आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
महाभारताच्या युद्धात कर्ण आणि अश्वत्थामा दोन असे महायोद्धा होते जर यांच्यासोबत छळ,कपट झाले नसते तर, कौरव हे युद्ध सहज जिंकू शकले असते. जर अश्वत्थामा युद्धाच्या पहिल्याच दिवशी कौरव सेनेचा सेनापती बनवले असते तर ३/४ दिवसात युद्ध समाप्त झाले असते.
परंतु अश्वत्थामा तेव्हा सैनापती बनवण्यात आले जेव्हा कौरव युद्ध लगभग हरले होते. तरी सुद्धा त्यांनी आपल्या आफाट शक्तीच्या जोरावर रणभूमीत हाहाकार माजवला होता. अश्याच पद्धतीने जर कर्णासोबत सुद्धा छळ,कपट झाले नसते तर युद्धाचे परिणाम वेगळे असते.
या गोष्टी वरून समजते कर्णाची दानशूरता..
पावसाळयाचे दिवस होते. एका दिवशी श्रीकृष्ण आणि अर्जुन धर्मराजाकडे गेले. धर्मराजाला आनंद झाला. त्याने त्या दोघांचे स्वागत केले. त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ”राजधानीत एक महत्त्वाचे बांधकाम अचानक करावयाचे आहे.
त्यासाठी लाकडे हवी आहेत.” धर्मराजाने आपल्या सेवकांना बोलावले आणि बांधकामासाठी उत्तम प्रतीचे लाकूड आणण्याची आज्ञा केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बराच वेळ झाला, तरी सेवक काही परतले नाहीत. बऱ्याच वेळाने सेवक परत आले, तेही खाली मान घालून धर्मराज म्हणाला काय झाले ? लाकडे मिळाली नाहीत का ? सगळीकडे पाऊस पडत असल्याने सारी लाकडे भिजलेलीी होती आणि त्यामुळे सेवक लाकडे आणू शकले नव्हते. नाईलाजाने धर्मराजाने अर्जुन आणि श्रीकृष्णाला लाकडे न मिळाल्याचे कारण सांगितले. श्रीकृष्ण आणि अर्जुन परत फिरले.
त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णाकडे येण्यास सांगितले. त्याच्याकडे गेल्यावर कर्णाने त्यांना आदराने आसनावर बसवले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यावर अर्जुनाने लाकडांची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्ण म्हणाला, “एवढेच ना, मग त्यात एवढी चिंता करण्यासारखे काय आहे ?” असे म्हणून त्याने आपल्या सेवकांना लाकडे आणण्यासाठी पाठवले.
थोड्या वेळाने परत आलेले सेवक त्याला म्हणाले की, पावसाच्या पाण्याने सारी लाकडे ओली झाल्याने लाकडे मिळू शकली नाहीत. सेवकांचे बोलणे ऐकताक्षणी कर्ण आत गेला. बराच वेळ होऊनही कर्ण बाहेर येत नाही, असे पाहून अर्जुन श्रीकृष्णाकडे बघायला लागला. श्रीकृष्ण त्याला समवेत घेऊन कर्णाच्या दालनात गेला. बघतो तर काय, कर्ण आपल्या पलंगाचे पाय कापत होता. आजूबाजूला इतर लाकडी सामान तोडून ठेवलेले होते.
आता त्यांना कर्णाला वेळ का लागला, याचे कारण उमगले. अर्जुनाने विचारले, ”कर्णा, एवढ्यासाठी तू तुझे चंदनाचे कलात्मक लाकडी पलंग कशाला तोडलेस ?” त्यावर कर्ण उद्गारला, ” या वस्तू काय पुन्हा बनवता येतील; पण कुणाला आपल्याला काही देण्याची वेळ यावी आणि आपण तो क्षण गमवावा, यासारखे दु:ख कोणते असेल ?”
जाणीवपूर्वक मागण्यात आले कर्णाचे कवचकुंडल!
भगवान कृष्ण आणि अर्जुनचे पिता देवराज इंद्र हे जाणून होते कि जोपर्यंत कर्णाजवळ त्याचे कवच आणि कुंडले आहेत. तोपर्यंत त्त्याचा वध कोणीही करू शकणार नाही. तेव्हा श्री कृष्णाच्या योजनेनुसार देवराज इंद्र यांनी ब्राम्हण बनून दानशूर कर्णाकडे त्याचे कवच आणि कुंडले मागितले.
दानशूर असणारया कर्णाने आपल्या सुरक्षेचा विचार न करता कवच आणि कुंडले देवराज इंद्र यांना दान केले. निश्चितच जर कर्णासोबत हा छळ केला गेला नसता, तर कर्णाने महाभारताच्या युद्धात कौरवांना विजय मिळवून दिला असता.
कवच आणि कुंडले दान दिल्यानंतर सुद्धा शक्तिशाली होता कर्ण.
कवच कुंडले दिल्यांनतर सुद्धा कर्णामध्ये अपार शक्ती होती. युद्धाच्या १७ व्या दिवसी शल्यला कर्णाचा सारथी बनवण्यात आले. या दिवशी कर्णाने युधिष्ठिर आणि भीमाला हरवले. परंतु कुंतीला दिलेल्या वचनाप्रमाणे तो अर्जुन सोडून बाकी तिच्या एकाही पुत्राचा वध करणार नव्हता, त्यामुळे कर्णाने त्यांना सोडून दिले.
नंतर तो अर्जुनासोबत युद्ध करायला गेला. अर्जुन आणि कर्णामध्ये भयंकर युद्ध झाले. जेव्हा अर्जुन बाण चालवत असे तेव्हा कर्णाचा रथ लांब असा मागे जाते असे, परंतु जेव्हा कर्ण बाण चालवत असे तेव्हा अर्जुंनचा रथ थोडासा पाठीमागे सरकत असे. हे पाहून श्रीकृष्ण कर्णाची प्रशंसा करू लागतात. तेव्हा अर्जुन श्रीकृष्णांना विचारतात कि तुम्ही कर्णाची प्रशंसा करता आहात,ज्याच्या बाणाने आपला रथ फक्त किंचितसा मागे सरकतो आहे. तेव्हा अश्यात कृष्ण फक्त हसतात.
हनुमानाच्या कृपेने वाचला अर्जुन!

कुरुक्षेतातील युद्धाच्या शेवटच्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनला रथातून अगोदर खाली उतरन्यास सांगितले आणि नंतर कृष्ण रथातून उतरले. श्रीकृष्णाने हनुमान यांचे आभार व्यक्त केले. आणि ज्या क्षणी हनुमान रथातून खाली उतरले तेव्हा रथाला आग लागल्या गेली. हे पाहून अर्जुन हैराण झाला होता.
तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले कि हनुमानजी त्याचे दिव्य अस्त्राने रक्षण करत होते. जर त्या दिवशी हनुमान रथामध्ये बसलेले नसते तर कर्णाने निश्चितच अर्जुनचा वध केला असता.
जेव्हा कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत घुसल्या जाते, तेव्हा त्याचा फायदा घेऊन श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुन कर्णाचा वध करतो.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे हि वाचा… महाभारतातील या योद्धा आजून जिवंत आहे.