आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

इटलीमधील मृत्यूचे बेट.या ठिकाणी जाणारा कोणीही आजपर्यंत वापस येऊ शकला नाहीये..!


जगभरात अनेक अनेक अश्या जागा आहेत ज्या लोकांसाठी धोकादायक आहेत. काही जागा मग खतरनाक व जहरील्या सापांमुळे तर काही मोठमोठ्या सक्रीय ज्वालामुखीमुळे. अश्या जागांवर मृत्यूची भीती नाही वाटणार असा एकजान सुद्धा पाहायला मिळणार नाही.

अनेक ठिकाणी मनुष्य वास्तव्यास राहत नाहीत  याच्या पाठीमागे तेथे काही विशेष असे कारण सुद्धा असते. जे त्या लोकांना  तिथे  राहण्यापासून थांबवते. अथवा त्यांना त्या कारणांमुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचे निदर्शनास येते.

इटली

परंतु आज आपण एका अश्या जागेबद्दल बोलणार आहोत जेथे गेलेला एकजण सुद्धा आजून परत आला नाहीये. हि जागा म्हणजे साक्षात मृत्यूचा दरबार असल्यासारखी आहे. जाणून घेऊया.

इटलीमध्ये असलेला रहस्यमय पोवेग्लिए आइलैंड हा संपूर्ण जगामध्ये “आइलैंड ऑफ डेथ ” म्हणून प्रसिध्द आहे. या ठिकाणी जाणारे कोणीही जिवंत वापस येऊ शकत नाही असा लोकांचा समज आहे.

मृत्यूचे बेट

१३४८ मध्ये इटलीमध्ये रोबोनिक प्लेग पसरला होता. त्यावेळी या आइलैंडचा उपयोग आजारी लोकांना ठेवण्यासाठी आणी मेलेल्या लोकांच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी केला जायचा. काही वर्षानंतर १६३० मध्ये येथे परत ब्लैक टाइप नावाची महामारी पसरली आणि यावेळेस या आइलैंडचा उपयोग मुर्दाघर म्हणून करण्यात आला.

१९२२ मध्ये या जागेचे नवीनीकरण करून येथे एक हॉस्पिटल बनवण्यात आले. परंतु काही दिवसांनी या ठिकाणी प्लेगमुळे आजारी पडलेल्या १ लाख  ६० हजार लोकांना जिवंत जाळण्यात आले होते. म्हणूनच या ठिकाणी आत्मा भटकत असतात असेही म्हणतात. लोकांच्या आत्मा येथे भटकत असल्याच्या भीतीमुळे हे ठिकाण पुन्हा बंद करण्यात आले. आज या ठिकाणी कोणीही जाऊ शकत नाही.

या बेटावर १९९२ मध्ये एक वेड्यांचे हॉस्पिटल बनवण्यात आले होते, परंतु काही दिवसातच येथील पेशंटना
प्लेग साथीच्यावेळी मृत्यू पावलेल्या लोकांची काही भूत दिसायला लागली. त्या भीतीमुळे तो दवाखाना सुद्धा बंद करण्यात आला.

इटलीच्या वेनिस आणि लिडोशहराच्या मध्ये खाडीत असलेल्या पोवेग्लीया आईलंडबद्दल चर्चा आहे कि येथे जाणारा कोणीही वापस येत नाही. त्यामुळेच याला मृत्यूचा आईलंड सुद्धा म्हटले जाते.

मृत्यूचे बेट

याठिकाणी एवढ्य लोकांचे मृत्यू झाले आहेत कि,येथील ५०% माती हि माणसांच्या हाडापासून तयार झाली आहे.
या बेटावर एवध्या लोकांना मरण आले आहे कि, मासे पकडणारे लोक जेव्हा या बेटाच्या आसपास जातात तर त्यांच्या जाळ्यात माश्यांएवजी हाडे अडकतात.

सध्या इटलीच्या सरकाने या बेटावर जाण्यास प्रतिबंध लगावले आहेत. तरीसुद्धा कोणी जर याठिकाणी गेले तर त्याच्या जीवित्वाची जबाबदारी हि त्याच्यावरच असेल अस स्पष्ट मत इटली सरकारने घोषित केले आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :  ५०० पेक्षाही जास्त मानवी सांगाडे सापडलेला रूपकुंड तलाव…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here