आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
मराठ्यांचा तो सैनिक ज्याने हत्तीवर भारी पडून, कुतुबशहाला सुद्धा प्रभावित केले होते..!
स्वराज्याच्या शिलेदारांमध्ये अनेक वीर मराठे होते, ज्यांनी आपले बलिदान स्वराज्याची उभारणी करण्यासाठी दिले . महाराजांच्या एका एका शब्दांवर मावले आपला जीव ओवाळून टाकत असत.
हिंदवी स्वराज्य निर्मितीमध्ये ह्या मावळ्यांचे मोठे योगदान आहे. आज आपण पाहूया अश्याच एका मावळ्याबद्दल ज्यांनी आपल्या ताकतीची प्रचीती कुतुबशहाच्या हत्तीला हारवून दाखवून दिली होती.
१६७६ मध्ये शिवाजी महाराज दक्षिणेतील आदिलशहाला धडा शिकवण्याची तयारी करत होते, त्यासाठीच ते गोवलकोंडाच्या कुतुबशहाला भेटायला गेले होते. महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली मोगल शाही संपवण्यासाठी त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी हात मिळवणी केली.
मुगल शाही, आदिलशाही, निजामशाही अश्या साऱ्या शह्यांच्या उरावर उभं राहून स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा आलाय म्हणून लोकांनी खूप गर्दी केली. तिथे पोहचल्यावर कुतुबशहाने महाराजांचे जंगी स्वागत केले. आणि त्यांच्यासाठी एका यात्रेचे आयोजन केले होते.
या यात्रेत मराठा सैनिक आणि कुतुबशाही सैनिक एकमेकांचे युद्ध कौशल्य दाखवणार होते. कुतुबशाही सैन्यात मोठ मोठे हत्तीसुद्धा सामील होते. तर शिवरायांच्या मराठा सैन्यात फक्त मावळे होते.
महाराजांसोबत सरनोबत हंबीरराव मोहिते, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक इत्यादी निवडक मावळे होते या सगळ्यांनी महालात प्रवेश केला.

गोवळकोंड्याचा कुतुबशहा महाराजांना म्हणतोय ‘महाराज आपकी फौज देखकरं हमे बडी खुशी हुई लेकीन ताजूब की बात ये हे की आपकी फौज मे हमने हाथी नही देखा” यावर महाराज उत्तरले “आमच्या कडे पन्नास हजार हत्ती आहेत, म्हणजे आमचा एक एक मावळा हत्तीच्या ताकतीचं आहे” यावर कुतुबशहा म्हणतोय हत्तीच्या ताकतीचां माणूस कसं काय शक्य आणि असेल एखादा असा मावळा तर काय तो माझ्या हत्तिशी झुंज देईल. महाराज म्हणतायत का नाही यातील कोणताही मावळा निवडा तो तुमच्या हत्तीशी झुंज देईल.
कुतुबशहाने प्रत्येक मावळ्यावर कुंचीतसी नजर फिरवली व येसाजी कडे बोट दाखवत विचारलं “क्या ये सिपाई लढेगा हाथी से?” महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासानं उत्तर दिलं “का नाही?” येसाजी ने महाराजांना झुकून मुजरा केला आणि नंग्या तलवारी निशी मैदानात उतरला हत्तीला ही साखदंडांतून मोकळं करून मैदानात आणण्यात आले.
युद्धाला सुरुवात झाली. येसाजीला पाहून हत्ती चवताळून येसाजीच्या अंगावर धावून गेला येसाजी न डाव्या अंगाला उडी मारून हत्तीला हुलकावणी दिली. दोन अडीच तास झुंज चालू होती.
कधी येसाजी पुढे तर कधी येसाजी हत्तीच्या मागे आता हत्ती बेभान झाला होता त्याने येसाजीला आपल्या सोंडत पकडलं लोकांना वाटलं आता संपला येसाजी पण येसाजी न हत्तीच्या सोंडेवर तलवारीने असा घाव केला की जखमी झालेला हत्ती वेड्यासारखा पळत सुटला, तो पुन्हा आलाच नाही.
महाराजांचा एक एक मावळा हा हत्तीच्या ताकतीचां असतो हे सिद्ध झालं. कुतुबशहाने येसाजीला आपल्या गळ्यातील हार भेट देऊ केला पण येसाजीन तो हार न घेता “आमचं कौतुक करायला आमचा राजा समर्थ हाय माझा हा पराक्रम माझ्या राज्याच्या चरणी अर्पण करतो” अस सांगितलं.
जे स्वराज्य द्रोही होते ते हत्तीच्या पायाखाली गेले तर काही येसाजी कंक यांच्यासारखे स्वामिनिष्ठ होते त्यांनी हत्तीलाही नमवल.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे हि वाचा… महाभारतातील या योद्धा आजून जिवंत आहे.