आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

भागलपूर हे बिहारची राजधानी पटना पासून २२० किमी लांब नदीच्या किनारी वसलेले एक ऐतिहासिक शहर आहे.

या शहराचे हे नाव का पडले यामागे सुद्धा एक विशिष्ट कारण आहे. ‘भागदत्तपुराम” चा अर्थ आहे भाग्य (गुडलक)
या शहरात हिंदी भाषा जरी प्रामुख्याने बोलली जात असली, तरी या शहराची क्षेत्रीय भाषा ही अंगिका आहे. जगभरात जवळपास ५० मिलियन लोक या भाषेचा उपयोग करतात.

भागलपूर देशाच्या मुख्य रेशीम उत्पादकाच्या रूपाने प्रसिद्ध आहे. परंतु या शहराचा ऐतिहासिक वारसा फार मोठा आहे.

जवळपास ३५०००० लोकसंख्या असलेल्या या शहरात साखर आणि तांदळाचे अनेक कारखाने आपणास बघायला मिळतील. या शहरावर पूर्वी अंगा राजवंशाचे राज्य होते ज्याचा राजा कर्ण होता. चला तर मग जाणून घेऊया पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहराबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी.

जर तुम्हाला पौराणिक कथा आवडत असतील तर तुम्ही मंदार पर्वाताविषयी तर ऐकलेच असेल. हा पर्वत भागलपूर पासून दक्षिणेस ५२ किमी अंतरावर आहे. राक्षस आणि देवतांमध्ये जेव्हा समुद्र मंथन करण्यात आले तेव्हा याच पर्वताचा उपयोग केला गेला होता. या पर्वतावर वासुकी नावाच्या सापाला बांधून समुद्र मंथन केले गेले होते. ज्यात अमृताची प्राप्ती झाली होती.

भागलपुरात अनेक महत्वाचे ठिकाणे आहेत. त्यातील काही मुख्य ठिकाणांचा थोडक्यात आढावा…

विक्रमशीला.

भागलपूर

बिहारचा गौरव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वविद्यालय विक्रमशीला हे भागलपूरपासून ३८ किमी अंतरावर आहे. या ठिकानचा बौधिक इतिहास फार मोठा आहे. इतिहासातील जे आकर्षक अवशेष कुठेही मिळण्यास मुश्कील आहेत, ते या ठिकाणी उपलब्ध आहेत.

विद्वानांना आजसुद्धा विक्रमशीला खूप आकर्षित करते. या ठिकाणाची खास गोष्ट ही आहे कि, येथे दरवर्षी विक्रमशीला महोत्सव आयोजित केला जातो. ज्यात गंगा नदीवर होड्यांची शर्यत असते. हा नजरा पाहण्यासाठी दूरवरून लाखो लोक फेब्रुवारी मध्ये या ठिकाणी येत असतात.

कोलगंज रॉक कट मंदिर:

भागलपूर

कोलगज मंदिर हे सहाव्या शतकातील गुप्त राजवंशाच्या काळातील मंदिर आहे. या मंदिराला दगडांना कोरून बनवण्यात आले आहे. जे दिसायला अतिशय मोहक आणि सुंदर दिसते. या मंदिराचे मुख्य आकर्षण बौद्ध, जैन आणि हिंदू देवी देवतांच्या मूर्तींचा संग्रहकेंद्र आहे.

प्राचीन भारताच्या दगडांना कापून बनवलेल्या वास्तू आणि त्यावरील नक्षीकाम याचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी हे मंदिर आकर्षण आहे.

सुल्तानगंज :

भागलपूरपासून २५ किमी लांब गंगा नदी आहे जेथे स्थित आहे सुल्तानगंज. सुल्तानगंज ते देवघर ८० किमीचे अंतर आहे.

कुप्पा घाट :

भागलपूर

कुप्पा म्हणजे गुहा.. कुप्पा घाटावर महर्षी मेही ने अनेक दिवस “योग ऑफ इनर साउंड” चा अभ्यास केला होता. आज याच गुहेला मोठ्या आश्रमाचे रूप देण्यात आले आहे. या ठिकाणी बागा, यांसोबतच नक्षीकाम यांसारखी पौराणिक महत्वची असलेल्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत.

या आश्रमात एक गुप्त मार्ग सुद्धा आहे जो अनेक ठिकाणापर्यंत जातो. शांतीमय वातावरण असलेल्या या आश्रमात अनेक लोक नेहमी येत असतात. खास करून गुरुपोर्णिमा सारख्या सणाच्या दिवशी या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते.

खनकाह ए शाहबजिया:

भागलपूर

खनकाह ए शाहबजिया ही मस्जिद गेल्या अनेक वर्षापासून लोकांचे आकर्षण बनली आहे. भागलपूर स्टेशनजवळ असेलल्या या शानदार जागेला भेट देण्यासाठीअनेक धर्म आणि जातीचे लोक नेहमी येत असतात. या मोठ्या मस्जिदची निर्मिती औरंगजेबाने केली होती.

अल्लाहच्या ४० सुफिया मधील ही मस्जिद सुद्धा एक आहे. प्रत्येक गुरवारी या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी होते. या ठिकाणी असलेल्या तलावातील पाण्याला औषधीगुणयुक्त समजले जाते. हे अनेक छोट्या मोठ्या रोगांपासून मुक्तता देण्यास उपयुक्य आहे असा लोकांचा समज आहे.

एवढच नाही तर साप चावलेल्या व्यक्तीला जर या तलावातील पाणी दिले तर तो सुद्धा वाचल्या जातो असा समज आहे.या जागेमध्ये भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणात अनेक वर्ष जुन्या पांडूलिपी सापडल्या होत्या.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ४०० वर्षांपासून जिवंत आहे हा संत ? वाचा सविस्तर…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here