आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

वेसना वुलोविक (Vesna Vulović) यांच्याबद्दल वाचा सविस्तर….

आपण अनेक अपघात आणी त्यामधून चमत्कारिकरित्या वाचणाऱ्या लोकांविषयी ऐकले असेल. एखादे विमान जर भर आकाशात अपघातग्रस्त झाले तर त्या विमानातील कोणीही प्रवाशी किंवा कर्मचारी जिवंत वाचणे म्हणजे अशक्यचं वाटते, परंतु प्रत्येक गोष्टीला काही अपवाद असतात. आजच्या या लेखामध्ये आपण असाच एक अपवाद किंवा दैवी चमत्कार (३३३३० फुट उंचावरून पॅराशूटशिवाय खाली पडूनही जिवंत वाचणे ) असणाऱ्या फ्लाईट अटेंडंट वेस्ना वुलोविक(Vesna Vulović) यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर….

वेसना वुलोविक
वेसना वुलोविक

सर्बियनमध्ये ३ जानेवारी १९५० ला जन्मलेली हि महिला अपघात झाला त्यावेळी केवळ २२ वर्षांची होती. या भयंकर अपघातापूर्वी त्यांची केवळ अवघ्या आठ महिन्यांसाठी फ्लाइट अटेंडंट म्हणून  नियुक्ती झाली होती. लंडनमध्ये इंग्रजी शिकण्यासाठी प्रवास केल्यावर त्यांना प्रवासाची आवड निर्माण झाली होती. आपला एक मित्र फ्लाइट अटेंडंट बनत आहे असे ज्यावेळी वेस्ना वुलोविक यांना समजले तेंव्हा त्यांनी पण फ्लाइट अटेंडंट बनण्याचा निश्चय केला होता.

सन १९७१ मध्ये युगोस्लाव्हियाच्या (JAT AIRWAYS) देशातील सर्वात मोठ्या विमानसेवा कंपनी मध्ये वेस्ना वुलोविक ह्या रुजू झाल्या होती. परंतु त्यांचे विमानात प्रवास करण्याचे स्वप्न जवळजवळ पूर्ण होणार नाही असा त्यांचा विश्वास होता , कारण त्यांना कमी रक्तदाबाची समस्या होती त्यामुळेच वेस्ना वुलोविक यांना माहित होते की त्यांची वैद्यकीय परीक्षेत पास होण्याची शक्यता खूप कमी आहे.

म्हणूनच परीक्षा देण्यासाठी जाण्यापूर्वी त्यांनी कॉफी पिल्याने रक्तदाब पुरेसा वाढेल या आशेने बरेच कप कॉफी प्यायली होती. या युक्तीने त्यांचे कार्य सिद्ध झाले. आणि त्यांना फ्लाइट अटेंडंट प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती.

वेसना वुलोविक
वेसना वुलोविक

फ्लाइट अटेंडंट या पदावर कार्यरत असताताना अवघ्या आठ महिन्यांनंतर वेस्ना वुलोविक यांना स्टॉकहोल्म ते बेलग्रेडकडे उड्डाण करनाऱ्या jatफ्लाइट ३६७ च्या कर्मचाऱ्यांमध्ये सामील होण्यास सांगितले गेले.

वेस्ना नावाची दुसरी कर्मचारी त्याच वेळी या कंपनीमध्ये कार्यरत होती त्यामुळे थोडा गोंधळ निर्माण झाला होता. डेन्मार्कला कधीच न आल्यामुळे वुलोविकयांनी प्रवास करण्याची ही आणखी एक संधी मानत वेस्ना वुलोविक यांनी jatफ्लाइट ३६७ मध्ये जाण्यास सहमती दर्शवली.

याठिकाणी आल्यावर वुलोविक यांची इच्छा होती कि त्यांनी येथील पर्यटन स्थळांना भेट द्यावी , परंतु त्यांच्या विमानाच्या पायलटने सर्व कर्मचार्यांना हॉटेलच्या खोलीमध्येच राहण्यासाठी सांगितले आणी बाहेर जाण्यास नकार दिला.

२६ जानेवारी १९७२ रोजी दुपारी १:३० वाजता कोपनहेगन विमानतळावर वेस्ना वुलोविक यांचा ग्रुप 367 फ्लाइटला भेटले. आलेले प्रवासी आणि मागील चालक दल आणि कर्मचारी यांना सोडून आणी नवीन प्रवाशी चढून त्यांचे विमान ३:१५ वाजता सुटले. विमान सुटल्यावर अवघ्या ४६ मिनिटांनंतर हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. ४:०१ वाजता वाजता विमानातील सामानाच्या डब्यात स्फोट झाला.

चेकोस्लोवाकियातील श्रीब्स्का कॅमेनिस या ठिकाणी आकाशातून ३३३३० फूट खाली जमिनीवर पडण्यापूर्वी हे विमान मध्य-हवेमध्ये एखाद्या फुग्याप्रमाणे फुटले होते. दुर्दैवाने २८ प्रवासी आणि चालक दल यामध्ये केवळ वुलोविक ह्याच एकमेव जिवंत राहिल्या होत्या.

वेसना वुलोविक
वेसना वुलोविक

ज्याठिकाणी त्या जमिनीवर पडल्या होत्या त्याठिकाणी ब्रूनो होनके या गावकर्याने त्यांच्यावर प्रथोमोपचार केले , ब्रूनो होनके हे दुसऱ्या महायुद्धात आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळेच ते बचावकर्ते येईपर्यंत वुलोव्हिया जिवंत ठेवण्यास सक्षम होते. परंतु हे काम  सोपे नव्हते कारण, या दुर्घटनेमध्ये वुलोविक यांचे दोन्ही पाय , एक मांडी , फिती आणि कवटी तुटली होती.

प्राग येथील हॉस्पिटल मध्ये इस्पितळात नेल्यानंतर वेस्ना वुलोविक बरेच दिवस कोमात होती. वेस्ना वुलोविक यांना व्यापक शारीरिक जखमा आणी तुटलेल्या कवटी व्यतिरिक्त, तिच्या मेंदूतही रक्तस्त्राव झाला होता त्यामुळेच तिला संपूर्ण स्मृतिभ्रंश झाला होता. केवळ विमानातील प्रवाशांना शुभेच्छा दिलेले तिला आठवत होते. तिचे आई वडील हॉस्पिटल मध्ये येईपर्यंत तिला याशिवाय दुसरे काहीही आठवत नव्हते.

वेस्ना वुलोविक यांच्या जिवंत वाचण्यामागचे कारणे:

वेस्ना वुलोविक यांना झालेल्या जखमांमुळे तिला कायमचे अर्धांगवायू किंवा मृत्यू आला असता, परंतु जमिनीवर पडण्याच्या दहा महिन्यानंतरच वेस्ना वुलोविक पुन्हा पायावर चालत होती. डॉक्टरांनी तिची अशी लांबलचक आयुष्याची कधीच अपेक्षा केली नव्हती. खरंतर एवढ्या लवकर बरे होऊन त्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

कोमातून जागे झाल्यावर तिने सर्वात आधी सिगारेट मागितली होती. तिचा बरे होण्याचा कालावधी दुसर्यांच्या तुलनेने अतिशय कमी आणि आश्चर्यकारक होता. वेस्ना वुलोविक यांच्या बालपणातील आहारात चॉकलेट, पालक आणि फिश ऑइलचा समावेश असल्याने तिला बरे होण्यास मदत झाली होती.

एअर सेफ्टी अन्वेषकांचा असा विश्वास आहे की स्फोट होताना विमानातील वुलोविकच्या स्थितीने तिला जिवंत राहण्यास मदत केली. जेव्हा विमानात विस्फोट झाला तेंव्हा ती विमानाच्या मागील बाजूस फूड कार्ट जवळ होती. स्फोटानंतर इतर अनेक प्रवाशी विमानातून खाली फेकल्या गेले तर वुलोविक ह्या फूड कार्टमध्ये अडकली होती.

वेसना वुलोविक
वेस्ना वुलोविक

ती विमानाच्या ज्या लहान भागामध्ये होती , तो भाग बर्फाच्छादित आणी दाट झाडी असलेल्या डोंगराच्या किनाऱ्यावरील जमिनीवर पडला होता. त्यामुळे ती जिवंत राहिली अशा निष्कर्ष हवाई तपासनीसांनी लावला होता.

वुलोविकच्या डॉक्टरांनी असा दावा केला की, तिच्या कमी रक्तदाबमुळे तिचे हृदय फुटण्यापासून वाचले होते.

युस्टोस्लाव्हिया पासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रोएशियन फुटीरतावादी संघटनेने (Ustaše) ठेवलेल्या ब्रिफकेस मधेच बॉम्ब होता ज्याचा स्फोट विमानात झाला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून नंतर या देशात विमानतळ सुरक्षा उपाय कडक करण्यात आले होते.

स्मृतिभ्रंशमुळे वुलोविकला क्रॅश किंवा स्फोट झाल्याची आठवण नव्हती परंतु तिच्यामध्ये आकाशात प्रवास करण्याची आवड जशाच तशीच होती. २०१६ मध्ये वयाच्या ६६ व्या वर्षी तिचे निधन झाले परंतु वेस्ना वुलोविक मरेपर्यंत त्या घटनेबद्दल काहीही आठवू शकली नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 हे हि वाचायला आवडेल.  आजपर्यंतचे 5 अयशस्वी आणि धोकादायक ठरलेले विमाने.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here