आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

मणिपूरमधील स्थानिक पिपल्स लिबरेशन आर्मीने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात ४ आसाम रायफलचे ३ जवान शहीद झाले स्फोटके लावून घडवण्यात आलेल्या हा हल्ला पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) या संघटनेने केल्याचे म्हटले जात आहे.

मणिपूरच्या चंदेल क्षेत्रात 29 जुलैच्या रात्री भारत -म्यानमार सीमेजवळ आयडी विस्फोटकांमध्ये 4 आसाम रायफलचे 3 जवान शहीद झाले. 15 जवानांचा एक ग्रुप चंदेल क्षेत्रांतील खोंगतलमधून वापस येत होते.

हा दहशतवादी हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी आसाम रायफल  जवानांवर गोळीबार सुरू केला. इंफाळपासून सुमारे १०० किमीच्या अंतरावर असलेल्या चंदेल जिल्ह्यात हा हल्ला झाला. हा सर्व पर्वतीय परिसर आहे.

सूत्रांच्या  माहितीनुसार या  हल्ल्याच्या पाठीमागे पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) चा हात असल्याचे म्हटले जात आहे.

आसाम रायफल्सचे जवान शोध मोहिमेअंतर्गत येथे कार्यरत होते. पीपल्स लिबरेशन आर्मीने येथे पाळत ठेवली होती. त्यानंतर आसाम रायफल्सचे जवान त्यांच्या टप्प्यात आल्यानंतर पीएलएने प्रथम एलईडीचा स्फोट घडवला आणि त्यानंतर अचानक हल्ला करत गोळीबार सुरू केला.

मणिपूरमध्ये अनेक दशकांपासून अनेक दहशतवादी संघटना आहेत, ज्यांच्या निशाण्यावर भारतीय सुरक्षा दलाचे सैनिक आणि नागरिक असतात. यातील अनेक संगठन बाहेर देशातून नियंत्रित केल्या जातात ज्यामुळे त्यांना पकडणे
अवघड जाते.

मणिपूरच्या सर्वांत खतरनाक दहशत वादी संघटनामधील पीपल्स लिबरेशन आर्मी एक आहे.

पीपल्स लिबरेशन आर्मी

पीपल्स लिबरेशन आर्मीचा इतिहास :

या दहशतवादी संघटनेची स्थापना 25 सप्टेंबर 1978 बिशेश्वर सिंह याने केली होती, संघटनेचा उद्देश मणिपूर ला स्वतंत्र सोशलिस्ट राज्य बनवायचं होते.

1980च्या दशकात या संगठनेच्या गतिविधी बिशेश्वर सिंह यांच्या अटक झाल्यामुळे कमी झाल्या होत्या. ही संघटना लगातार  भारतीय सैनिकांना टार्गेट करत आली आहे.

पीपल्स लिबरेशन आर्मीचा राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न :

राज्यात असलेल्या राजकीय पक्षाच्या विरोधात एक प्रबळ पक्ष बनण्यासाठी पीपल्स लिबरेशन आर्मीने 1989 मध्ये एका राजकीय पार्टीची निर्मिती केली. त्या पार्टीचे नाव रेवोल्युशनरी पीपल्स फ्रंट (RPF) असे ठेवण्यात आले होते.

RPF बांगलादेश मध्ये निर्वसन सरकार चालवते. PLA ने बांग्लादेशच्या सिल्हट जिल्ह्यात आपले अनेक बेस बनवले आहेत. सद्यस्थितीला इरेंग्बम चओरेन RPF चा अध्यक्ष आहे.

पीपल्स लिबरेशन आर्मीचे चिन कनेक्शन :

पीपल्स लिबरेशन आर्मी

काही दशकापूर्वी मणिपूरच्या 18 लोकांनी पीपल्स लिबरेशन आर्मीत सहभाग घेतला होता. या सर्वाना चीनच्या तिब्बटमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते.

1980च्या सुरवातीला PLA चा  ट्रेनिंग आणि हत्यार सप्लाय बंद झाला होता. यामागे भारताने चीनकडे केलेल्या तक्रारी जबाबरदार होत्या असं म्हटले जाते. नंतर भारतीय आर्मीला कळाले की पीपल्स लिबरेशन आर्मीला प्रशिक्षण देण्यासाठी चीन म्यानमार मधील कचिन एंडिपेंडेन्स आर्मी (KIA) चा उपयोग करत असे.

येथील बहुतेक दहशतवादी संघटनांनी सरकारसोबत अथवा काही राजनेतिक पक्षासोबत तह करून आपल्या कारवाया बंद केल्या असल्या तरी, पीपल्स लिबरेशन आर्मीचे आजसुद्धा म्यानमारमध्ये 2 आणि बांगलादेशमध्ये 5 कॅम्प आहेत जेथे 1000 पेक्षाही जास्त दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे हि वाचा… सफर राजांच्या गडाची.. राजगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here