आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

अश्वत्थामा ते बिभीषण पौराणिक कथांतील ह्या ८ व्यक्ती आहेत अमर? घ्या जाणून इतिहास..!


 

पौराणिक कथांमधील अनेक पात्र ही काल्पनिक असू शकतात. असं काहींचे मत आहे. तर काही जणांना त्या सर्वांचा खर असण्याचा विश्वास आहे.  तसेच “अमर होणं” ही गोष्ट सुद्धा काही जणांना विश्वास न ठेवण्यासारखी वाटते, तर काही
उदाहरणे आणि कथा ऐकून त्यावर विश्वास ठेवणारी मंडळी सुद्धा येथे आहेतच.

विश्वास ठेवायचा का नाही हे  ज्यांचे त्यांचे मत असू शकते. त्यांच्या त्यांच्या विचारशैली वरती अवलंबून आहे.
परंतु आज आम्ही तुम्हाला अश्या काही लोकांबद्दल सांगणार आहोत, जे काही लोकांच्या मते आमर आहेत, आणि अजूनही ते मेले नाहीयेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…

new google

मार्कंडेय :

अमर
महादेवांचा परमभक्त मार्कंडेय हे सुद्धा अमर असल्याचे म्हटले जाते. भगवान शिव यांची कठोर उपासना आनी महामृत्युंजय सिद्धीमुळे मार्कंडेय यांना अमरत्व प्राप्त झाले होते. त्यामुळे ते आजसुद्धा जिवंत आहेत असं म्हटलं जाते.

वेद – व्यास :

अमर

चार वेदांचे निर्माते असलेले वेद व्यास हे त्यांना मिळालेल्या वरामुळे ते अमर झाले आहेत. व्यास हे 18 पौराणिक ग्रंथांचे रचनाकार आहेत. ते अमर असल्याचा दावा अनेक ठिकाणी करण्यात आला आहे.

परशुराम :

परशुराम हे श्रीविष्णूंच्या अवतारातील एक अवतार आहेत. ज्यांनी क्षत्रियांचा संहार केला होता. परशुराम यांना अमरत्व प्राप्त झाले होते.
त्यामुळे ते आजही मृत्यू पावले नाहीयेत असं म्हटलं जाते.

हनुमान :

अमर

श्रीराम यांचे परमभक्त महाबली हनुमान हे सुद्धा अमर असल्याच म्ह्टले जाते. अमर असल्यामुळे आजही त्यांचा मृत्यू झाला असल्याचा पुरावा कुणालाही सापडलेला नाहीये. त्यामुळे ते अमर आहेत असच समजलं जाते.

राजा बळी :

अमर

भक्त प्रल्हादाचा वंश असलेले राजा बळी हे सुद्धा अमर असल्याच म्हटलं जाते.
एका ठिकाणी केल्या गेलेल्या दाव्यामध्ये वामन अवतारात असलेले भगवान विष्णू यांना सर्व संपत्ती दान करून ते स्वतः अमर झाले असं म्हटलं जाते. परंतु यावर विश्वास ठेवणे हं जरा अवघडच आहे असच दिसतंय.

अश्वधामा :

अमर

महाभारतातील कौरव आणि पांडव यांचे गुरु  द्रोणाचार्य यांचा मुलगा ” अश्वथामा ” हा आजही जिवंत असल्याचे म्हटलं जाते. शास्त्रामध्ये हा अमर असल्याचे म्ह्टले जाते. आजही एका डोंगरावरती जंगलात अश्वथामा येत असल्याचे अनके वेळा म्हटले गेले आहे.

कृपाचार्य :

अमर

युद्धनितीमध्ये कुषल व निपूर्ण असलेले गुरु कृपाचार्य हेसुद्धा पांडव आणि कौरवांचे गुरु होते. त्यांना मिळालेल्या वरामुळे तेसुद्धा अमर आहेत असं म्हटलं जाते.

बिभीषण :

 

रामायणातील रावनाचा भाऊ “बिभीषण ” हासुद्धा अमर असल्याचे म्हटलं जात. अधर्माची साथ सोडून यांनी धर्माच्या बाजूने युद्धात साथ दिल्यामुळे बिभीषण अमर असल्याचे म्हटलं जाते. कुठेही बिभीषण यांच्या मृत्यूचे पुरावे नाहीयेत.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : अश्वधामा आजपर्यंत जिवंत आहे, वाचा सविस्तर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here