आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

अयशस्वी आणि धोकादायक ठरलेल्या विमानांबद्दल जाणून घेऊया.


विमानांमध्ये किंवा इतीहासाबद्दल विशेष रुची असणाऱ्या आपल्या सर्वांनाच इतिहासातील नामांकित विमान डिझाइनर राईट बंधुबद्दल माहित असेलच. विमान बनवण्यासाठी राईट बंधूंना अनेक वेळा अपयशाचे तोंड बघावे लागले होते. तरीसुद्धा आपले प्रयत्न बंद न करता त्यांनी सफलरित्या विमान बनवून संपूर्ण जगामध्ये नवे कीर्तिमान बनवले होते.

विमान बनवताना अपयशी झालेल्या लोकांमध्ये राईट बंधू हे एकटेच नव्हते, विशेषतः १९५० ते १९६० च्या दशकात अनेक लोकांनी उत्तम दर्जाचे विमान बनवून दाखवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. परंतु दुर्भाग्यवस करोडोंची गुंतवणूक आणी दिवसरात्र मेहनत करूनही त्यांचे बहुतेक प्रयत्न हे अयशस्वी झाले.

आजच्या या लेखामध्ये आपण अशाच काही विमानाच्या  इतिहासातील, काही बनवल्यानंतर अयशस्वी आणि धोकादायक ठरलेल्या विमानांबद्दल जाणून घेऊया. वाचा सविस्तर……..

१ ) The Fisher P-75 Eagle

अयशस्वी आणि धोकादायक ठरलेले विमान
अयशस्वी आणि धोकादायक ठरलेले विमान

जेव्हा हे विमान बनवण्याचा विचार केला जात होता , तेव्हा प्रत्येकाला या विमानाबद्दल खूप मोठ्या अपेक्षा होत्या. हे विमान विजयाची निशाणी म्हणून बनवण्यात आले होते. The Fisher P-75 Eagle या विमानामध्ये युद्धामध्ये  उपयोगी पडणारी आणि त्याकाळची प्रसिध्द (French 75-mm) मशीनगन होती. अमेरिकेसाठी गरुड हे शुभ प्रतिक मानल्या जाते , म्हणूनच या विमानाला गरुडाचे नाव दिले होते. या विमानाला बनवण्यासाठी अनेक विमानांचे विविध पार्ट एकत्रित करून वापरण्यात आले होते.

दुर्दैवाने हे विमान लोकांच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाही. ओहायो डेटन येथील राइट पॅटरसन एएफबी येथे युनायटेड स्टेट्स एअर फोर्सच्या राष्ट्रीय संग्रहालयात बर्‍याच वर्षांपासून हे विमान प्रायोगिक विमान गॅलरीत प्रदर्शित होते. १९९९ मध्ये कर्मचार्‍यांना विमानाच्या एअरफ्रेमची मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्याचे दिसून आले ज्यामुळे संग्रहालयाला विमानाचा संपूर्ण जीर्णोद्धार करण्यास भाग पाडले. सर्व रिपेअर ची कामे होऊन हे विमान सध्या प्रायोगिक विमान गॅलरीत (Experimental Aircraft Gallery) मध्ये आहे. त्यामुळेच हे विमान एक अयशस्वी आणि धोकादायक विमान ठरले होत.

२ ) The Douglas DC-10

अयशस्वी आणि धोकादायक ठरलेले विमान
अयशस्वी आणि धोकादायक ठरलेले विमान

या विमानाचे आजपर्यंत ५५ अपघात झाले आहेत आणी यामध्ये अनेक लोकांचा जीव गेला आहे त्यामुळेच हे विमान इतिहासातील सर्वात अपयशी आणी वाईट विमानांपैकी एक आहे. या विमानाच्या दारामध्ये अनेक तृती आढळून आल्या होत्या. १९७२ मध्ये एका उड्डाणादरम्यान या विमानाचा दरवाजा हवेतच उघडला होता. अशाच घटना १९७४ आणी १९७९ मधेही घडल्या. १९७९ मध्ये टेक ऑफ दरम्यान या विमानाचा एक विंग खाली तुटून पडला होता.

अमेरिकन एअरलाइन्सच्या १९७९ मधील  flight191 च्या सर्वात मोठ्या अपघातानंतर (FAA)अमेरिकन फेडरल एव्हिएशन  अॅडमिनिस्ट्रेशनने सर्व DC-10 विमानांना उड्डाणास बंदी घातली. सुदैवाने हे विमान अधिक सुरक्षित होईल यासाठी अनेक बदल करण्यात आले. त्यामुळेच हे विमान एक अयशस्वी आणि धोकादायक विमान ठरले होते

३ ) The Bell FM-1 Airacuda

अयशस्वी आणि धोकादायक ठरलेले विमान
अयशस्वी आणि धोकादायक ठरलेले विमान

१९३७ मध्ये Airacuda हे विमान सादर करण्यात आले होते. या विमानाची विशिष्ठ डिझाईन आणी खास वैशिष्ट्यांमुळे हे विमान सर्वोत्तम ठरेल असा अंदाज होता. त्यातील एक सकारात्मक गोष्ठ म्हणजे या विमानात एक इंजिन आणि एक गन ठेवण्यात आली होती. यामुळे हे विमान फायटर जेट म्हणूनही वापरले जाऊ शकत होते.

दुर्दैवाने, हे विमान लवकरच तापले जायचे आणि गनरपासून बचाव करण्यासाठी त्याची डिझाइन खराब होती. याव्यतिरिक्त, विमानाच्या आतून गोळ्या डागल्यामुळे आतील भाग धुरामुळे भरुन जायचा त्यामुळेच हे विमान एक अयशस्वी आणि धोकादायक विमान ठरले होते

४ ) The Vought F7U Cutlass

अयशस्वी आणि धोकादायक ठरलेले विमान
अयशस्वी आणि धोकादायक ठरलेले विमान

वॉट एफ 7 यू कटलग हे युनायटेड स्टेट्स नेव्ही कॅरियर-आधारित जेट फाइटर आणि सुरुवातीच्या शीतयुद्धाच्या काळातील फायटर बॉम्बर विमान होते. हे विमान आपल्या अनन्यसाधारण डिझाइनसाठी सुप्रसिद्ध झाले होते, कारण ते त्या विमानाची शेपटी हि बाकी विमानांसारखी बांधलेले नव्हती. या विमानाच्या पंखांचे डिझाइन हे पारंपारिक पद्धतीचे नव्हते. विमानाची डिझाइन सुंदर असूनही, या विमानाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

हे विमान वेगाने प्रवास करू शकत असले तरी प्रवासादरम्यान उंचीवर जाऊ शकत नव्हते तसेच जास्त वेळ हवेमध्ये स्थिर राहू शकत नव्हते. या विमानामध्ये केवळ टेक ऑफ करण्या एव्हढेच सामर्थ्य होते म्हणूच हे विमान अनेक वेळा उडताच क्रश झाले होते. त्यामुळेच हे विमान एक अयशस्वी आणि धोकादायक विमान ठरले होते

५ ) The Convair NB-36

अयशस्वी आणि धोकादायक ठरलेले विमान
अयशस्वी आणि धोकादायक ठरलेले विमान

हे विमान एक बॉम्बर विमान होते , या विमानामध्ये nuclear reactor ची वाहतूक केली जात होती. हे विमान हे (Crusader) म्हणून देखील ओळखले जात असे. हे विमान वादळामुळे खराब झालेल्या B36 पासून तयार करण्यात आले होते. हे खास विमान अणु शक्ती चालविणार्‍या बॉम्बरची व्यवहार्यता दर्शविण्यासाठी न्यूक्लियर पॉवर एअरक्राफ्ट प्रोग्राम किंवा एनपीएसाठी तयार केले गेले होते.

अणुभट्टी हि विभक्त साखळी प्रतिक्रिया सुरू करण्यासाठी वापरली जाते, म्हणूनच तिचा वापर फक्त अणुऊर्जा प्रकल्पांसारख्या नियंत्रित ठिकाणी केला जातो. एवढे धोके असूनही ५० च्या दशकात अशीच एक अणुभट्टी विमानात बनवली होती. या विमानाने केवळ ४७ वेळच आकाशात प्रवास केला होता. प्रत्येक वेळी या विमानाच्या मार्गावर उड्डाण भरणाऱ्या प्रत्येक विमानाला याच्यापासून धोका निर्माण झाला होता. त्यामुळेच हे विमान एक अयशस्वी आणि धोकादायक विमान ठरले होते

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा: कधीकाळी भारतातून लंडनला चक्क बसने जाता येत होते ! वाचा सविस्तर…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here