आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

स्वतः राणी अहिल्यादेवींनी या किल्ल्याला होळकर साम्राज्याची दुसरी राजधानी घोषित केली होती..


होळकर साम्राज्याची दुसरी राजधानी असलेल्या किल्ले महेश्वरची रंजक माहिती.  आजसुद्धा या गावात राणी अहिल्यादेविचेच शाषण चालते. पाहूया किल्ले महेश्वरची रंजक सफर  शब्दाच्या माध्यमातून….

स्वतः राणी अहिल्यादेवींनी या किल्ल्याला होळकर साम्राज्याची दुसरी राजधानी घोषित केली होती..

महेश्वर् हे  मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यातील इंदोरहून  अदमासे ९१ किमी वर नर्मदा नदिच्या काठावरिल एक रम्य ठिकाण आहे महेश्वर हे खूप रम्य स्थळ आहे ‘पुण्यश्लोक राणी अहिल्येच्या गावात आपले स्वागत असो’ गावाची वेस ओलांडता ओलांडताच लक्षात येते की, गावावर अजूनही राणीचे राज्य आहे.

आणि ती राणी ‘पुण्यश्लोक’ आहे. आजही महेश्वरी राणी ची राजगादी पाहावी आणि इहलोकीच्या सगळ्या दु:खापार अहिल्यादेवीच्या कर्तृत्वाचा पसारा जाणवून थक्क होऊन जावे चौसोपी पुराणकालीन वाडा काळ्या शिसवी रंगाचा अपार शांतीचा चौकात मधोमध तुळशी वृंदावन वाडय़ाला एखाद मजल्याचा डोलारा वाडय़ाची वेस ओलांडून आत यावे .

तर डावीकडे अहिल्यादेवीने जिथून न्याय-निवाडा केला, राजकारण पाहिले, ती राजगादी मांडून ठेवलेली वास्तूभोवती इतके अपार साधेपण की कुठे हंडय़ा-झुंबऱ्यांचा सोस नाहीे, कारंजांची आतषबाजी नाही की दौलतीची अतिरंजित मांडणी नाही..

राणी अहिल्यादेवी

महेश्वरचा घाट यासोबत राणी अहिल्यादेवी होळकरांची कचेरी पहायला मिळते.नर्मदेतील गोटा या ठिकाणी पात्रात व्यवस्थित दिसतो. अशाच सुंदर गोट्यांचे शिवलिंगाचे (होळकरांचे कलेक्शन) एका मंदिरात आहेत चकचकीत विविध आकाराचे आणि रंगांचे गोटे एकत्रित पहायला छान वाटले होळकर हे संस्थान खालसा झाले.

त्यामुळे राजघराण्याची विशेष शानशौकत नाही.. याशिवाय सध्याचे होळकरवंशज आंग्ल (विवाहामुळे) झाल्यासारखे आहेत या किल्याची थोडीफार दखल ते घेतात याच भागातील हातमागाचे कारखाने आहेत इथली महेश्वरी साडी प्रसिद्ध आहे..

येथे मध्यप्रदेश टुरिजम ने राहण्यासाठी चांगली व्यवस्था केली आहे त्या अतिशय धार्मीक व्रुत्तीच्या होत्या त्याची झलक त्यांच्या वाड्यात असलेल्या पुजेच्या साहित्य बघुन होते त्यांनी वास्तव केलेल्या वाड्यात त्यांच्या वापरातील वस्तु सुबक रितीने आजही पहावयास मीळतात भारतात ठिकठिकाणी त्यांनी बांधलेल्या धर्मशाळा व घाट याची ग्वाही देतात..

त्यामुळेच त्यांना पुण्यश्लोक राजमाता देवी असे नामाभिमान प्राप्त झाले.. वाडय़ाच्या मागच्या अंगाला पारंब्या नसलेल्या वडाखालच्या खोलीत अहिल्यादेवीचे देव हारीने मांडून ठेवलेले दाखविले जातात.

या वडाला पारंब्या नाहीत केवळ दोन मुळं एकमेकांत गुरफटून सर्पागत लपेटलेली आहेत,’ पुजारी सांगतो. दाखवतो, अहिल्यादेवीच्या पूजेतली शंकराची पिंडी, कृष्णाचा पाळणा. हा खंडोबा, हा अमुक, हा तमुक..

राणी अहिल्यादेवी

देवांची ओळख घडवली जाते. ज्या अपार श्रद्धेने अहिल्यादेवीनी पूजा केली असेल तेच देव आज आपल्यासमोर मांडून ठेवले आहेत ही जाणीवही नतमस्तक करते. नकळत हात जोडले जातात श्रद्धेपार उरते साध्वी राणी अहिल्या.. महेश्वरचा श्वास..

केवळ या वाडय़ावरच नाही तर एकूणच महेश्वर गावावर वाडा संस्कृतीची झलक नजरेस पडते.महेश्वरी साडीचा एक अपूर्व ठसा राणी अहिल्यादेवी गावावर उमटवून गेल्या आहेत किल्ल्यात महादेवाचे मंदिर असंख्य पायऱ्यांनी बांधून काढलेला घाट..

घाटावर छत्र्यांची गर्दी घाटावरली मुक्ताबाईंची छत्री (समाधी) मोठी त्यामानाने अहिल्यादेवीची छत्री(दहन स्थळ-समाधी ) साधी-सुधी. त्याच बरोबर किल्ल्यावर भव्य दिव्य असे श्री अहिल्यश्वेरचे मंदिर आहे..

राणी अहिल्यादेवी

ते मंदिर राणी अहिल्यादेवी होळकर यांचे छत्री मंदिर म्हणून ओळखले जाते . किल्ल्यावर श्रीमंत विठोजीराव होळकर यांची हि समाधी आहे(श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर-प्रथम यांनी बांधली) काही शतकापूर्वी बांधलेला घाट आजच्या काळातही इथल्या लोकांचे पालनपोषण करतो आहे.इंदुर् ह्या लहानशा खेड्याला भरभराटिस आणण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे.

मात्र त्यांनी आपली राजधानी ही महेश्वर येथे स्थापीत केली. त्या आपल्या प्रजेला आपल्या अपत्याप्रमाणे वागवत.येथील किल्ल्याचे आज एका अद्ययावत हॉटेल मध्ये रुपांतर झाले आहे.

नर्मदासरोवर धरणाने त्यातील नर्मदेची पातळी वाढणार आहे (वाढली आहे.) त्यामुळे राजवाड्याला धोका निर्माण झाला आहे. १३ ऑगस्ट १७९५ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांचे निधन झाल्यानंतर श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर (प्रथम) हे सन १७९५ ला गादीवर बसले..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे हि वाचा… महाभारतातील या योद्धा आजून जिवंत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here