आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

कॅप्टन मनोज पांडे : कारगिलच्या सर्वांत महत्वाच्या पहाडीवर कब्जा करणारा जवान…!


कारगिल युद्धात अनके जवानांच्या ववेगवेगळ्या तुकड्यांना वेगवेगळे कार्य देण्यात आले होते. जसे अगोदर कॅप्टन कालिया, कॅप्टन विक्रम बात्रा आणि सुभेदार योगेंद्र सिंह यादव यांच्या शौर्याची कहाणी आपण ऐकलीत. आता बोलूया एका अश्या सैनिकाबद्दल ज्याने पाकिस्तानी सैन्याचे बंकर अक्षरशा उखडून फेकले होते. आणि पहाडीवर तिरंगा फडकवला होता.

 

 

तो  जांबाज शिपाई म्हणजे कॅप्टन मनोज पांडे.

कारगिल युद्धात सामील झालेले कॅप्टन मनोज पांडे हे आजसुद्धा लखनऊ मध्ये अनेक युवकांचे रोल मॉडेल आहेत. त्याचं नाव आज सुधा तिथे मोठ्या आदराने घेतले जाते.कारगिल युद्ध सुरु होऊन बरेच दिवस झाले होते, भारतीय सैनिक लगातार अलग अलग तुकड्यात वर चढाई करूनमहत्वाच्या ठिकाणावर कब्जा करत होते.

हर तुकडीचे आपले एक अलग मिशन होते सर्वाना वेगवेगळ्या ठिकाणी कब्जा करायचा होता. कॅप्टन मनोज पांडे यांच्या कंपनीला सुधा असच मिशन देण्यात आले होते.

मनोज पांडे यांना आदेश देण्यात आले कि,त्यांना कारगिलची महत्वाची पहाडीबटालिक सेक्टरवरती कब्जा करायचा आहे. जेथे मोठ्या संखेने पाकिस्तानी  सैनिक घात घालून बसले होते. संपूर्ण टीम ने वर जाण्यसाठी तयारी केली. परंतु येथेसुद्धा तोच धोका होता दुश्मनांची संपूर्ण नजर खालून येणाऱ्या सैनिकावर होती.

अश्याच प्रकारे लपत लपत त्यांची पुरी टीमवर चढत होती, पाकिस्तानी सैनिक वरुन् लगातार गोळ्याची बरसात करत होते. तरीसुद्धा कॅप्टन मनोज कुमार पांडे आपल्या साठीदारंसह वर पोहचले.

वरती पोहचताच पाकिस्तानी सैन्याने परत गोळीबार सुरु केला. वर पोहचताच मनोज पांडे यांनी भारत माता की जय घोषणा देत पाकिस्तानी सैन्यावर हल्ल्या बोलला. त्यांनी बंकरमध्ये घुसुन अनेक पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. या लढाईत एकटे मनोज पांडे पाकिस्तानी सैन्यावर भारी पडत होते.

मनोज पांडे

एक एक करून सर्व पाकिस्तानी सैन्याचा खात्मा करत कॅप्टन मनोज पांडे समोर चालत होते. आणि शेवटी त्यांनी त्या बंकरवर कब्जा मिळवला तेथील सर्व पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करण्यात आला. अश्याच पद्धतीने बटालियन सेक्टर वर असेलेल्या सर बंकरवर एक एक करत कब्जा करायला सुरवात केली.

शेवटच्या ठिकाणी मात्र दुश्मनांशी दोन हात करताना कॅप्टन मनोज पांडे यांना वीरमरण आले.शहीद होण्याअगोदर त्यांनी बटालियन सेक्टर वरील लगभग सर्वच बंकर नष्ट केले होते.

असं म्हटलं जात की येथे लढाई करणारे लगभग सर्वच जवान शहीद झाले होते. जेव्हा भारतीय सैन्याची दुसरी तुकडी तेथे पोहचली तेव्हा तेथे त्यांना भारतीय झेंडा अभिमानाने फडकताना दिसला. कॅप्टन मनोज पांडे यांनी शेवटच्या क्षणी
झेंडा फडकवला होता.

जेवढे ही जवान वर पोहचले होते त्यांनी आपल्या साथीदारांच्या हिमतीची आणि शोर्याची दाद दिली.
शहीद योध्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.  कारगिल विजयात बटालियन सेक्टर वर विजय मिळवला नसता तर कदाचित युद्ध संपायला बराच वेळ लागला असता.

कॅप्टन मनोज पांडे यांच्या कामगिरीमुळे त्यांना मरणोत्तर भारतीय सैनेचा सर्वोच्च पुरस्कार परमवीर चक्राने
सन्मानित करण्यात आले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : पर्यावरणातील सर्वात मोठी समस्या… निर्वनीकरण!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here