आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

आघोरींची खरी दुनिया आजची अनेक लोकांना माहितीच नाहीये!


अघोरी हा शब्द ऐकला तर आपण नक्कीच अचंबित होतो कारण अघोरींची दुनिया ही खूप रहस्यमय असते. भारतामध्ये विविध ठिकाणी अघोरी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक लोक आजही अघोरी आणि नागा साधू यांना एकच समजतात परंतु हे दोन्ही वेगवेगळे आहेत. नागा साधू हे नग्न राहतात आणि ब्रह्मचर्याचे पालन करतात. अघोरींच्या बाबतीत हे सर्व उलट आहे ते ब्रह्मचर्याचे पालन करत नाहीत.

संस्कृत मध्ये अघोरी शब्दाचा अर्थ आहे प्रकाशाकडे यासोबतच हा शब्द पवित्रतेचे प्रतिक मानल्या जातो. अघोरी लोकांची जीवन शैली ज्या प्रकारची असते त्यामध्ये तर पवित्रतेचा काहीही थांगपत्ता नसतो. मानवी जीवन प्राप्त होऊनही अघोरी एक रहस्यमय जीवन जगतात. त्यांचे उठने बसणे, खाणे, पिणे असे विचार अगदी सामान्य लोकांपेक्षा भिन्न असतात. या खास हिंदू संप्रदायाचे अस्तित्व अगदी पौराणिक काळापासून आहे.

अघोरी
अघोरी-एक रहस्य

अघोरींचा थेट संबंध भगवान शंकर यांच्याशी जोडल्या जातो. अघोरी हे नेहमीच एक चर्चेचा विषय राहिलेले आहेत. आज जाणून घेऊया अघोरी समाजातील अनेक रहस्यांबद्दल या लेखामध्ये. वाचा सविस्तर….

इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर अघोरींची उत्पती हजारो वर्षांपूर्वी वाराणशी येथे झाली होती असे मानल्या जाते. हे अघोरी आपले संपूर्ण जीवन स्मशानामध्येच तंत्र मंत्र करून व्यतीत करतात. यांच्याबद्दल सर्वात विचित्र गोष्ट ही आहे कि हे अघोरी मानवी मांसही खातात. भारतामध्ये मानवी मांस खाणे हा एक कायदेशीर गुन्हा आहे.

आघोरीं

असे असूनही अघोरी हे कृत्य करतात आणि त्यांना याची शिक्षा देखील मिळत नाही (याबद्दलची सत्यता ही आजही त्यांच्याप्रमाणे एक रहस्यच आहे) अघोरी आपल्या संपूर्ण जीवनात कोणत्याही प्रकारच्या भांड्यांचा उपयोग करत नाहीत. ते एकतर थेट पाण्याच्या स्त्रोतातून हाताने किंवा मानवी खोपडीत भरून पाणी पितात. याशिवाय ते प्राण्यांना मारून खातात त्यांच्यासाठी हे सर्व सामान्य आहे.

भारतामध्ये अघोरी सर्वात जास्त वाराणशी मध्ये आढळतात त्यामानाने त्यांची संख्या आता खूप कमी झाली आहे. अघोरी हे भविष्य बघू शकतात असाही काही लोकांचा समज आहे.

अघोरी आणि त्यांची तप साधना: 

अघोरी हे त्यांच्या कठोर शरीर आणि कठीण तप साधनेसाठी प्रसिध्द आहेत. त्यामुळेच त्यांच्यामध्ये सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक शक्ती असते असेही म्हणतात. अघोरी साधू सामान्यतः नग्न अवस्थेतच राहतात आणि आपल्या संपूर्ण शरीरावर स्मशानातील राख लावतात. हीच त्यांची एक विशिष्ठ ओळख आहे. अघोरी हे तीन प्रकारच्या गुप्त तपस्चर्या करतात ज्यामध्ये शिव साधना, श्मशान साधना, आणि शव साधना ह्या सामील आहेत.

अघोरी
अघोरी-एक रहस्य

अघोरी बद्दल असे म्हणले जाते कि त्यांची तंत्र साधना एव्हढी शक्तिशाली असते कि त्याच्या आधारे ते मृत लोकांशी संपर्क करू शकतात. आपल्या अनेक लोकप्रिय दंतकथांमध्ये नेहमीच असा उल्लेख आढळतो की अघोरि हे मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतात. असे असले तरीही विज्ञानमध्ये या गोष्ठींना केवळ अंधश्रद्धा मानल्या जाते.

काही ठिकाणी हिंदू धर्मात ५ वर्षांखालील मुलांचे मृतदेह जाळण्याऐवजी त्यांना एकतर जमिनीत पुरले जाते किंवा गंगेच्या पाण्यामध्ये प्रवाहित केले जाते. असे मानले जाते की अघोरी या मुलांच्या मृतदेहांचा वापर त्यांच्या तंत्र साधनेसाठी करतात. आजच्या वेळी भारतामध्ये प्रामुख्याने खालील काही ठिकाणी अघोरी आढळून येतात.

१ )तरापीठ ( पश्चिम बंगाल )

अघोरी
अघोरी-एक रहस्य

तंत्र मंत्र यासाठी बंगाल हे राज्य प्रसिध्द आहे. ज्याठिकाणी तंत्र साधना होते त्या ठिकाणी अघोरींचा उल्लेख हमखास येणारच. पश्चिम बंगाल मधील बीरभूम जिल्ह्यामध्ये येणाऱ्या तारापीठ या ठिकाणी मोठ्या संखेने अघोरी राहतात. हे ठिकाण देवी तारा साठी प्रसिध्द आहे याच देवीला अघोरी हे श्मशानतारा म्हणून संबोधतात. महाश्मशान घाटाजवळ स्थित असलेल्या या मंदिरामध्ये कालीमाताची विशाल प्रतिमा स्थापित आहे. या श्मशानाबद्दल असेही म्हणतात कि येथील अग्नी कधीही शांत होत नाही. याच ठिकाणी रात्रीला अघोरी गुप्त साधना करतात.

२ ) कामाख्या मंदिर ( आसाम )

आसामच्या गुहावटी शहरामध्ये असलेल्या कामाख्या मंदिराला अघोरी साधूंचे तंत्र साधना करण्याचे मुख्य स्थळ मानल्या जाते. हे ठिकाण भारतातील प्रमुख शक्ती पीठांपैकी एक आहे. हिंदू पुराणानुसार या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचा एक हिस्सा (गुप्तांग) पडला होता. याठिकाणी असलेल्या श्माशानामध्ये देशातील विविध भागातील अघोरी हे सिद्धी प्राप्तीसाठी येत असतात. हे मंदिर एका डोंगरावर स्थित आहे तसेच या ठिकाणी हजारो लोकं माता कामाख्याच्या दर्शनासाठी येतात.

३ ) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक ( महाराष्ट्र )

अघोरी
अघोरी-एक रहस्य

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. ज्या ठिकाणी भगवान शिव त्याठिकाणी तर अघोरी हे असणारच. तारापीठ आणि कामाख्या मंदिराच्या नंतर नाशिकचे त्र्यंबकेश्वर हे अघोरींचे सर्वात मोठे ठिकाण आहे. याठिकाणी अघोरी साधू मोठ्या संखेने आढळून येतात.

४ ) मणिकर्णिका घाट काशी ( उत्तर प्रदेश )

अघोरी
अघोरी-एक रहस्य -मणिकर्णिका घाट काशी

काशीच्या मानिकार्निका घाटाला महाश्मशानभूमी असेही म्हणतात. याठिकाणी चितेची अग्नी कधीही थंड होत नाही सकाळपासून रात्रीपर्यंत असंख्य लोकांचे याठिकाणी अंत्यसंस्कार येथे केल्या जातात. याठिकाणी अघोरींची संख्या सर्वाधिक आहे. काशी हे अघोरींसाठी विशिष्ठ स्थान आहे याचे कारण, याठिकाणी स्थित काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगा नदीचे खास ८४ घाट. ज्यापैकी अनेक रात्रीच्या वेळी अघोरींच्या तंत्र साधनेचे ठिकाण बनतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ४०० वर्षांपासून जिवंत आहे हा संत ? वाचा सविस्तर…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here