आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

कॅप्टन विक्रम बत्रा : कारगिल युद्धात पहिला विजय मिळवून देणारा जवान!


सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीच्या ‘शेरशाह’ या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपली आणि हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाला आहे. ‘शेरशाह’ हा कॅप्टन विक्रम बत्राचा बायोपिक आहे. या चित्रपटात सिद्धार्थ कॅप्टन विक्रम बत्राच्या भूमिकेत दिसला आहे. चित्रपटाला खूप पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे.

कॅप्टन विक्रम बत्रा यांची खरी कहाणी ..

कॅप्टन कालिया यांना मारल्यानंतर पाकिस्तानी सैन्याला उत्तर देण्यासाठी भारतीय सैनेकडून कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या टीमला शिखरावर पाठवण्यात आले होते.

 कॅप्टन विक्रम बत्रा

यांच्या टीमसाठी वर जाणे सोपे नव्हते, कारण पाकिस्तानी सैनिक अगोदरच उंच ठिकाणी होते. तेथून ते खालून येणाऱ्यांवर सहजरित्या हल्ला करू शकत होते. तरीसुद्धा कॅप्टन विक्रम यांच्या टीमने वरती जाण्याचा निर्णय घेतला.
विक्रम बत्रा 13 जम्मू आणि काश्मीर बटालियन मध्ये होते. त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या टीमला कारगिलच्या टोकावर पॉईंट नंबर 5140 वरती कब्जा करण्यास सांगण्यात आले.

विक्रम बत्रा यांचा जन्म 9 सप्टेंबर 1974 मध्ये झाला होता. लहानपनापासूनच त्यांना देशभक्तीची आवड होती. बत्रा यांनी त्यांच्या ट्रेनिंग मधेच सिद्ध करून दाखवले होते की ते एक जाबज  सैनिक होते. दुश्मनांसाठी विक्रम बत्रा हे एका प्रकारे यमराजच होते. कारगिल युध्दातील वीर, कॅप्टन विक्रम बत्राचा जन्म ९ सप्टेंबर १९७४ रोजी पालमपुर इथे झालेला.

कॅप्टन विक्रम बत्रा

विक्रम बत्रा असे ऑफिसर होते, ज्यांनी कारगिल युद्धात अभूतपूर्व पराक्रम गाजवून वीरगती प्राप्त केली, ज्यानंतर त्यांना भारतीय सैन्यातर्फे दिला जाणारा वीरता अवॉर्ड म्हणजेच परमवीर चक्रानेही सन्मानित करण्यात आले होते. आज आपण त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊ. पालमपुरमध्ये जीएल बत्रा आणि कमलकांता बत्राच्या घरी ९ सप्टेंबर १९७४ ला दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला. त्यांनी दोघांचे नाव लव – कुश ठेवले.

लव म्हणजे विक्रम आणि कुश म्हणजे विशाल. सुरवातीच्या काळात शिकण्यासाठी विक्रम कोणत्याच शाळेत गेले नाहीत. त्यांचा शालेय अभ्यास हा घरीच व्हायचा आणि त्यांची शिक्षिका त्यांची आईच असायची.

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या टीमला फक्त रात्रीच क्रॉलिंग करत वरती जावे लागणार होते,दिवसा तसा प्रयत्न केल्यास पाकिस्तानी सैन्याला ते सहज  दिसले असते आणि त्यांच्या अडचणीत वाढ झाली असती. रात्रभर काळोख्या अंधारात क्रॉलिंग करत वरच्या बाजूने चढणे तस पाहता सैन्यासाठी फारच अवघड गोष्ट होती.

विक्रम बत्रा आणि त्यांच्या साथीदारांच्या जोशाने रात्रभर क्रॉलिंग करत हे काम पूर्ण केले. 20 जूनच्या रात्री हे सर्व सैनिक वरती पोहचले. परंतु वरती चढताना पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात बरेच सैनिक जखमी झाले होते.

 कॅप्टन विक्रम बत्रा

कॅप्टन विक्रम यांनी निश्चय केला की ते पॉईंट नंबर 5140 वरती बंकर मध्ये असलेल्या पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करणार.. त्यांनी बंकरवरती ग्रेनेड आणि फायरिंग करण्यास सुरवात केली. दोन्ही साईटने होत असलेल्या फायरिंगमध्ये अनेक सैनिक मारले गेले. शेवटी कॅप्टन विक्रम यांना पॉईंट 5140 वरती कब्जा करण्यात यश आले. त्यांनी तेथील सर्व पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला.

पहाडीवर भारताचा हा पहिला विजय होता.कॅप्टन बत्रा यांनी भारतीय सैन्याला वायरलेस द्वारे निरोप दिला की त्यांच्या टीमने पॉईंट 5140 वरती यशस्वीरित्या कब्जा केला आहे.

लगेच भारतीय सैन्याकडून त्यांना पॉईंट 4875वरती कब्जा करण्याचे आदेश देण्यात आले. आणि त्यांनी ते स्वीकारले. कॅप्टन बत्रा यांची तब्येत ठीक नसताना सुद्धा त्यांनी साथीदारांसह पॉईंट 4875 कडे चढाई करण्यास सुरवात केली.

वरती बसलेल्या पाकिस्तानी सैन्याला त्याची चाहूल लागली आणि त्यांनी वरूनच बत्रा यांच्या साथीदारांवर गोळीबार करण्यास सुरवात केली.  कॅप्टन बत्रा आपल्या 25 साथीदारांसह वरती पोहचण्यात यशस्वी झाले परंतु वर पोहचतात पून्हा गोळीबारास सुरवात झाली. लगभग त्यांनी तेथील सर्वच पाकिस्तानी सैनिक मारले होते, परंतु एक एमएमजी लगातार त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करत होती.

त्यांच्या एका सैनिकाला गोळी लागून तो जखमी पडला होता. त्याला वाचवण्यासाठी बत्रा खुल्या जागेत येताच लपलेल्या पाकिस्तानी सैनिकाने त्यांच्या छातीवर गोळी झाडली. आणि कॅप्टन बत्रा जाग्यावरच शहीद झाले.
या पराक्रमुळे त्यांना मरणोत्तर सैन्याचा सर्वोच्च परमवीर पूरस्काराणे सन्मानित करण्यात आले होते.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :   कारगिल युद्धाची सुरवात करणारा सैनिक..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here