आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

मध्यप्रदेशच्या हत्ती महालाविषयीच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील “धार” जिल्ह्यात असलेला मांडू शहराचा हत्ती महाल सर्वांत जास्त प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हा महाल आपल्या शानदार इमारती आणि विशाल रचना यासाठी भारतातच नव्हे तर सर्वदूर प्रसिद्धीस आला आहे. या महालापासून १०० किमीच्या अंतरावर काही प्राचीन इमारती आहेत ज्यांना ‘रॉक सिटी” नावाने ओळखले जाते.

मध्यप्रदेशच्या हत्ती महाल

विशाल हत्ती सारखा दिसणारा हा महाल एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.

हत्ती महालाचे अनेक विशाल असे स्तंभ असल्यामुळेच या महालचे नाव हत्ती महाल असे ठेवण्यात आले होते. इंडो- इस्लामिक स्थापत्य शैलीमध्ये बनवलेला हा महाल समुद्रसपाटीपासून ६०० मिटर उंचीवर आहे. भव्य दगडांनी या महालाची संरचना केली गेली आहे. या महालाला आगोदर शाही परीवारांसाठी आराम करण्यासठी बनवण्यात आले होते परंतु, नंतर याला एका सुंदर अश्यासमाधी स्थळामध्ये बदलण्यात आले .

या महालाच्या आतील आणि बाहेरील जागेवरती अनेक समाधी दिसून येतात. इस्लामी शैलीमध्ये बनवलेल्या मस्जिद सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या महालचा सर्वांत सुंदर असा भाग आहे तो म्हणजे हत्ती महालातील गाभारा.
महालाच्या आतमध्ये जे विशाल खंबे आहेत त्यांमुळे महालाचा गाभारा अतिशय सुंदर असा दिसतो आणि तो टिकून आहे.
हत्ती महाल अतिशय भव्य तर आहेच यासोबतच याला बनवणारे कारागीर सुद्धा उत्कृष्ट असतीलच..

मध्यप्रदेश

मांडू गावातील हत्ती महालाला आजून एक नाव आहे ते म्हणजे ” मांडवगड” या ऐतिहासिक अश्या स्थळाला तारांग साम्राज्यातील राजांनी बनवले होते.महाल शेवटी १६व्या शताब्दीमध्ये पूर्ण झाले होते. अस असल तरी तारंग साम्राज्यातील राजे जास्त काळ यावरती राज्य करू शकले नाही.

१८ व्या शतकापर्यंत हा महाल पर्यटकांसाठी विशेष आकर्षण बनला होता. या जागेतील “दरिया खान” यांच्या समाधीमुळे या जागेला मोठे महत्व प्राप्त झाले होते. या समाधीचालाल रंग दुरून सुद्धा लोकांना आकर्षित करत असतो.

हत्ती महालाला आता विरासत स्थळ सुद्धा म्हटले जाते. आणि पर्यटकांना हि जागा खूप जास्त पसंतीस येत आहे. हा एक गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा महाल आहे.
जो अनेक वर्षापासून इतिहासाच्या पानावर कायम आहे. हा महाल इस्लामिक वास्तुकलेच्या असाधारण स्थळांपैकी एक आहे.

मध्यप्रदेश

तुम्ही कोणत्याही वेळी हा महाल पाहण्यासाठी जाऊ शकता. अस असल तरी सकाळी८ ते रात्री ६ च्या दरम्यान असलेला वेळ हा हत्ती महाल पाहण्यासाठी अतिशय चांगला वेळ आहे.

माडु बस स्टोप पासून फक्त २ किमी अंतरावर असलेला हत्ती महाल विशाल स्तंभात आहे. हत्ती महालात प्रवेशासाठी कुठल्याही प्रकारची इंट्री फीस घेतल्या जात नाही. हा महाल सर्व पर्यटकांसाठी निशुल्क करण्यात आला आहे.
संपूर्ण महाल पाहण्यसाठी तुम्हाला लगभग २ ते ३ तास वेळ लागू शकतो.

ताजमहाल जर प्रेमाची  निशाणी असेल तर हत्ती महाल हा इस्लामिक  स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण म्हणून नावाजण्यात येईल.

जर तुम्हाला सुद्धा हत्ती महाल पाहण्यास जायचे असेल तर, तुम्ही रेल्वेने सुद्धा जाऊ शकता सर्व प्रमुख शहरातून रतलाम या शहरापर्यंत रेल्वे सुरु असतात. जर तुमचे स्वतःचे वाहन असेल तर तुम्ही उज्जैन पासून लगभग १५४ किमी अंतर कापून येथे पोहचू शकता.तसच धार पासून लगभग ३५ किमी आणि भोपाल पासून लगभग २८५ किमी वरती मांडू आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : पर्यावरणातील सर्वात मोठी समस्या… निर्वनीकरण!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here