आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

इंटरनेट रहस्य…..

मानवी जीवनाच्या विकासामध्ये संगणकाचे (computer) खूप मोठे योगदान आहे आणी यापुढेही मानवाचे सर्व महत्वाचे आणी किचकट कामे हे संगणकाच्या सहाय्यानेच साध्य होतील. संगणक म्हणाले कि मग इंटरनेट आलेच. कंप्यूटर आणि इंटरनेटचा शोध हा मानवानेच लावला आहे परंतु कंप्यूटर आणि इंटरनेटच्या जगामध्ये आजही अशा काही रहस्यमयी घटना (Unsolved Secrets of the Internet World) आहेत. ज्यांचे रहस्य आजपर्यंत कोणीही उलगडू शकले नाही आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेऊया अशाच काही इंटरनेटच्या रहस्यांबद्दल …….

१ ) इंटरनेट ब्लॅक होल्स Internet Black Holes: इंटरनेट रहस्य

इंटरनेट रहस्य
इंटरनेट रहस्य

 

कित्तेक वेळेस आपण गुगल वर काही सर्च करतो परंतु गुगल आपल्या सर्चचा कोणताही रिजल्ट दाखवत नाही ,असे आपल्या सोबतही बऱ्याच वेळा घडले असेल. इंटरनेटच्या जगामध्ये यालाच ब्लॅक होल्स म्हणतात. ब्लॅक होल्स  ही एक अशी गोष्ट आहे जी डेटा ट्रान्सफर होण्यास अडथळा आणते. हि घटना नेमकी कशामुळे घटते याचे कारण आजपर्यंत कोणालाही कळू शकले नाही.

काही लोकांच्या मते या घटनेला डेड आई पी एड्रेस (Dead IP Address) आणी कंप्यूटर फायरवर्क हे कारणीभूत आहेत. परंतु संगणक तज्ञांच्या मते ही घटना एक मोठे रहस्यमयी कोडे आहे कारण डेटा असेच कुठेही हरवत नसतो, डेटा कुठेतरी अवश्य अस्तित्वात असतो.

अशाच ब्लॅक होल्स ची एक घटना अमेरिकेत २०१३ मध्ये उघडकीस आली होती. याठिकाणी लोकांची गुप्त आणी महत्वाची माहिती हि दुसऱ्या ठिकाणी कुठे पाठवण्यात येत होती , हे काम कोण करत होते हे आजपर्यंत एक गूढ रहस्य आहे. इंटरनेट ब्लॅक होल्सचे रहस्य आजपर्यंत कोणतीही व्यक्ती जगासमोर आणु शकली नाही.

२ ) मैरिआना वेब: 

इंटरनेट रहस्य
इंटरनेट रहस्य

प्रशांत महासागराच्या पश्चिमेला जगातील सर्वात खोल दरी मैरिआना ट्रेंच हि आहे. या दरीची खोली समुद्रतटापासून ११००० मीटर आहे. मैरिआना वेबचे नाव याच दरीवरून ठेवण्यात आले आहे. Meriana’s web हे इंटरनेटचे अशे जग आहे
जे डीप वेब (deep web)पेक्षाही खोलवर आहे.

हे आपण अशा प्रकारे समजू शकतो की , सामान्य वेबसाइटद्वारे इंटरनेटचा पहिला आणि दुसरा टप्पा शोधला जाऊ शकतो. तिसरा आणि चौथा टप्पा गडद ब्राउझर (dark Browser) हा
मानला जातो, जो (Tor Browser) टॉर ब्राउझरसारख्या विशिष्ट ब्राउझरद्वारेच शोधला जाऊ शकतो. इंटरनेटचा शेवटचा आणि पाचवा टप्पा (meriana’s web) मैरिआना वेब हा आहे.

असा समज आहे कि , आजपर्यंतचे जे सर्व मोठे गूढ रहस्य आहेत ते मग कोणत्याही गोष्टीशी संबंधित असो हे सर्व मेरियानाच्या वेबमध्ये लपलेले आहेत जेथे पोहोचणे शक्य नाही. कारण मेरियानाच्या वेबमध्ये प्रवेश करण्यासाठी क्वांटम संगणकाची (Quantum computer)आवश्यकता पडते आणी हे संघनक आजपर्यंत बनलेले नाहीत. वाशिंगटन पोस्टच्या एका अहवालानुसार अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (एनएसए) क्वांटम संगणक तयार करीत आहे. मेरीआनाचे वेब हि आतापर्यंत एक काल्पनिक संकल्पनाच मानली जाते.

३ ) CICADA 3301 puzzle: 

इंटरनेट रहस्य
इंटरनेट रहस्य

इंटरनेटच्या जगात CICADA 3301 हे रहस्य फार महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की 4CHAN नावाच्या वेबसाइटवरील वापरकर्त्याने “आम्ही हे विशेष कोडे सोडवू शकणारे हुशार लोक शोधत आहोत” हा संदेश पाठविला होता तेंव्हाच या रहस्याची सुरुवात झाली होती. २०१२ , २०१३ , १०१४ मध्ये अशे अनेक कोडे समोर आले होते.

काही लोकांचा असा विश्वास आहे की हे काम (CICADA 3301) सीआयएचे आहे ज्यांना जगातील सर्वोत्तम हॅकर्स गोळा करायचे आहेत. इंटरनेटचे जग कितीहि रहस्यमय असले तरीहि हे जग घडविण्यात माणसाचा हात आहे हे सत्य आहे. यामुळेच अशी अपेक्षा केली जाते की एक न एक दिवस एखादी व्यक्ती हे सर्व रहस्य जगासमोर ठेवील.

४ ) Webdriver Torso YouTube Channel: 

इंटरनेट रहस्य
इंटरनेट रहस्य

हे यूट्यूबवरील एक चॅनेल आहे जे यूट्यूबवर असे व्हिडिओ टाकत राहते जे कोणालाही समजत नाहीत. प्रत्येक व्हिडिओ ११ सेकंदांचा असतो. २०१३ पासून या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केले जात आहेत या व्हिडिओमध्ये केवळ निळ्या आणि लाल रंगात आयताकृती खुणा असतात ज्या वेपच्या आवाजासह स्थान बदलतात.

या चॅनेलवर एक लाखाहून अधिक व्हिडिओ अपलोड केले गेले आहेत. तसेच या चॅनेलचे  हजारो सदस्यही आहेत. गुगलने आता दावा करणे सुरू केले आहे की यूट्यूबची गुणवत्ता तपासण्यासाठी वेबड्रायव्हर टोरसो हे एकमेव चॅनेल त्यांच्याद्वारेच चालविले जाते.

५ ) Jack Froese Emails:

इंटरनेट रहस्य
इंटरनेट रहस्य

जॅक फ्रोजने एका मित्राला एक ईमेल पाठविला होता ज्यामध्ये लिहिले होते की “तो त्याच्याकडे पहात आहे आणि त्याचे घर खूपच गोंधळलेले दिसत आहे म्हणून त्याने ते साफ केले पाहिजे”. यामध्ये आश्चर्याची गोष्ठ म्हणजे फ्रोजचा हा ईमेल त्याच्या मृत्यूच्या 6 महिन्यांनंतर त्याच्या मित्राकडे आला होता .

असाच एक ईमेल जॅक फ्रोजच्या चुलतभावालाही प्राप्त झाला होता, ज्यात त्याने आपल्या चुलतभावाला सांगितले होते कि खेळताना किंवा मस्ती करताना त्याचा पाय मोडणार आहे आणि हि गोष्ट खरीही ठरली. जॅक फ्रोजच्या आईने सांगितले की जॅक फ्रोजच्या ईमेलचा कोणाकडेही पासवर्ड नाही किंवा त्याचा ईमेल हॅक झाला नाही.

या ईमेलनंतर जॅक फ्रोजकडून कोणालाही ईमेल मिळाला नाही. इंटरनेटवर अशा काही वेबसाइट्स आहेत ज्या मृत्यूनंतर लोकांना आपल्या ड्राफ्ट मध्ये सेव केलेले सर्व ईमेल पाठवतात.

या वेबसाइट्स ३०, ४५ आणि ५२ दिवसांनी आपली लॉग हिस्ट्री पाहतात. जर आपण या दिवसांमध्ये लॉग इन केलेले नसेल तर आपल्याला मृत समजून आपण जतन करुन ठेवलेले ईमेल लोकांना फॉरवर्ड करते. परंतु जॅक फ्रोजच्या बाबतीत अशा वेबसाइट्सचा वापर केल्याचा पुरावा मिळालेला नाही. जॅक फ्रोजचे ईमेल १८०दिवसांनंतर आले होते हि चमत्कारिक बाब होती.या रहस्याचा आजपर्यंत कोणालाही थांगपत्ता लागलेला नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:  हे आहेत जगातील सर्वांत खतरनाक हॅकर्स..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here