आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
विश्वास बसणार नाय पण आजही भारताच्या या भागात 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुलींची विक्री होतेय.
आज जगभरात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अनेक महत्वाच्या क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या कार्याच्या जोरावर त्या सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. परंतु काही ठिकाणी आजसुद्धा महिलावर अन्याय होतो. सोबतच काही अश्या गोष्टीसुद्धा वाचायला मिळतात ज्या आज घडीला खरोखर विचार करण्यास भाग पाडतात.
आज आम्ही तुम्हाला अश्याच एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जेथे दर वर्षी काही मुलींना १० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर विकल्या जाते.
होय तुमचा विश्वास बसणार नाही ,परंतु हे सत्य आहे.
मध्यप्रदेशच्या शिवपुरी हे गाव आपल्या नावामुळे नाही तर या विचित्र प्रथेमुळे जास्त चर्चेत असते. याठिकाणी एक मंडई आहे ज्याठिकाणी मुलींना जमा केल्या जाते. जेथे पुरुष येऊन त्यांच्या पसंतीस पडलेल्या मुलीवर बोली लावतात. जो सर्वांत जास्त पैसे देऊन खरेदी करेल त्या पुरुषाची ती पत्नी बनते.

आणि हे सर्व १० ते १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर केल्या जाते.
पैश्याच्या जिवावरील या प्रथेतील एकाही मुलीचे आयुष्य सुखदायक नाही . या गोष्टीवर अनेक वेळा आवाज उठवण्यात आला परंतु एकाही महिलेने, मुलीने समोर येऊन याविरुद्ध तक्रार दाखल न केल्यामुळे हि कृपथा आजसुद्धा सुरु आहे.
अनेक दिवसांपासून चालत आलेल्या अश्या कृप्रथा आजघडीला सुद्धा सुरु आहेत ,हे खरच प्रगतशील देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. स्त्रियांना आणि पुरुषांना समान हक्क वागणूक मिळावी यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत, तरी असे काही उदाहरणे आहेत जे याला अपवाद आहेत.
संबध संपल्यास पुन्हा पैसे देऊन नवीन करार केल्या जातो.
या सर्व प्रकारत जेवढी जास्त रक्कम तेवढी मुद्दत जास्त असते. अर्थात खरेदी केलेल्या मुलीसोबत जास्त दिवस संबध टिकवायचे असतील तर खरेदी करणाऱ्या पुरुषाला जास्तीत जास्त रक्कम द्यावी लागते. अन्यथा करार संपल्यास त्याला पुन्हा नवीन करार करण्यास परवानगी दिली जाते.
जर त्या पुरुषाची परत करार करण्याची इच्छा नसेल तर तो करार संपला कि तिला सोडून देतो, आणि दुसऱ्या कुण्या मुलीसोबत करार करतो. सोडून दिलेल्या त्या मुलीला सुद्धा पुन्हा करार करण्यासाठी मंडई मध्ये पाठवले जाते.
हि प्रथा महिला आणि मुलींच्या खरेदीची अशी प्रथा आहे कि, त्यांच आयुष्य स्टॅम्प पेपर वर सही करताच बदलले जाते.
आपल्याला विश्वास वाटणार नाही पण जास्तीत जास्त इथे फक्त एका रात्र पुरताच करार केल्या जातो.
कधी कधी जास्त पैसे मिळाल्यानंतर जास्त दिवसासाठी हा करार केल्या जातो.
आजपर्यंत या प्रथेला बंद करण्यासठी अनेक लोकांनी प्रयत्न केले . परंतु जोपर्यंत येथील कोणी महिला अथवा मुलगी यांच्याविरुद्ध रीतसर तक्रार दाखल करत नाही तोपर्यंत यांच्यावर कारवाई केल्या जात नाहीये.अनेक जण याठिकाणी असलेल्या स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देण्यास अपयशी ठरत आहेत.
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
तुम्हाला हेही वाचायला आवडेल- १२०० चीनी सैनिकावर भारी पडला होता हा भारतीय जवान!