आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आपले जग म्हणजे अनेक रहस्यांचे माहेरघर आहे. यामधील रहस्ये उलगडण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. अशीच काहीशी रहस्यमय ठिकाणे आहेत जी त्यांच्या रहस्यांमुळे आपल्याला आकर्षित करतात. आजच्या लेखामध्ये आपण अशाच रहस्यमय ठिकाणांबद्दल (Mysterious Places)जाणून घेणार आहोत जिथे आपल्याला जाण्याची परवानगी नाही.

या रहस्यमय ठिकाणी जाण्याची कुणीही हिंम्मत करत नाही.

१ ) स्नेक आइलैंड ब्राजील (Snake Island – Brazil)

रहस्यमय ठिकाणे
रहस्यमय ठिकाणे

ब्राजील मधील एक महत्वाचे शहर असलेल्या साओ पाउलो पासून ३३ किमी अंतरावर स्थित आहे (Ilha da Queimada Grande) हा रहस्यमय स्नेक आइलैंड. या ठिकाणी कोणालाही जाण्याची परवानगी नाही. या लहानश्या बेटावर जगातील सर्वात विषारी साप आढळतात. येथे जवळपास ४००० पेक्षा अधिक सापांचे वास्तव्य आहे. या स्नेक आइलैंडवर जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक मानला जाणारा साप “गोल्डन लेंस हैड” हा आढळतो. या सापाबद्दल असेही म्हणले जाते कि या सापाच्या विषाची १ ग्राम  मात्रा ५० लोकांचा जीव घेण्यास सक्षम आहे.

new google

यामुळेच या स्नेक आइलैंडवर जाने जीवघेणे होऊ शकते. ब्राजीलमध्ये १९०९ मध्ये या स्नेक आइलैंड पासून जहाजांना दूर ठेवण्यासाठी एक लाईट हाउस बनवण्यात आले होते. या लाईट हाउसची देखरेख करण्यासाठी एका परिवाराला नियुक्त करण्यात आले होते. परंतु दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीमध्ये या परिवारातील सर्व सदस्य एकेदिवशी मृत अवस्थेत आढळून आले. यानंतर सरकारने लाईट हाउसला स्वयंचलित करून या आइलैंडला मानवांसाठी बंद करून टाकले.

२ ) ओकिगहारा जापान (Aokigahara Japan)

रहस्यमय ठिकाणे
रहस्यमय ठिकाणे

जपानमधील रहस्यमय ओकिगहारा जंगल हे सूसाइड फॉरेस्ट म्हणून प्रसिध्द आहे. हे जंगल फुजी या पर्वताच्या तळाशी स्थित आहे. सी ऑफ़ ट्रीज म्हणूनही या जंगलाला ओळखले जाते. हे जंगल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त आत्महत्या केल्या गेलेले ठिकाण आहे.

कित्तेक लोकांनी याठिकाणी सामुहिक आत्महत्या पण केल्या आहेत. २००३ पर्यंत या ठिकाणी १०५ मृत शरीर मिळाले आहेत. काही लोकांच्या मते या जंगलामध्ये भूत प्रेतांचे वास्तव्य आहे.

या ठिकाणी अनेक लुटापाटीच्या घटना घडल्या आहेत परंतु आजपर्यंत एकही लुटेरा याठिकाणी कोणासही दिसला नाही. या ठिकाणची सर्वात मोठी समस्या हि आहे कि, येथे मॉडर्न टेक्नॉलजी जसे कि आणि मोबईल फोन काम करत नाहीत. हा परिसर प्राकृतिक सौंदर्याने भरपूर आहे त्यामुळे या ठिकाणी अनेक हॅकर्स आणी अडवेंचर लवर्स मोठ्या संखेने भेट देतात. या ठिकाणी अनेक ३०० वर्ष जुने वृक्ष आहेत. या ठिकाणी जाण्यापूर्वी खूप वेळ विचार करावा लागेल.

३ ) पोवेग्लिए आइलैंड इटली (Poveglia Island Itali)

रहस्यमय ठिकाणे
रहस्यमय ठिकाणे

इटलीमध्ये असलेला रहस्यमय पोवेग्लिए आइलैंड हा संपूर्ण जगामध्ये आइलैंडऑफ डेथ म्हणून प्रसिध्द आहे. या ठिकाणी जाणारे कोणीही जिवंत वापस येऊ शकत नाही असा लोकांचा समज आहे. १३४८ मध्ये इटलीमध्ये रोबोनिक प्लेग पसरला होता. त्यावेळी या आइलैंडचा उपयोग आजारी लोकांना ठेवण्यासाठी आणी मेलेल्या लोकांच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी केला जायचा. काही वर्षानंतर १६३० मध्ये येथे परत ब्लैक टाइप नावाची महामारी पसरली आणि यावेळेस या आइलैंडचा उपयोग मुर्दाघर म्हणून करण्यात आला.

१९२२ मध्ये या जागेचे नवीनीकरण करून येथे एक हॉस्पिटल बनवण्यात आले. परंतु काही दिवसांनी या ठिकाणी प्लेगमुळे आजारी पडलेल्या १ लाख  ६० हजार लोकांना जिवंत जाळण्यात आले होते. म्हणूनच या ठिकाणी आत्मा भटकत असतात असेही म्हणतात. लोकांच्या आत्मा येथे भटकत असल्याच्या भीतीमुळे हे ठिकाण पुन्हा बंद करण्यात आले. आज या ठिकाणी कोणीही जाऊ शकत नाही.

४ ) सेंटिनल आइलैंड अंदमान (North Sentinel Island)

रहस्यमय ठिकाणे
रहस्यमय ठिकाणे

भारताचा एक भाग असलेल्या अंदमान निकोबार दीप समूहामध्ये रहस्यमय सेंटिनल आइलैंड स्थित आहे. भारतातील एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून हे ठिकाण प्रसिध्द आहे. परंतु या बेटावर कोणताही मनुष्य जाऊ शकत नाही, कारण सेंट नाईल ट्रॅक आदिवाशी  येथे राहतात. हे जगातील एकमेव लोक आहेत जे आजच्या वेळीसुद्धा आदिमानावासारखे जीवन जगत आहेत.

बाहेरचे लोक या ठिकाणी आलेले या लोकांना आवडत नाही ज्यामुळे आयर्लंडपर्यंत पोहोचणे अवघड आणि धोकादायक आहे. या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाला. कारण जेव्हा जेव्हा कोणी या बेटाभोवती येते तेव्हा हे लोक त्यांच्यावर बाण आणि भाल्यांनी हल्ला करतात. यामुळे या ठिकाणी जाण्याची हिम्मत कोणीही करत नाही.

५ ) एरिया 51(Area 51)

रहस्यमय ठिकाणे
रहस्यमय ठिकाणे

रहस्यमय एरिया 51 यूनाइटेड स्टेट्स नावड़ाच्या दक्षिणेस स्थित आहे. या ठिकाणच्या सरकारचे म्हणणे आहे कि इथे फक्त एक एयरपोर्ट बेस आहे. हि जागा यूनाइटेड स्टेट्सच्या एयर फोर्स द्वारा १९९५ मध्ये विमानांच्या चाचण्या घेण्यासाठी बनवण्यात आली होती. एकीकडे यूएस मिलिट्रीचा दावा आहे की या जागेचा उपयोग नवीन आणि हायटेक विमानांच्या संशोधनासाठी केला जात आहे. दुसरीकडे, बरेच लोक म्हणतात की, क्रॅश झालेला यूएफओ येथे ठेवण्यात आला आहे. आणि येथे यूएफओ आणि एलियन संशोधन केले जात आहे.

हे ठिकाण १९८९ मध्ये जास्त चर्चेत आले कारण रोबर्ट लाझार याने लास वेगास न्यूज स्टेशन ला दिलेल्या मुलाखतीत असा दावा केला की एरिया 51 मध्ये एलियन स्पेसक्राफ्टला ठेवले आहे आणि त्याचा अभ्यास केला जात आहे. सैनिकी वापरासाठी एलियनचे तंत्रज्ञान पुन्हा तयार करणे हे त्याचे काम होते. याठिकाणी अणु चाचण्या घेतल्या जातात म्हणूनच या ठिकाणी कोणीही जाऊ शकत नाही.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :  ५०० पेक्षाही जास्त मानवी सांगाडे सापडलेला रूपकुंड तलाव…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here