आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

15 गोळ्या लागलेल्या असतांना सुद्धा दुष्मनांसमोर छाती काढून उभा होता हा जवान….!


देशाच्या रक्षणासाठी भारत मातेच्या अनेक जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. अनेक शूरवीर सैनिकांनी आपल्या मात्रभूमीच्या रक्षणासाठी स्वतःचे रक्त सांडवले. दुष्मनासोबत लढताना भारताच्या अनेक सैनिकांनी आपलं शौर्य  दाखवले आणि ते आजरामर झाले. याच शूर जवानांपैकी एक नाव म्हणजेच ‘योगेंद्र सिंह यादव’.

कारगिल युद्धात त्यांना 15 पेक्षाही जास्त गोळ्या लागूनसुद्धा ते पाकिस्तानी सैनिकांशी लढत होते. टायगर पहाडीवर रक्ताने माखलेल्या अंगाने हा जवान उभा होता. समोरून अनेक गोळ्या चालत होत्या. गोळ्या लागून कित्येक वेळा हा जवान खाली पडला परत तसंच अडखळत उठला परंतु त्याने हार मानली नाही. एका हाताने आपली  बंदूक चालवत राहिला. आजसुद्धा या जवानाच्या हिमतीची सर्वजण दाद देतात.

जवान

ज्यांनी आपल्या जीवावर खेळून टायगर पहाडावर तिरंगा झेंडा फडकावला होता.

साधारणतः जवानांची ट्रेनींग पूर्ण झाली की त्यांची पोस्टिंग होते. परंतु योगेंद्र सिंह यादव यांच्या बाबतीत थोडस वेगळ झाले होते. 19 व्या वर्षीचं त्यांचं ट्रेनींग पूर्ण झाले आणि त्यांना युद्धाची तयारी करावी लागली. भारतीय सैनेच्या 18 ग्रेनेड
मध्ये दाखल झालेल्या योगेंद्र सिंह यांना या गोष्टीचा थोडासाही अंदाज नव्हता की त्यांना एवढ्या लवकर कुठल्यातरी युद्धात सहभागी होता येईल.

योगेंद्र सिंह यांना कारगिलच्या टायगर पहाडावर कब्जा करण्याचे आदेश देण्यात आले. जेथे आगोदरच मोठया संख्येने  पाकिस्तानी सैनिक घात घालून बसले होते .योगेंद्र सिंह यांच्यासमोर हजारो फूट उंच चढण्याचे आणि वरती गोळा बारूद घेऊन बसलेल्या पाकिस्तानी सैन्याचे असे दुहेरी संकट होते.

त्यांच्या तुकडीत 21 जवान होते अर्ध्या रस्त्यात पोहोचतोय तेव्हाच पाकिस्तानी सैन्याला त्यांचा सुगावा लागला आणि त्यांनी हल्ला करायला  सुरवात केली. यात योगेंद्र सिंह यांचे काही साथीदार मारले गेले.

 

पाकिस्तानी सैन्याला कळल्यानंतर त्याच रस्ताने समोर जाणे म्हणजे स्वतःहून आत्महत्या कारण्यासारखं आहे हे योगेंद्र सिंह यांच्या लक्षात आले आणि त्यांनी “प्लॅनB” ची सुरवात केली.  त्यांनी दुसऱ्या बाजूने असलेल्या दगडाच्या भिंतीवरून जाण्याचे ठरवले.

दुश्मनांना थोडासाही अंदाजा नव्हता की कोणी एवढ्या मोठ्या दगडी भिंतीवरून एवढ्या वर चढून येऊ शकेल.
भिंतीवरून वर पोहचताच त्यांनी दुश्मनांच्या पहिल्या बंकरचा खात्मा केला. परंतु दुसऱ्या बंकरवर पोहचे पर्यंत त्यांचे 7 जवान उरले होते.

दुश्मनांना त्यांची भनक लागताच त्यांनी फायरिंगला सुरवात केली, असं असलं तरी नेमक त्यांच लोकेशन दुश्मनी सैन्याला माहित नव्हते त्यामुळे ते थोडावेळ शांत बसले. पाकिस्तानी सैनिकांना वाटले की एवढ्या मोठ्या फायरिंग मध्ये बहुतेक सर्वजण मारले गेले असावे त्यामुळे त्यांनी फायरिंग थांबवून त्यांच्याकडे जाण्यास सुरवात केली.

इकडे योगेंद्र सिंह आपल्या ईतर साथीदारांसह पोझिशन घेऊन तयार होते. जसे ते जवळ येताच एकदम सर्वांनी हल्ला केला. त्यात 1 पाकिस्तानी सॊडून बाकी सर्वजण मारले गेले.

तो एक सैनिक दुसऱ्या बंकरमध्ये जाऊन तेथ सैनिकांना योगेंद्र सिंह यांच लोकेशन आणि किती जण आहेत यांची माहिती दिली, आणि परत पाकिस्तानी सैन्यांनी तेथे हल्ला केला.  पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात योगेंद्र सिंह यांच्या नाकाला खूप मोठी जखम झाली. लगभग नाकातून रक्त वाहत होते.

त्यांनी आपल्या साथीदाराला मेडिकल किट मागितली, साथीदाराने सांगितले की आता फक्त आपण दोघेच उरलो आहोत. आणि तेवढ्यात एक गोळी त्यांच्या साथीदाराच्या डोक्यातून आर -पार निघाली.  आणि ते जाग्यावरच पडले. योगेंद्र सिंह यांना काही कळायच्या आतच दुसरी गोळी त्यांच्या हाताला चाटून निघून गेली. पाकिस्तानी सैनिक तेथे पोहचले होते.

पाकिस्तानी सैनिक तेथील मेलेल्या भारतीय सैनिकांवर सुद्धा गोळ्या झाडत होते. त्यातील एक सैनिक योगेंद्र सिंह यांच्या जवळ आला तेव्हा त्यांनी मरायचे नाटक केले. पण त्या सैनिकाने त्यांच्या पायांवर गोळ्या झाडल्या आणि तरी सुद्धा त्यांच्या तोंडून आह सुद्धा निघाले नाही. नंतर दुष्मनाने त्यांच्या छातीत गोळी घातली. असं वाटलं होत की ते आता वाचू नाही शकणार, परंतु त्यांनी आपल पॉकेट वरच्या खिशात ठेवले होते ज्यात 5 रु चे शिक्के होते, ती गोळी त्याच शिक्याना लागली होती.

काही वेळांनंतर जेव्हा त्यांना होश आला तेव्हा त्यांनी पाहिले की काही पाकिस्तानी सैनिक अजूनसुद्धा तेथेच आहेत. ते त्यांच्या साथीदारांना संदेश देत होते की आम्ही पून्हा पहाडीवर कब्जा मिळवला आहे.

जवान

ही ती महत्वाची पहाडी होती, जिथे परत पाकिस्तानी सैनिक आले असते तर खालून येणाऱ्या अन्य भारतीय सैनीकांना त्यांना सहज मारता आले असते. आणि भारतात टायगर हिलवर कब्जा करणे अवघड झाले असते. तेव्हाच योगेंद्र सिंह यांनी आपल्या बाजूला पडलेला एक ग्रेनेड उचलून त्याच्यावर फेकला आणि ते तिन्ही दुश्मन जाग्यावर ठार झाले.

हात तुटलेला असताना सुद्धा लढत राहिले…

त्यांनी जसे उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्य लक्षात आले की त्यांचा एक हात लगभग तुटून वेगळा होण्याच्या मार्गांवर आहे. अश्या स्थितीत त्यांनी हाताला झटका देऊन पहिला तर तो तुटला नाही त्यामुळे त्यांनी हात बेल्टच्या सहाय्याने कंबरेला बांधला. आणि पाकिस्तानी सैन्य तिथे पोहचण्याचा अगोदर बंदूका निशाण्यावर लावल्या.

जसे दुश्मन समोर येऊ लागले तसें त्यांनी वेग वेगळ्या ठिकाणावरून रायफल. चालवन्यास सुरवात केली. होणारी फायरिंग पाहून पाकिस्तानी सैन्याला वाटले की भारतीय सैनेची ल दुसरी तुकडी त्या ठिकाणी पोहचलेली आहे. आणि त्यांनी तेथून मागे हटण्याचा निर्णय घेतला.

योगेंद्र सिंह चालून खाली जाण्याच्या परिस्थिती नव्हते तर त्यांनी एका नाल्यावाटे घसरत खाली जाण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत दुसरी भारतीय जवानांची दुसरी तुकडी खाली पोहचली होती त्यांनी योगेंद्र सिंह यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. आणि त्यांचावर तेथे ऑपरेशन करण्यात आले. तोपर्यंत इकडे दुसऱ्या तुकडीने पूर्णपणे पहाडीवर कब्जा केला होता. आणि भारतीय झेंडा तेथे अभिमानाने फडकत होता.

योगेंद्र सिंह भारतीय जवानांच्या त्या खास यादीत आहेत,ज्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. आजसुद्धा ते भारतीय सैन्यात असून सुभेदार पदावर कार्य करत आहेत.

त्यांचा हा पराक्रम वाचून तुम्हाला नक्कीच त्यांच्यावर गर्व होईल. जय हिंद.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा: कारगिल युद्धाची सुरवात करणारा सैनिक

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here