आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
“दिल बेचारा” मुव्ही रिव्यू……
सुशांत सिंह राजपूत याचा चर्चेत असलेला शेवटचा सिनेमा “दिल बेचारा” काल रिलीज झाला. चाहते या सिनेमाची
आतुरतेने वाट पाहत होते. हा सिनेमा इंग्लिश सिनेमा “नॉवल आणि फिल्म ‘द फॉल्ट इन ऑवर स्टार्स’ वर बनवला आहे.
सुशांत सिंह आपल्या संपूर्ण जीवनामध्ये एक असा व्यक्ती बनून राहिला होता, जो सर्वांच्या आठवणीतून कधीही विसरल्या जाणार नाही. आणि हा दिल बेचारा चित्रपट सुद्धा काही वेगळा नाहीये. एका क्षणाला तर अस वाटते की त्याच्या आठवणीतून आपण कधीही बाहेर निघू शकणार नाही.
Disney+ Hotstar या डिजिटल प्लेट्फ़ॉर्मवर रिलीज करण्यात आलेल्या सिनेमाची कथा जरी तुम्हाला माहिती असली तरी सुद्धा हा सिनेमा तुम्ही नक्कीच पहिला पाहिजेत.
काय आहे चित्रपटाची कहाणी?
चित्रपटाची कथा किजी बासू या मुलीच्या शब्दातून आपल्याला पाहायला मिळते जी स्वतः चित्रपटात मुख्य अभिनेत्रीचे काम करतेय. कॅन्सर असलेल्या या अभिनेत्रीची ओळख होते ती एका बेहद मस्तीखोर व बेफिक्र जगणाऱ्रा हिरो इमैनुअल राजकुमार जूनियर म्हणजे मैनी (सुशांत सिंह राजपूत) याच्याबरोबर….
हळूहळू वाढत जाणारे दोघांचे प्रेम आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुशांत सिंह ने केलेलं सर्व प्रयत्न अस बराच काही या चित्रपटाला यशवी करण्यास मदत करतेय. हे सर्व शब्दांत सांगून आम्ही तुमचा आनंद कमी करणार नाही, त्यासाठी तुम्हाला हा सिनेमा नक्कीच पहावा लागेल.
कसा आहे सिनेमा? (Review)
जे सुशांत सिंह राजपूतचे चाहते आहेत ,ते त्याच्या जाण्याने नक्कीच दुखात असतील परंतु हा सिनेमा पाहून आणि यातील सुशांतचा अभिनय पाहून तुम्ही नक्कीच हसाल. सुशांतचा अभिनय तुम्हाला सारे दुखः विसरून त्याच्यासाठी हसायला शिकवेल. अस असल तरी सिनेमातील पहिला सीन नक्कीच प्रेक्षकांना इमोशनल करेल.
सिनेमातील मैनी ( सुशांत सिंह ) एक मस्तीखोर अतिशय त्याच्या रिअल आयुष्यात होता तसाच दाखवला आहे.सिनेमातील त्याची एक्टिंग आणि टायमिंग कमालीची आहे. त्याच्या चेहर्यावरील हावभाव , डायलॉग , आणि आवाज हे सर्व अतिशय परफेक्ट जमले आहे.
सुशांत सिंहच्या अभिनयाबद्दल तर नक्कीच आपल्या सर्वाना माहिती आहे. परंतु खरी कमाल केली आहे ती संजना सांघीने. तिचे सिनेमातील कम पाहता , कुणीही विश्वास ठेवणार नाही कि हा तिचा पहिला सिनेमा होता. एक अतिशय उत्कुष्ट अश्या सुपरस्टार अभिनेत्रीला टक्कर देईल असे काम तिने आपल्या पहिल्याच पदार्पनाच्या सिनेमात केले आहे..
किजी बसु (संजना सांघी) हि सिंगर अभिमन्यु ची खूप मोठी चाहती असते. दुसऱ्या बाजूला सिंगर अभिमन्यूच्या भूमिकेतील सैफ अली खान असतो. एका सीन पुरता आणि २ मिनटापेक्षा कमी दिसणारा रोल सैफ अली खान ने अतिशय चांगल्या पद्धतीने साकारला आहे. त्या २ मिनटातच सैफ अली खान छाप सोडून जाण्यात यशस्वी झाला आहे.
आता बोलूया सिनेमातील गाण्यांवरती.

सिनेमातील गाणे “मेरा नाम किजी, तुमन हुये मेरे तो क्या, दिल बेचारा, तारे गिन आणि खुलकर जिने का तरीका” प्रेक्षकांना मोहित करत आहे. मुझिक ए आर रहमान यांनी अतिशय सुंदर असे दिले आहे. त्याचे डायरेक्शन अतिशय उत्कृष्ट झाले आहे.
टायटल सॉंग चा वापर हा अतिशय सुरवातीलाच केला गेला आहे. टायटल सॉंग ची जागा पुरती चुकल्यासारखी वाटते. सिनेमाचे डायलॉग अतिशय इमोशनल करणारे आहेतच सोबत लोकेशन सुद्धा उत्कृष्ट आहेत.
शेवटी सिनेमातील डायलॉग “एक था राजा एक थी राणी, दोनो मर गये खतम कहाणी” प्रमाणे सुशांत कहाणी संपवून निघून जातो. .
आपल्या आयुष्यात एक अतिशय मोठ संकट असताना, आपल्या भावना व इमोशन सांभाळून जगणाऱ्या सर्वांसाठी हा सिनेमा एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
सिनेमा का पाहावा?
सुशांत सिंह चे चाहते तर हा सिनेमा नक्कीच पाहतील . परंतु आपल्या आयुष्यातील दुखः आणि वेदनांना हसत हसत कस सामोरी जायचं हे शिकायचं असेल तर हा सिनेमा तुम्ही नक्कीच पाहायला हवा.जगण्यासाठी काय हवं याचा छानसा संदेश या सिनेमाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
जरी सिनेमा भावनांवर आणि हळू हळू वाढत जाणाऱ्या त्यांच्या आजारांभोवती फिरत असला तरीसुद्धा, सिनेमाच्या शेवटी पत्राद्वारे देण्यात आलेल्या महत्वाच्या संदेशामुळे हा चित्रपट सर्वांनी नक्कीच पाहायला हवा.
सुशांत सिंह साठी या चित्रपट एक खरी श्रद्धांजली असल्यासारखाच आहे, त्यामुळे हा चित्रपट पाहणे चुकवू नका..
एकंदरीत सुशांत सिंहचा अभिनय पाहण्याची हि शेवटची संधी समजून त्याचे चाहते या चित्रपटाला यशश्वी करतील यात तीळ मात्रही शंका नाही.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा: हे आहेत जगातील सर्वांत खतरनाक हॅकर्स..!