आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

बेरूत सारखा मोठा अपघात भारतातही होऊ शकतो….

लेबनानची राजधानी बेरूत येथे मंगळवारी ४ ऑगस्टच्या संध्याकाळी एक महाभयंकर स्फोट झाला ज्यामध्ये १३५ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला तसेच ५००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याशिवाय बंदरात झालेल्या स्फोटामुळे बर्‍याच इमारतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत बेरूतचे बरेच लोक बेघर झाले आहेत.

बेरूतमध्ये झालेल्या विध्वंसक स्फोटाचे मुख्य कारण तेथील बंदरात साठवून ठेवलेले २७०० टन अमोनियम नायट्रेट (Ammonium nitrate) असल्याचे कळल्यानंतर तामिळनाडूच्या चेन्नईत लोकांची चिंता वाढली आहे.

बेरूत
चेन्नईमध्ये जप्त केलेले अमोनियम नायट्रेट

तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई शहरापासून अवघ्या ३० कि.मी. अंतरावर स्थित मनाली मधील एका गोदामात अतिशय विध्वंसक असणाऱ्या अमोनियम नायट्रेट (Ammonium nitrate) या रसायनाचा साठा असल्याची खळबळजनक माहिती समोर आल्यापासून संपूर्ण चेन्नईवाशी चिंतेत होते. परंतु त्यांची हि चिंता हि आता कमी झाली आहे कारण , सीमाशुल्क (costam) अधिकार्‍यांनी त्या रसायनाची एका महिन्यात सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे.

चेन्नई कस्टम अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सप्टेंबर २०१५ मध्ये ३७ कंटेनर(७००टन) अमोनियम नायट्रेट रसायन जप्त करण्यात आले होते. हे कंटेनर दक्षिण कोरियाहून चेन्नई बंदरावर खत म्हणून उतरवण्यात आले होते. याबद्दल माहिती देताना त्या अधिकाऱ्यांनी, ७४० टन अमोनियम नायट्रेट सुरक्षित ठिकाणी ठेवलेले असून याबद्दल काहीही काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे.

कस्टमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जप्त करण्यात आलेले अमोनियम नायट्रेट चेन्नईच्या बाहेरील भागात असलेल्या गोदामात सुरक्षित रित्या साठवून ठेवण्यात आले आहे. गोदामासून २ कि.मी. पर्यंत कोणतीही इमारत किंवा निवासी क्षेत्र नाही. तसेच कोर्टाच्या आदेशानुसार ई-लिलाव प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. ही प्रक्रिया जवळपास एका महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

बेरूत
बेरूत शहर बॉम्बस्फोटाच्या पुर्वी आणि नंतर

सहा वर्षांपूर्वी लेबनन ची राजधानी बेरूतच्या किना-यावर जप्त केलेल्या जहाजावरुन सुमारे तीन हजार टन अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. तेव्हापासून हे अमोनियम नायट्रेट बंदराजवळील गोदामात ठेवलेले होते. मंगळवारी संध्याकाळी याच अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला होता. त्यामध्ये शेकडो लोकांनी आपला जीव गमावला तर हजारोंच्या संखेने लोक जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की अमोनियम नायट्रेट म्हणजे काय आणि ते इतके धोकादायक कशामुळे आहे?

अमोनियम नायट्रेट नेमकं काय आहे ?

अमोनियम नायट्रेट हे एक पांढऱ्या रंगाचे स्फटिकासारखे रसायन आहे. या रसायनाचे औद्योगिक स्तरावर मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येते. खतनिर्मितीसाठी नायट्रोजनचा स्रोत म्हणून याचा वापर केल्या जातो. तसेच अमोनियम नायट्रेट हे खाण उद्योगासाठी स्फोटके तयार करण्यासाठी देखील वापरले जाते.

लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधील रसायनशास्त्राचे प्राध्यापक आंद्रे सेला म्हणतात, “हे रसायन जमिनीवर असेच नाही सापडत, कारण ते कृत्रिम प्रकारचे रसायन आहे जे अमोनिया आणि नायट्रिक प्रतिक्रियेद्वारे तयार केले जाते.”

अमोनियम नायट्रेट हे जगभरात तयार होते आणि ते खूप स्वस्त दारात उपलब्ध होते. परंतु त्याची साठवणूक करणे हि एक गंभीर समस्या आहे. कारण यापूर्वी पण अमोनियम नायट्रेटमुळे बरेच मोठे आणि गंभीर अपघात झाले आहेत.

अमोनियम नायट्रेट किती धोकादायक आहे ?

बेरूत
बेरूत शहरातून निघणारे आग आणि धुराचे लोट

अमोनियम नायट्रेट हे हाताळण्यासाठी एकदम सुरक्षित आहे, परंतु बर्‍याच काळासाठी अमोनियम नायट्रेट साठवून असल्यास ते खराब होऊन होकादायक बनते. जेव्हा साठवणूक बर्‍याच काळासाठी केली जाते तेव्हा हे रसायन वातावरणातील आर्द्रता शोषून घेते आणि अखेरीस ते एका मोठ्या दगडाच्या आकारात बदलल्या जाते तेव्हा खरी समस्या निर्माण होते. यामुळेच अमोनियम नायट्रेट अत्यंत धोकादायक बनते कारण दगड झालेले हे रसायन आगीच्या संपर्कात आले तर तीव्र रासायनिक प्रतिक्रिया होण्याची शक्यता असते आणि त्यातून बेरूत सारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्फोटातून तयार होणारा विषारी वायू किती धोकादायक आहे?

बेरूत येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या वेळी धगधगत्या अग्नीतून दाटधुराचे लोट वाहताना आपण पाहिलेच आहे. या स्फोटातून अत्यंत विषारी वायू बाहेर पडल्या जातो त्यामुळे खूप हानी पोहचू शकते. जेव्हा अमोनियम नायट्रेटमध्ये स्फोट होतो तेव्हा त्यातून नायट्रोजन ऑक्साईड आणि अमोनिया सारखे विषारी वायू बाहेर पडतात.

नायट्रोजन डाय ऑक्साईडद्वारे तयार होणाऱ्या नारिंगी रंगाच्या धुराने बऱ्याच प्रमाणात वायू प्रदूषण होते. जर स्फोट झालेल्या ठिकाणी जोरदार वारा वाहत नसल्यास तेथील आसपासच्या लोकांनत्यातून मोठा धोका निर्माण होतो.

बॉम्ब बनवण्यासाठी वापरले जाते हे रसायन

मोठ्या प्रमाणात स्फोट घडवून आणण्याची क्षमता असणारे हे रासायनिक कंपाऊंड (केमिकल कंपाऊंड) जगातील अनेक देशांच्या सैन्याने स्फोटक म्हणून वापरले आहे. अतिरेकी संघटनाही अमोनियम नायट्रेटचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात.

सन १९९५ मध्ये अमेरिकेच्या ओक्लाहोमा या शहरात झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये अमोनियम नायट्रेटने घडवलेला विध्वंस संपूर्ण जगणे बघितला आहे. या घटनेत टिमोथी मेकवेने दोन टन अमोनियम नायट्रेटचा वापर करून खतरनाक बॉम्ब तयार करून फेडरल इमारत उडवून दिली होती. या स्फोटात १६८ लोक ठार झाले होते.

अमोनियम नायट्रेटमुळे आजपर्यंत घडलेल्या काही विध्वंसक घटना

बेरूत
अमोनियम नायट्रेटमुळे १९४७ मध्ये टेक्सासच्या गॅलव्हस्टन बे येथे घडलेली दुर्घटना
  1. १९२१ मध्ये अमोनियन नायट्रेटमुळे जर्मनीच्या ओपाऊ शहरात एका फॅक्टरीमध्ये स्फोट झाला होता. त्यावेळी अमोनियम नायट्रेटचे प्रमाण ४५०० टन होते आणि या अपघातात ५०० हून अधिक लोक मारल्या गेले होते.
  2. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयंकर औद्योगिक दुर्घटना १९४७ मध्ये टेक्सासच्या गॅलव्हस्टन बे येथे घडली होती. बंदरावर उभ्या असलेल्या जहाजात २००० टन अमोनियम नायट्रेट होते आणि त्या जहाजामध्ये स्फोट झाला. या पघातात किमान ५८१ लोक जागीच मरण पावले होते.
  3. २०१५ मध्ये चीनमधील टियांजिन बंदरात अमोनियम नायट्रेटमुळे झालेल्या अपघातात १७३ लोकांचा मृत्यू झाला होता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा: मणिपूरमधील सर्वांत खतरनाक दहशतवादी संघटना पीपल्स लिबरेशन आर्मी वाचा सविस्तर ….

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here