आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

“जम्बुर” भारतातील छोटी आफ्रिका म्हणून ओळखल्या जाते.

आफ्रिकन वंशाचे हे लोक सुमारे २०० वर्षांपासून भारतात राहत आहेत. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आजच्या या विशेष लेखातून. वाचा सविस्तर …

आपला भारत देश हा त्याच्या विविधतेसाठी जगभरात प्रसिध्द आहे. आपल्या देशात अनेक धर्माचे लोक राहतात ज्यांची भाषा, पोशाख आणि चालीरीती वेगवेगळ्या आहेत. जर आपण हिंदू धर्मीयांबद्दलच बघीतले तर त्यांच्या अंतर्गत आपल्याला बरीच विविधता आढळून येयील. भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, ज्यू, झोरास्टेरियन आणि बहाइ धर्माचेही लोक आनंदाने राहतात.

अशा परिस्थितीत हि विविधता केवळ एवढ्याच पुरती मर्यादित नाही तर इतर अनेक देशांमधील लोक देखील येथे राहत आहेत. आफ्रिकेसारख्या देशातूनही आलेली काही लोकं येथे वास्तव्यास आहेत. आफ्रिकन लोक असे तर लगबग भारतातील सर्वच प्रमुख शहरात आपल्याला बघावयास मिळतील परंतु, असे लोक खूप आहेत जे भारतालाच आपले घर मानतात आणि त्यापैकी एक म्हणजे गुजरातची ‘सिद्धि’जमातीचे आफ्रिकन लोक.

आफ्रिकन वंशाचे हे लोक सुमारे २०० वर्षांपासून भारतात राहत आहेत. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आजच्या या विशेष लेखातून. वाचा सविस्तर ….

कोण आहेत हे सिद्धी आफ्रिकन-गुजराती लोक:

आफ्रिकन जम्बुर
जम्बुर गावातील आफ्रिकन मुले

सिद्धी ज्यालाच हब्शी आफ्रिकन म्हणून ओळखले जाते हे भारतातील एफ्रो-अरब यांचे वंशज तथा आफ्रिकन आणि अरब देशांत काम करणारे कामगार आहेत. असे मानले जाते की ब्रिटीश राजापूर्वीच शेख लोकं जेव्हा अरबस्तानातून भारतात आले तेव्हा ते या आफ्रिकन लोकांना आपल्यासोबत घेऊन आले. भारतात आणल्यानंतर या लोकांना अरबांनी भारतातील राजांना आणि राण्यांना गुलाम म्हणून सोपविण्यात आले होते.

तेंव्हापासूनच हे लोकं इथेच स्थायिक झाले आहेत. या लोकांनी आपले निवास्थान हे सिद्धी गुजरात मधील जम्बुर गाव आणि त्याच्या आसपासच्या भागात बनवले. संपूर्ण भारतात सुमारे २५००० आफ्रिकन सिद्धी लोकं आजच्या वेळी रहात आहेत. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी इस्लाम, तर काहींनी ख्रिश्चन धर्म, आणि काहींनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. भारताच्या संस्कृतीमध्ये हे लोक अगदी आनंदाने राहतात.

सिद्धी आफ्रिकन-गुजराती लोकांबद्दल दंतकथा:

आफ्रिकन जम्बुर
जम्बुर गावातील आफ्रिकन महिला

सिद्धी आफ्रिकन-गुजराती लोकांबद्दल अनेक दंतकथा प्रसिध्द आहेत त्यापैकी एका कथेनुसार, एक वेळेस जुनागडचे नवाब आफ्रिकेत गेले होते तेव्हा त्यांना एका आफ्रिकन महिलेवर प्रेम जडले होते. त्यांनी त्या आफ्रिकन महिलेसोबत लग्न करून तिला भारतात घेऊन आले. जेव्हा ती महिला भारतात आली तेव्हा तिने आपल्याबरोबर अनेक गुलामांना आणले होते.

हे लोक पुढेचालुन गुजरातमध्ये आफ्रिकन सिद्धी म्हणून स्थायिक झाले आणि इथलेच निवाशी बनले. हे लोक नेमके कधी येथे आले आणि केंव्हापासून भारतात वास्तव्य करीत आहेत याची कोणालाही माहिती नाही. भारतात या लोकांचे अस्तित्व २०० वर्षांपासून आहे असे मानले जाते.

आफ्रिकन गाव एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे:

गुजरातमध्ये तर अनेक जगप्रसिध्द पर्यटन स्थळे आहेत परंतु गुजरातमधील जम्बुर गाव हे त्या गावातील गुजराती बोलणाऱ्या आफ्रिकन लोकांमुळे प्रसिध्द आहे. या ठिकाणी अनेक पर्यटन येतात आणि या लोकांसोबत फोटो पण काढतात. या लोकांना भारत सरकारचे सर्व अधिकार प्राप्त आहेत जसें कि मतदान, राशन कार्ड वैगेरे. राष्ट्रीयदृष्ट्या हे गाव एक अद्वितीय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस आले आहे.

राहणीमान आणि खानपान:

आफ्रिकन जम्बुर
जम्बुर गावातील आफ्रिकन युवक नृत्य सादर करताना

हे आफ्रिकन लोक तसे तर गुजराती बोलतात आणि गुजराती जेवनच त्यांचे मुख्य अन्न आहे. परंतु जेव्हा नाचणे, गाणे आणि करमणूक करण्याचा विषय येतो तेंव्हा मात्र ते लोक गुजरातचा प्रसिध्द गरबा न करता आफ्रिकन नृत्यालाच जास्त प्राथमिकता देतात.

जर आपण गुजरातला भेट देण्यासाठी जल तर एकदा या गावात नक्कीच जा. जेणेकरून आपल्याला काहीतरी वेगळे पाहण्याची उत्तम संधी मिळेल. आणि आणि इथल्या लोकांचे नृत्य आवर्जून बघा जे कि हे लोक आपल्या समोर आनंदाने करतात आणि यातूनच त्यांच्यापैकी काहींची उपजीविका चालते.

गुजरात प्रमाणे भारतातील अनेक राज्यात आहेत हे आफ्रिकन लोकं:

आफ्रिकन जम्बुर
जम्बुर गावातील आफ्रिकन मुले

तसे तर हे हब्सी सिद्धी आफ्रिकन लोक जास्त संखेने गुजरात मध्येच आहेत परंतु काही लोक महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक मधेही वास्तव्यास आहेत. कर्नाटक आणि गोव्यातील हब्सी आफ्रिकन लोक कोंकणी भाषा बोलतात. इतकेच नाही तर नव्या हैदराबादमध्येही बरेच सिध्दी लोक राहत आहेत.

या जमातीमध्ये असे लोक फारच कमी आहेत जे इतर कोणत्याही धर्माच्या लोकांमध्ये लग्न करतात. यामुळेच हे लोक अजूनही आफ्रिकन दिसतात. भारतात जरी त्यांना अनेक प्रकारच्या भेदभावाला सामोरे जावे लागत आहे, तरीही ते त्यांच्या गावात आनंदाने राहत आहेत. जर आपण कधी जम्बुर गावात जाल तरच  आपल्याला समजेल कि हे लोकं किती अद्वितीय आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे हि आवडेल – मराठ्यांना गनिमी काव्याची देणगी या आफ्रीकन सरदाराने दिली होती…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here