आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जलप्रदूषण आणि अस्वच्छता

आजच्या वेळी अन्न, वस्त्र, निवारा यासोबत साफ आणी स्वच्छ पाणी हि चौथी गरज अत्यंत महत्वाची आहे. पिण्यासाठी साफ पाणी मिळणे हे पण खूप कठीण झाले आहे. आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊया…

 

new google

जलप्रदूषण आणि आपल्या सभोवताली असणारी अस्वच्छता यामुळे मानवी जीवनावर होणारे नुकसान याबद्दल.

 

जगामध्ये यापूर्वी १७२०, १८२० , आणि १९२० मध्येसुद्धा कोरोनासारखी महामारी पसरली होती. त्यामुळे करोडो लोकांना आपल्या जीवाला मुकावे लागले होते. आता सध्या कोरोना व्हायरस मुळे जगाला किती नुकसान झाले याबद्दल अंदाजही लावू शकत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या आटोक्यात आला आहे. भारतीयांनी यापुर्वीपण १९४० मध्ये हैजा च्या रूपाने एक महामारी बघितली आहे त्यामुळे या महामारीतूनही आपण लवकरच बाहेर पडतील असा समज आहे.

 

 

१९९४ मध्ये प्लेगच्या साथीने भिऊन गुजरातमधील अनेक शहरे लोकांनी सोडून ओसाड पडली होती. काही जागी तर वैद्यकीय कर्मचारी पण पळून जात होते. एका अहवालानुसार १९९४ मध्ये प्लेगमुळे आपल्या देशात १८०० करोड रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. या महामाऱ्यांचा संबंध कुठे न कुठे स्वच्छतेशी येतो.

 

 

स्वच्छतेसाठी साफ पाणी पाहिजे. म्हणूनच ह्या महामाऱ्यांना आपण जलप्रदूषण कारणीभूत आहे असेही म्हणू शकतो. परिस्थिती जर अशीच राहिली तर अस्वच्छता आणि जल प्रदूषण हे पण आता महामारी म्हणून घोषित करावे लागतील.

 

जलप्रदूषण
जलप्रदूषण- युवाकट्टा

 

१३० कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या आसलेला आपला देश विविधतेने नटलेला आहे. कधी एके काळी पाणीच पाणी म्हणून ओळख असलेला भारत आज जल प्रदूषण आणी जल संकटांशी झुंजत आहे. जलसंसाधन मंत्रालयानुसार देशातील १७ कोटी ७८ लाख ३१ हजार लोकांना प्रतिव्यक्ती ४० लिटर पेक्षा कमी पाणी मिळत आहे. तसेच ३ कोटी १ लाख ६८ हजार ग्रामीण भागातील लोक प्रदूषित पाणी पीत आहेत. मतदानाच्या वेळी मोठ्यामोठ्या गोष्टी झाडनाऱ्या नेत्यांसाठी हि खूप लज्जास्पद गोष्ट आहे.

 

एकेकाळी भारतामध्ये २४ लाख छोटे मोठे तलाव अस्तित्वात होते, परंतु आजच्या वेळी यामधले जवळपास २ लाखच तलाव अस्तित्वात आहेत.

 

जे तलाव आज आहेत त्यांपैकी अधिकांश तलाव हे प्रदूषित झाले आहेत. भारतातील ४५०० पेक्षा जास्त लहान मोठ्या नद्या आज पूर्णतः आटल्या आहेत. वाटर फोरमच्या अहवालानुसार भारतामध्ये दररोज ४० लाख लिटर दुषित पाणी नद्यांमध्ये आणि अन्य जलस्त्रोतांमध्ये सोडले जाते , त्यामुळे जमिनीतील ७० टक्के पाणी पिण्यायोग्य नाही.

 

 

नीती आयोगाच्या एका अहवालानुसार देशातील ६० कोटी लोकांना पिण्याचे साफ पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळेच दुषित पाणी पिऊन होणाऱ्या आजारांनी भारतात दरवर्षी ३ लाख लोकांचा मृत्यू होतो. एकट्या डायरियाने २०१६ मध्ये भारतात १ लाख लोक मृत्युमुखी पडले होते. जल प्रदुशनामुळेच देशात दरवर्षी नवनवीन आजार पसरतआहेत.

 

 

जल प्रदूषण आणि जल संकटासोबातच अस्वच्छता हि आज भारताची खूप मोठी गंभीर समस्या बनली आहे. स्वच्छ भारत हे गांधी बापूंचे स्वप्न होते. त्यांच्या या स्वप्नामुळेच स्वच्छ भारत या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. या मोहिमेंतर्गत २०१४ पासून आजपर्यंत भारतात १० कोटी २८ लाख ६७ हजारपेक्षा आधीक शौचालय बांधल्या गेले आहेत.

 

 

६ लाखांपेक्षा अधिक गाव आणि ७०६ जिल्हे देशभरात उघड्यावर शौचास बसण्यापासून मुक्त झाले आहेत असे सरकारचे म्हणणे आहे परंतु याची जमिनी हकीकत काही वेगळीच आहे.अधिकांश ठिकाणी आजही उघड्यावर शौचास बसले जाते. हे सर्वांनाच माहित असेलही.

 

 

ज्या पद्धतीने शौचालयाचे बांधकाम आणि अहि सिवारचे पाणी मुरवले जाते त्यामुळे अस्वचाता आणि जल प्रदूषण वाढत आहे. कारण सिवारचे पाणी कच्या खड्यांमध्ये पाजरून जमिनीतील पाण्यात मिसळते. भारतात बहुतेक लोक फ्लश कमोडचे घाणेरडे पाणी फरसबंदी किंवा कच्च्या खड्ड्यात टाकतात.

 

 

जमिनीखालील अंध विहिरीत जाऊन त्या पाण्याची सुपीकता निरुपयोगी होते तसेच भूगर्भातील पाणीही दूषित होते. हे प्रदूषण दिसत नाही. त्यामुळे त्याची चिंताही कमी होते. सांडपाणी घाणयुक्त पाण्यामुळे होणारे जल प्रदूषण सहसा डोळ्यांपासून दूर असते. जे दिसते ते म्हणजे रस्त्यावर आणि मोकळ्या जागेत पडलेले सांडपाणी.

 

या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी स्वच्छता राखून नियमित हात पाय पाण्याने साफ करावे जेणेकरून आपण कोरोना आणि अन्य आजारांना बळी पडणार नाही. असे आव्हान करण्यासाठी जाहिरातींवर लाखो रुपयांचा खर्च केल्या जात आहे. परंतु जेथे साफ पाणी नाही तेथे पाण्याने हात धुल्याने काय परिणाम पडेल? हि विचार करण्यासारखी गोष्ठ आहे.

 

 

ज्याठिकाणी पाणी पिण्यासाठी उपलब्ध नाही त्याठिकाणी हात पाय धुण्यासाठी पाणी कुठून आणणार? तसेच शौचालयासाठी जास्त पाणी लागते ते पाणी आणणार तरी कुठून असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत.

 

 

अनेक झोपडपट्टी परिसरामध्ये अनेक लोक उघड्यावरच बसतात यांचा बंदोबस्त सरकार आजपर्यंत करू शकलेली नाही. अस्वच्छता पसरन्यामागे नगर निगमचाही तेवढाच हातभार आहे , कारण कचऱ्याची  विल्हेवाट लावणाऱ्या प्लांटची कमतरता  असल्यामुळे या कचऱ्याला डम्पिंग ग्राउंड मध्ये फेकल्या जाते. हाच कचरा नदी नाल्यामधेही पसरतो. दिल्लीचे कचऱ्याचे डोंगर पूर्ण जगामध्ये प्रसिध्द आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये महामारी पासून संरक्षण करणे हि खूप मोठी गोष्ठ आहे.

 

 

याशिवाय मेंदू ज्वर, पित्त विकार, कॅन्सर , कावीळ त्वचा रोग, अस्थिव्यंग, मतिमंदत्वासारखे भयंकर आजार दूषित पाणी सेवनाने जाणवतात. सध्या ग्रामीण भागात सांधे व गुडघेदुखीसारखे प्रकार व कॅन्सरसारखे भयानक आजार जडू लागले आहेत. तसेच पाणी प्रदूषित झाल्यामुळे आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाण्याचे सेवन आपण करत नाही हे कारण पोटदुखी, मुतखडा यासारख्या आजारांना आयतेच निमंत्रण आहे.

 

जलप्रदूषण
जलप्रदूषण

 

जर आपल्याला भविष्यामध्ये या महामाऱ्यापासून  बचाव करायचा असेल तर जलसंकट , जलप्रदूषण आणि अस्वच्छतेला महामारी घोषित करावे लागणार  आहे. महामारींसाठी एखादे औषध निघाले कि तिचा प्रादुर्भाव कमी होतो परंतु जल प्रदूषण आणि अस्वच्छता हे दिवसेंदिवस वाढतच आहे.

 

जर आपण वेळेवर यावर प्रतिबंध नाही लावला तर हि परिस्थिती आणखीच बिकट होऊ शकते. ज्याप्रमाणे कोरोनाशी लढतांना आपण एकजुटता दाखवत आहोत त्याचप्रमाणे आपण सर्वांनी एकत्र येऊन जल प्रदूषण आणि अस्वच्छता यांच्याशी लढावे लागणार आहे. पर्यावरण संरक्षणाला प्राथमिकता देऊन आपण सुरक्षित राहू शकतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : निर्वानिकरन : पर्यावरणाची सर्वांत मोठी समस्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here