आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

राहत इंदौरी यांचे आज दिनांक ११ ऑगस्ट २०२० रोजी अरबिंदो हॉस्पिटलमध्ये वयाच्या ७० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

हिंदी आणि उर्दू भाषेतील जगप्रसिध्द शायर राहत इंदौरी यांचे आज दिनांक ११ ऑगस्ट २०२० रोजी अरबिंदो हॉस्पिटलमध्ये वयाच्या ७० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कोरोना चाचणी पॉजीटीव्ह आल्यानंतर त्यांना रविवारी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. आज त्यांना दिवसातून दोन वेळा हृदय विकाराचा झटका आला होता आणि त्यातून ते सावरू शकले नाही.

ओ बुलाती है, मगर जानेका नही म्हणणारे राहत साहब स्वतः मात्र मृत्यूला नाही म्हणू शकले नाही.

राहत इंदौरी
राहत इंदौरी

राहत इंदौरी यांचा जन्म १ जानेवारी १९५० ला मध्य प्रदेशातील इंदोर येथे झाला होता. त्यांचे पिता राफ्तुल्लाह शहा हे इंदोरच्या कापड गिरणीत कामगार होते. हलाखीची परिस्थिती असताना कसाबसा त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. राहत साहेबांचे प्राथमिक शिक्षण हे इंदोरच्या नूतन स्कूल येथून झाले.

त्यानंतर त्यांनी इस्लामिया कारीमिया कॉलेज इंदोर येथून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. बरकतउल्लाह विश्वविद्यालय येथून त्यांनी पदवी मिळवली. परिवाराची परिस्थिती जोमाची असल्यामुळे त्यांना सुरुवाती जीवनात फार संघर्ष करावा लागला.

राहत इंदोरी यांनी १० वर्षाच्या वयात साईन चित्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. यामुळेच लवकरच चित्रकार क्षेत्रात त्यांनी भरपूर ख्याती मिळवली. त्यावेळी ते इंदोर शहराचे सर्वात जास्त ख्यातनाम चित्रकार होते. इंदोर शहरात आजही राहत इंदौरी यांनी बनवलेले साइन बोर्ड्स  पाहायला मिळतात. १९८५ मध्ये त्यांनी मध्यप्रदेश भोज मुक्त विश्वविद्यालयातून उर्दू साहित्यात phd पूर्ण केली.

राहत इंदौरी
राहत इंदौरी

 

कॉलेज जीवनामध्ये राहत इंदौरी यांनी इंद्रकुमार कॉलेज मध्ये उर्दू साहित्यामध्ये अध्यापन सुरु केले होते. कॉलेज मध्ये त्यांना एक चांगला व्याख्याता म्हणून ओळखले जायचे. कॉलेज चालू असतानाच त्यांनी मुशावरे आणि कवी सामेलानामध्ये जाण्यास सुरुवात केली. आपल्या मेहनतीच्या आणि शब्दांच्या महारतीमुळे आणि विशिष्ठ शैलीच्या मदतीने लवकरच सर्वांच्या गळ्यातले ताईत बनले होते. थोड्याच दिवसांमध्ये ते उर्दू साहित्य जगतामध्ये प्रसिद्ध शायर म्हणून ओळखले जाऊ लागले. राहत इंदोरी यांनी बरेच दिवस अहिल्या देवी विश्वाविद्यालयामध्ये उर्दू विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे.

उर्दू विषयात अनन्यसाधारण ओळख निर्माण केल्यावरही ते शांत बसले नाही तर त्यांनी अनेक उर्दू रचना ( लिखाण ) केल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक लिखाणामध्ये उर्दू भाषेचा असीम प्रभाव पाहायला मिळतो. आपल्या जीवनामध्ये त्यांनी अनेक शेर शायरी लिहिली आहेत त्यामध्ये, नाराज ( गझल संग्रह ), धूप-धूप, बुलाती है मगर जानेका नही, वफा को अजमाना चाहिये था, कितनी पी कैसी कटी रात, आंख प्यासी है कोई मंजर दे इत्यादी सामील आहेत.

त्यांच्या  बुलाती है मगर जानेका नही या शायरीने तर काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर अक्षरशः धुमाकूळ माजवला होता.

राहत इंदौरी
राहत इंदौरी

राहत इंदौरी हे सलग ४० ते ४५ वर्षांपासून मुशायरा आणि कवि संमेलन सादर करत आले आहेत. कविता वाचण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक प्रवास केला आहे.भारतातील सर्व प्रदेशासह त्यांनी यूएसए, ब्रिटेन, कॅनडा, सिंगापूर, मॉरिशस, केएसए, कुवैत, बहरेन,ओमान, आणि पाकिस्तानमध्येही त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता.

शेरोशायरी सोबतच राहत इंदोरी यांनी अनेक प्रसिध्द हिंदी चित्रपटांमध्ये गीत लिहिले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने, आज हमने दिल का हर किस्सा ( चित्रपट- सर ) , तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है ( चित्रपट- खुद्दार) , खत लिखना हमें खत लिखना ( चित्रपट- खुद्दार) , रात क्या मांगे एक सितारा ( चित्रपट- खुद्दार) दिल को हज़ार बार रोका ( चित्रपट– मर्डर) , एम बोले तो मैं मास्टर ( चित्रपट- मुन्नाभाई एमबीबीएस) , धुंआ धुंआ ( चित्रपट- मिशन कश्मीर) इत्यादी आहेत.

२०२० मध्ये भारतातील आणखी एक मानवरुपी अनमोल रत्न राहत इंदौरी यांच्या रूपाने आज काळाच्या आड हरवले आहे. त्यांना युवकट्टा च्या टीमतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…!

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :  २०२० बॉलीवूडसाठी अभिशाप ठरतोय का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here