आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या कारणांमुळे हिमालय दुनियेतील सर्वांत खतरनाक पर्वत समजल्या जातो..

पर्वतांचे उदाहरण अनके वेळा मजबुती आणि अवाढव्य उंचीकरिता दिले जाते.परंतु तुम्हाला हे माहिती आहे का भारताच्या सीमांची रक्षा करणारा  हिमालय पर्वत दुनियेतील सर्वांत कमजोर पर्वतांपैकी एक आहे. सर्वांत उंच शिखर माउंट एव्हरेस्टला आपल्यात सामावून घेतलेला हा हिमालय अनके ठिकाणी कमजोर आहे.

या शिवाय दुनियेतील सर्वांत नव्या पार्वतांपैकी हिमालयाच्या आसपास अनेक जन राहतात. याच कारण आहे ते म्हणजे हिमालयच्या पर्वत रांगातून निघणाऱ्या नद्या.

हिमालय

ह्या नद्या दुनियेच्या एकूण आबदिच्या २० % लोकांना पाणी पुरवण्याचे कम करतात.परंतु हिमालय आणि त्याच्या आस पासची जमीन आपल्या आतमध्य खूप हालचाली सांभाळून आहे, ज्या कधी मध्ये आपल्याला हिमालयात जमीनिच्या वरती सुद्धा दिसून येतात.

हि हालचाल हिमालय आणि त्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांसाठी धोकादायक ठरत आहे.या धोक्याचे कारण हिमालयाच्या बनावटीमध्ये लपलेले आहे. चला जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून कश्या पद्धतीने हिमालय ह्या धोक्यांना आपल्यात सामावून बसला आहे.

अशी झाली हिमालायची निर्मिती.

आपल्या जमिनीखाली अनेक प्रकारच्या प्लेट्स असतात ज्या गतिशील असतात. अनेक वेळा ह्या प्लेट्स एकमेकांना टक्कर खातात. ज्याचे परिणाम आपल्याला जमिनीवर सुधा दिसून येतात. हिमालायची निर्मिती अश्याच दोन प्लेटांच्या एकमेकात झालेल्या टक्करमुळे झाली आहे. हिमालयात अनेक फोल्ट लाईन आहेत, प्रत्येक फोल्ट लाईनचे दगड एकमेकांपेक्षा अलग असतात.

ह्या फॉल्क लाईन नद्यांपासून ते तिब्बल पठारापर्यंत एकमेकांना अलग करतात. या फॉल्ट लाईनमध्ये प्रामुख्याने हिमालय सेन्ट्रल थ्रस्ट, ट्रान्स हिमालय फॉल्क लाईन,लेसर हिमालयन, टेथयान हिमालयन थ्रस्ट आणि हायर हिमालयन फॉल्ट लाईन यांचा समावेश आहे.

हिमालयाच्या सर्वच फॉल्क लाईन चे दगड अलग अलग आहेत. आणि कमी दिवसाचे असल्यामुळे यातील बरेच दगड हे कमजोर सुद्धा आहेत. हिमालय पर्वत रांगांतील सर्वांत उंच शीखर हेसमुद्राच्या तळातून निघालेले आहे.

मेन सेंट्रल फॉल्ट लाईनचा हिस्सा हा अतिशय कठीण दगडांनी बनलेला आहे तर, मध्य हिमालयाचा हिस्सा भूकंपाच्या दृष्टीने अतिशय कमजोर दगडापासून बनलेला आहे. या ठिकाणी रोड आणि तलाव बनवतांना सुद्धा अधिक काळजी घेतली जाते.

हिमालय

हिमालयाचे दोन हिस्से आहेत सर्वांत कमजोर.

हिमालयाच्या 2 फॉल्ट लाईन सर्वांत कमजोर आहेत. पहिली सेन्ट्रल थ्रेट जी शिवांकित रेंज आणि गंगा नद्याना वेगळी करते. आणि दुसरी आहे “हायर हिमालयीन लाईन” म्हणजे हिमालयाचा सर्वांत उंच हिस्सा.  सेंट्रल थ्रस्ट लाईनचा हिस्सा हा  रेती आणि कमजोर दगडांपासून बनला आहे. यावर जमिनीखाली होणाऱ्या कोणत्याही हालचालींचा परिणाम सर्वांत जास्त होतो.

हिमालयाची खासियतच आहे त्याची कमजोरी?

आपण लहानपणापासून ऐकत आलोय की हिमालय चीन कडून येणाऱ्या थंड हवेपासून आपलं संरक्षण करत असतो. तसच हा हिंदी महासागरातून उठलेल्या गरम वाफांना थांबवून संपूर्ण भारतात ढगांना बारसन्यास मजबूर करतो.
हिमालयाची हीच खासियत अनेक वेळा त्याच्यावर भारी पडते.

ढगफुटी अथवा जोरात झालेल्या पावसामुळे अनेक वेळा हिमालय, जम्मू -काश्मीर, या उत्तराखंड मध्ये अनेक वेळा पहाड ढासळल्या जातात. अनेक वेळा तर येथील नद्यांच्या तेज प्रवाहामुळे सुद्धा पहाड ढासळल्याचे पहायला मिळाले आहे.

बाकी पर्वतरांगांपेक्षा हिमालय का वेगळा आहे?

भारताच्या मुख्य पर्वत रांगात हिमालय, अमरावली पर्वत रांगा यांच्याशिवाय इस्ट आणि वेस्टर्न घाट आहेत. यातील इस्टर्न आणि वेस्ट घाट हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बनलेले आहेत. तर हिमालय आणि आमरावली पर्वत हे प्लेट्स एकमेकांना धडकून तयार झाले आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे हि आवडेल- निळ्या रंगाचा लावा ओकणारा ज्वालामुखी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here