आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक| इंस्टाग्राम | युट्यूब

===

या मंदिराच्या पायऱ्यामधून ऐकू येते संगीत! ८०० वर्षापासून कोणीही उलगडू शकले नाही हे रहस्य…!

जगात अनेक असे अश्चर्य असतात जे आपल्याला बऱ्याच वेळा माहिती नसतात. जगातील 7 आश्चर्य तर सर्वांनाच माहिती आहेत परंतु आज आम्ही तुम्हाला एका अश्या मंदिराबद्दल सांगणार आहोत
ज्याच्या पायऱ्यामधून संगीत ऐकू येते. हो हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य आहे.

पाहूया काय आहे नेमके या मंदिराचे रहस्य….

मंदिर

new google

दक्षिण भारताच्या तामिळनाडू राज्यात स्थित असलेल्या ऐरावतेश्वर मंदिराच्या पायऱ्यांमधून संगीत ऐकू येते. गेल्या अनेक वर्षांपासून कोणीही हे रहस्य उलगडू शकले नाहीये.

तामिळनाडूच्या कुंभकोणम जवळ दारासुरम येथे हे ऐरावतेश्वर मंदिर आहे. ज्यांच्या पायऱ्यातून संगीत आतापर्यंत अनेक वेळा भक्तांना ऐकू आले आहे. ऐरावतेश्वर मंदिरात देवाधी देव महादेव यांची पूजा- अर्चना केली जाते. या मंदिराला राजा राज चोला याने 12व्या शतकात बनवले होते.

या मंदिराचे नाव सुद्धा महादेवांच्या नावावरच ठेवले गेले होते. मंदिराचे बांधकाम आणि ईतर वास्तुकला ह्या आपल्याला समजायला थोड्या अवघड जातात. परंतु स्थानिक लोकांच्या माहितीनुसार या मंदिरात भक्तांना सुख आणि समृद्धी मिळते.

पायऱ्यांमधून येतो मधुर आवाज….

या मंदिराच्या एका हिस्स्यात तीन पायऱ्या बनवल्या आहेत. ज्याच्यावर पाय ठेवताच संगीताच्या अलग अलग धून ऐकायला मिळतात. हे एकदम तसच आहे जसे एखाद्या संगीत वाद्याला स्पर्श करून त्यातून संगीत तयार करतात.

वैज्ञानिकांनी यावर बरीच रिसर्च केली, तरी सुद्धा नेमकी ही धून कुठून व कशी येते हे शोधण्यास कोणालाही यश आलेले नाहीये. गेल्या 800 वर्षांपासून या धून निघण्याच्या रहस्यावरून पडदा उठला नाहीये. मंदिराच्या या रहस्याला पाहण्यसाठी जगभरातुन अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात.

या मंदिराचे स्तंभ 80 फूट उंच आहेत आणि भिंतीवर सुंदर असे त्याकालीन नक्षीकाम केले गेले आहे. नक्षीकामात पहिला भाग हा घोडे असलेला विशाल रथ दाखवण्यात आला आहे. तेच दुसऱ्या भागात बळी देण्याची प्रथा दर्शवण्यात आलीये.

असेही म्हटले जाते की, ये ठिकाणी देवांचा राजा इंद्र यांच्या ऐरावत (पांढरा हत्ती ) ने महादेवाची आराधना केली होती. तेव्हापासूनच या मंदिराचे नाव ऐरावतेश्वर पडले होते.

मंदिर

ऐरावतेश्वर मंदिराचे बांधकाम आणि नक्षीकाम तेथे येणाऱ्या भक्तांना आकर्षित करतात. याशिवाय मंदिराच्या आवारात ४ तीर्थ वाला एक मंडप बनवला आहे. त्यावर असलेली यमाची प्रतिमा सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळवून घेते.

असा सुद्धा उल्लेख आहे कि मृत्यूचे देवता यम यांना एका ऋषीने दिलेल्या श्रापामुळे त्यांचे शरीर भाजल्या जाऊन त्यांना यातना होत होत्या. त्यानंतर यम याच मंदिरात येऊन मंदिराच्या परिसरातील पाण्याने अंघोळ केली आणि महादेवाची आराधना केली.तेव्हा ते पूर्णपणे बरे झाले होते. याच कारणामुळे मंदिरात यमाची फोटो सुद्धाआहे.

मंदिर

ऐरावतेश्वर मंदिर हे द्रविड वास्तुकलेचे एक हिंदू मंदिर आहे. या मंदिरात अनेक शिलालेख आहेत. याच शीलालेखातील एका लेखामुळे हे मंदिर चोल तृतीययांनी बनवल्याचे समजले जाते.

गोपुराजवळील दुसऱ्या शिलालेखाद्वारे कळते कि, एक आकृती कल्याणीवरून आणण्यात आली होती. ज्याला नंतर राजाधिराज पहिला चोल यांच्याकडून “कल्याणपूरा” असे नाव देण्यात आले.

पश्चिमी चालुक्य राजा सोमेश्वरसोबत युद्धात हरल्या नंतर त्यांचे पुत्र सहावा विक्रमादित्य आणि दुसरा सोमेश्वर या दोघांनी चालुक्यांच्या राजधानीवर कब्जा केला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:- टिपू सुलतान कोण होता? नायक कि खलनायक? वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here