मचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव ऐकताच भारतीय राजकारणातील एक सन्मानित व्यक्ती डोळ्यासमोर उभा राहतो.

अटलजी एक मजबूत राजकारणी होते.

“लोकनेते असा नावलौकिक असलेले श्री. अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबद्धतेसाठी ओळखले जातात. 13 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाची सूत्रे स्विकारली. 1996 साली थोड्या कालावधीसाठी त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पहिले होते. पंडित नेहरुनंतर सलग दोनदा पंतप्रधान होणारे ते पहिले पंतप्रधान ठरले.

 अणुचाचणी

new google

25 डिसेंबर 1924 साली तत्कालीन ग्वालियर संस्थानातील (आताच्या मध्यप्रदेश राज्यात आहे) एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात श्री. वाजपेयी यांचा जन्म झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे.

उदारमतवादी जागतिक दृष्टीकोन व लोकशाही तत्वांशी असलेली बांधिलकी यामुळे जनसामान्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो.

श्री. वाजपेयी यांनी एक पत्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली परंतु अल्पावधीतच म्हणजेच 1951 साली भारतीय जनसंघात प्रवेश करण्यासाठी त्यांनी पत्रकारिता सोडली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्वाचा घटक असलेला भारतीय जनता पक्ष हा आधी जनसंघ म्हणून ओळखला जात होता.

समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेले श्री. वाजपेयी एक ख्यातनाम कवी आहेत. शिवाय आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून ते संगीत व पाक कलेतही विशेष रस घेतात. त्यांच्यात कठीण परिस्थितीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा होती.

आज आम्ही तुम्हाला त्यांच्या अश्याच एका निर्णयाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे संपूर्ण जग आच्छर्यचकित झाले होते.

१ मे १९९८ मध्ये  राजस्थानच्या पोखरण येथे अणुचाचणीचे सफलरित्या परीक्षण करून भारत नुक्लीयर देश बनला. ही वेळ देशासाठी सन्मानाची होती. या अणुचाचणीची सफल रित्या परीक्षण अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका धाडशी निर्णयामुळे झाले होते.

अणुचाचणी

जेव्हा १९९८ मध्ये भारत अणुबॉम्ब चाचणी करण्याच्या तयारीत होता तेव्हा यात बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. या चाचणीला थांबवण्याच्या विचाराने अमेरिकेचे सैटेलाइट लगातार फिरत होते.
अणुबॉम्ब चाचणीचे परीक्षण करणे ही त्या वेळी सोपी गोष्ट नव्हती.

अटल बिहारी वाजपेयी यांच्यासाठी हा निर्णय कठीण होऊन बसला होता. एका बाजूने अमेरिकन सैटेलाइट लगातार फिरत होते तर दुसऱ्या बाजूने विरोधी पक्षाचे नेते अणुचाचणीच्या विषयावरून अटलजींना निशाना बनवत होते.

परंतु जेव्हा विरोधी पक्षाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अटलजी संसदमध्ये उतरले तेव्हा विरोधी पक्ष एकदम गप्प झाले. त्यांनी ठणकावून सांगितले कि,हा भारत आता बदलला आहे. हा भारत आता जगासोबत हातात हात घालून चालनारा आहे.हा भारत कोणासमोर झुकणार नाही म्हणून शांती आणि सुरक्षेसाठी अणुचाचणी या हत्याराचा वापर करणार आहेत.

पोखरण मध्ये झालेल्या अणुचाचणी मिशनचे नाव ‘ऑपरेशन शक्ती” असे होते. या मिशन मध्ये महत्वाची भूमिका बजावणारे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह जॉर्ज फर्नांडीस आणि एपीजे अब्दुल कलम यांची भूमिका होती. एपीजे अब्दुल कलम त्यावेळी मंत्रालयात सल्लागार वैज्ञानिक पदावर काम करत होते.

यशस्वी अण्वस्त्र चाचणी

अणुचाचणी

११ मे १९९८ हा दिवस आधुनिक भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणून गणला जातो. कारण याच दिवशी भारताने जगाला आम्हीही काही कमी नाही हे दाखवून दिले होते. राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारताने याच दिवशी यशस्वी अणू चाचण्या केल्या होत्या. भारताच्या या गुप्त मोहिमेमुळे अमेरिकाही चकित झाली होती. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा तो क्षण होता. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अणू चाचणीच्या या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जग अवाक् झाले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ४०० वर्षांपासून जिवंत आहे हा संत ? वाचा सविस्तर…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here