आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

इतिहासकार पी.एन.ओक यांनी ताजमहालचे वर्णन तेजोमहालय असे  करून वादाला सुरुवात केली होती.


 

भाजपा चे खासदार विनय कटिहार यांनी काही दिवसांपूर्वी ताजमहालला हिंदू मंदिर म्हणून संबोधित केले होते आणि त्यामुळे तेंव्हा यावर विवाद निर्माण झाला होता. परंतु कटिहार हे पहिले व्यक्ती नव्हते ज्यांनी असा दावा सादर केला होता. संगीत सोम, सुब्रह्मण्यम स्वामी, अनिल वीज यांसारख्या नेत्यांनी ताजमहालावर विवादित बयान दिलेले आहे.

इतिहासकार
पी.एन.ओक- ताजमहल किंवा तेजोमहालय

कधी ताजमहाल येथे जाऊन आरती करण्याचा तर कधी कावड नेऊन अभिषेक करण्याचा प्रयत्न यामुळे मागील काही दिवसांपासून ताजमहाल कि तेजोमहालय या विषयावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. एका महाशिवरात्रीला तर काही हिंदूं भाविकांनी ताजमहालाच्या पाठीमागील महताब बागेत गुपितरित्या ‘तेजोमहालय शिव’ यांचा प्रतीकात्मक जलाभिषेक केला होता.

एएसआयने ताजमहाल ही एक समाधी (मकबरा) आहे असे स्पष्टपणे सांगितले असले तरीही अधून मधून तेजोमहालय यासंबंधित वाद होतच असतो. आणि या सर्व विवादित दाव्यांना  संदर्भ देण्यात येतो तो पुरुषोत्तम नागेश ओक यांचा. आज जाणून घेऊया कोण आहेत हे इतिहासकार पी एन ओक आणि तेजोमहालयाचा वाद नेमका आहे तरी काय याबद्दल सविस्तर…

पी.एन.ओक यांचा अल्पपरिचय:

पी.एन.ओक यांचा जन्म २ मार्च १९१७ रोजी मध्य प्रदेशातील इंदोर येथे झाला होता. दुसर्या महायुद्धाच्या वेळी “इंडिअन नेशनल आर्मी” मध्ये सहभागी होऊन , पी.एन.ओक यांनी इंग्रजांशी युध्द लढले होते. पी.एन.ओक यांनी मुंबई विद्यापीठातून कला शाखेत एम.ए. आणि एल.एल.बी. ही पदवी मिळवली होती.

इतिहासकार
पी.एन.ओक

१९४७ पासून १९५३ पर्यंत ओक यांनी हिंदुस्तान टाईम्स आणि द स्टेट्समॅन सारख्या वर्तमानपत्रांमध्ये पत्रकार म्हणून काम पहिले. १९५३ ते १९५७ या कालावधीत त्यांनी भारतीय केंद्रीय रेडिओ आणि सार्वजनिक मंत्रालयात काम केले. त्यानंतर १९५७ ते १९५९ हे दोन वर्ष त्यांनी अमेरिकेच्या भारतीय दूतावासात काम केले होते.

पी एन ओक यांचा दावा:

१९८९ मध्ये भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या (आयएनए) प्रचार अधिकारी म्हणून काम केलेल्या आणि स्वातंत्र्यानंतर माहिती व प्रसारण मंत्रालयात काम करणारे पुरुषोत्तम नागेश ओक यांनी ताजमहाल खरं तर एक प्राचीन शिव मंदिर तेजोमयलय असल्याचा आणि नंतर त्याचे समाधीस्थळात रूपांतर झाले असा विवादित दावा आपल्या पुस्तकात केला होता.

आपला दावा सिद्ध करण्यासाठी त्यांनी ताजमहालमध्ये दिसणारा हिंदू प्रभाव आणि मोगल शिलालेखात ताजमहालच्या बांधकामाविषयी काहीही लिहिलेले नसल्याचा सहारा घेतला. ताजमहाल ही इमारत जुने मंदिर आहे हे सिद्ध करण्यासाठी पी एन ओक यांनी आपले पुस्तक ‘Taj Mahal Is A Temple Palace’ मध्ये शेकडो पुरावे देण्याचा प्रयत्न केला.

इतिहासकार
पी एन ओक यांनी लिहिलेली पुस्तके

पी एन ओक यांनी दिलेले पुरावे:

ओक यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की ताजमहालमधील संगमरवरी जाळीवर १०८ कळस बनवलेले आहेत , कलश हा हिंदू परंपरेचा एक भाग आहे आणि १०८ हा अंक हिंदू परंपरेत शुभ मानल्या जातो.

त्यांच्या म्हणण्यानुसार आग्रा हे मुळात जाटांचे शहर आहे. जाट भगवान शिव यांना तेजाजी म्हणूनही पूजतात. The Illustrated Weekly of India च्या जाट विशेष अंकानुसार ( २८ जून १९७१ ) जाटांची तेजाची मंदिरे असायची, याशिवाय अनेक शिवलिंगांमध्ये एक तेजलिंग सुद्धा असते ज्याचे जाट उपासक होते.

याच्या आधारे त्यांनी दावा केला की ताजमहाल म्हणजे तेजोमहालय भगवान तेजाजींचे निवासस्थान होते. याव्यतिरिक्त ओक यांनी विविध परदेशी पाहुण्यांच्या प्रवासाच्या वृत्तांचा देखील उल्लेख केला आहे.

ताजमहालमध्ये पूजेसाठी याचिका:

इतिहासकार
पी.एन.ओक ताजमहल या तेजोमहालय

एप्रिल २०१५ मध्ये आग्रा जिल्हा न्यायालयात सहा वकीलांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेत असे म्हटले आहे की ताजमहाल एक शिव मंदिर होते आणि ते तेजोमहालय म्हणून ओळखले जायाचे तसेच या याचिकेत हिंदूंना आवारात पूजा करण्याची परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने केंद्र सरकार, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, गृहसचिव आणि एएसआय यांना जबाब समन्स बजावले होते. यानंतर, संस्कृती मंत्रालयाने नोव्हेंबर२०१५ मध्ये लोकसभेत स्पष्ट केले की ताजमहालच्या जागेवर मंदिर असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

ताजमहाल मंदिर नसून मकबरा आहे: ASI

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने (एएसआय) २०१७ मध्ये आग्रा जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान प्रतिज्ञापत्र सादर केले होते. प्रतिज्ञापत्रात कोर्टाने म्हटले होते की,

“ताजमहाल एक इस्लामिक रचना आहे. तर अपील करणारे लोक दुसर्‍या धर्माचे आहेत” तसेच स्मारकात आजपर्यंत कोणताही धार्मिक कार्यक्रम घडलेला नाही.

 

ओक यांचे दावे इतिहासकार सदैव नाकारत आले आहेत:

इतिहासकार
पी एन ओक -ताजमहल या तेजोमहालय

पुरुषोत्तम नागेश ओक यांच्या दाव्यांविषयी इतिहासकार म्हणतात की ताजमहालला मोगल काळात रुझ-ए-मुनव्वर म्हटले जायचे आणि मुघल वास्तुशास्त्रात हिंदू वास्तुकलेचा प्रभावही दिसत असे. म्हणूनच ताजमहालला या आधारावर मंदिर म्हणता येणार नाही कारण रचनेवर हिंदूंची छाप आहे.

दुसरीकडे हिंदू महासभेच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्षा मीना देवी दिवाकर म्हणतात की सरकारने कबरेची खुदाई करावी जेणेकरून सत्य समोर येईल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे हि वाचा…   टिपू सुलतान कोण होता? नायक कि खलनायक?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here