६८.९० लाख हेक्टर झाले आहे. ज्याप्रमाणे
पुरामध्ये दरवर्षी वाढ होत आहे त्याप्रमाणे तटबंदीची निर्मिती होत नाहीये. त्यामुळेच हे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.

४ ) पाणलोट क्षेत्रांमध्ये होणारी झाडांची कत्तल

बिहार

 

बिहारमधील पाणलोट क्षेत्रात निरंतर वृक्ष तोडण्याची घटना सुरू आहे. यामुळे, पाणलोट क्षेत्रात पाणी थांबत नाही. कोसी नदीचे पाणलोट क्षेत्र ७४०३० चौरस किमी आहे. त्यापैकी ६२६२० चौरस किमी नेपाळ आणि तिबेटमध्ये आहे. बिहारमध्ये फक्त ११४१० चौरस किमी क्षेत्रच आहे. पर्वतांवर असलेल्या नेपाळ आणि तीब्बेत येथे जेंव्हा जास्त प्रमाणात पाऊस पडतो तेंव्हा ते पाणी पाणलोट क्षेत्रामध्ये वाहत बिहारमधील खालच्या भागातील पाणलोट क्षेत्रात पोहचते. झाडे नसल्यामुळे हे पाणी पाणलोट क्षेत्रात थांबत नाही आणि लोकसंख्या असलेल्या भागात पसरते.

५ ) बिहारचे भौगोलिक स्थान पुरासाठी जबाबदार

बिहारमध्ये दरवर्षी नद्या विनाशकारी बनतात. शेकडो लोक मरतात, यासाठी हजारो करोड रुपये खर्च केल्या जातात परंतु परिस्थिती काही केल्या बदलत नाही. बिहारमधील पुरासाठी नेपाळला जबाबदार धरले जाते. वास्तविकताः बिहारची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की ज्यामुळे पावसाचे पाणी नद्यांमधून खाली येते व त्यामुळे विनाश होतो. नेपाळमधील कोसी नदीवर धरण बांधले गेले आहे. हे धरण भारत आणि नेपाळच्या सीमेवर असून १९५६ मध्ये बांधले गेले होते. या धरणासंदर्भात भारत आणि नेपाळ यांच्यात एक करार आहे. कराराच्या अंतर्गत, कोसी नदीतील पाणी नेपाळमध्ये जास्त झाल्यास नेपाळ धरणाचे दरवाजे उघडते आणि इतकेच पाणी भारताच्या दिशेने सोडल्या जाते जेणेकरून धरणाचे नुकसान होणार नाही

बिहारमध्ये १९७९ पासून आतापर्यंत पुरामुळे झालेले नुकसान

बिहार

पुरासंबंधित विविध कारणांमुळे आजपर्यंत ८५७० लोक मरण पावले आहेत. तसेच २५७७६ जनावरे आणि प्राणी मारले गेले आहेत. ७.७० कोटी हेक्टर जमीन पूराच्या पाण्यात बुडाली आहे. ३.७४ कोटी हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले पीक निकामी झाल्यामुळे ७९६९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच १.१५ कोटी घरांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक इमारती पडल्यामुळे ४१५१ कोटींचे नुकसान झाले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : पर्यावरणातील सर्वात मोठी समस्या… निर्वनीकरण!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here