आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब
===
उषाताई जगदाळे यांच्या कामाचे कौतुक काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करून केले होते.
सध्या कोरोनामुळे सार्वजन घरातच राहत आहेत. त्यामुळे सर्वांना करमणुकीसाठी मोबाईल फोन आणि त्यावरील सोशल मिडियाचाच आधार आहे. सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही याची कल्पना आपल्याला येताच असेल कारण सोशल मिडिया वापरणारा एकही जन असा सापडणार नाही ज्याला “बिनोद” बद्दल माहित नाही.
असो हा “बिनोद” हा तर विनोदाचा भाग झाला परंतु सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ भन्नाट व्हायरल होत आहेत ज्यामध्ये एक महिला ( जिचा उल्लेख महाराष्ट्राची कोरोन योद्धा म्हणून करण्यात येत आहे ) जी कधी विजेच्या खांबांवर तर
कधी रोहित्रांवर काम करताना दिसत आहे. आज आपण जाणून घेऊया कोण आहे ही महिला आणि नेमकी कशामुळे एव्हढी व्हायरल होत आहे याबद्दल सविस्तर…..

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या महिलेच नाव आहे उषाताई जगदाळे. बीड जिल्ह्यातील एका गरीब शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या उषा जगदाळे यांची महावितरण मध्ये स्पोर्ट्स कोट्यातून तंत्रज्ञ (Technician) म्हणून निवड झाली होती. तसे तर महावितरण मध्ये महिला ह्या फिल्डवर्क नसल्याच्याच बराबर आहेत. परंतु उषा यांनी ऑफिस मध्ये काम न करता फिल्ड वर्क मध्ये जाऊन महिला ह्या कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत हे दाखऊन दिले आहे.
उषाताई जगदाळे यांच्या कामाचे कौतुक काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करून केले होते. “घरी दोन जुळी मुले, सासू-सासरे, पती अशी सर्वांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उषाताईंसारख्या महिलांचा सार्थ अभिमान आहे असे चाकणकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते.
महिला असूनही उषाताई जगदाळे एखाद्या पुरुष कर्मचार्यांप्रमाणे विजेच्या खांबांवर चढून सर्व कामे करतात. लॉकडाऊन मध्ये लोकांना विजेची समस्या येऊ नये म्हणून उषाताई सदैव आपली जिम्मेदारी पार पडली म्हणूनच लोकांनी त्यांचा कोरोन योद्धा म्हणून सन्मान केला. त्यांच्या या कामगिरीनेच महावितरणची दामिनी, बिजली गर्ल किंवा महावितरणची हिरकणी म्हणूनही लोकं त्यांना ओळखू लागले आहेत.

शाळेत असताना उषाताई जगदाळे ह्या खो खो या खेळामध्ये खूप पारंगत होत्या त्यांनी महाराष्ट्रासहित हिमाचल, पंजाब, आंध्रप्रदेश,तसेच मध्यप्रदेश यासारख्या राज्यांत जाऊन खो खो व्हा विविध स्पर्धांमध्ये अनेक पदकांची कमाई केली आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे कसेबसे त्यांचे दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.
कोरडवाहू शेती अन त्यातच घरी दोन मुली यामुळे त्याचे वडील थोडे चिंतीत होते त्यामुळेच त्यांनी उषाताईचे लग्न उरकून टाकायचा निर्णय घेतला. शिक्षणामध्ये खूप रुची असूनही आपल्या घराची परिस्तिथी ओळखून उषाताई यांनी त्यांच्या वडिलांना लग्नासाठी होकार दिला. बीड जिल्ह्यातीलच तलवाडी गावातील सूर्यभान केरुलकर यांच्याशी ती विवाहबद्ध झाली.
महेराप्रमाणेच तिच्या सासरचीही परिस्थिती सारखीच होती. थोडीशी जमीन असूनही ती कोरडवाहू असल्याने त्यामध्ये जेमतेमच उत्पन्न व्हायचे. परंतु शेतकर्याची मुलगी असल्यामुळे कष्ट करणे हे तिच्यासाठी काही नवीन नव्हते त्यामुळे उषाताई ह्या घराची कामे करून पतीच्या दुग्ध व्यवसायातही मदत करायची.

२०१३ मध्ये त्यांनी महावितरणच्या स्पोर्ट्स कोट्यातून अर्ज भरला ज्यावेळी त्यांनी हा अर्ज भरला तोपर्यंत त्यांना महावितरण बाबत काहीही माहिती नव्हती. परंतु त्यांना आज या कामामुळेच त्यांची ओळख संपूर्ण देशाला झाली आहे.
यावेळी उषाताई जगदाळे ह्या महावितरणच्या आष्ठी तालुक्यातील कडा शाखेत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. जो कोणी आज त्यांचा फोटो किंवा व्हिडीओ बघत आहे तो त्यांचे कौतुक करत आहे.
उषाताईच्या कामामुळे त्यांचे स्वताचे, माहेरचे आणि सासरचे नाव रोषण झाले आहे. महावितरणच्या या वाघिणीला युवाकट्टाचा सलाम.!
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा : सोशल मिडीयावर व्हायरल झालेला बिनोद.!