आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

सध्या अनेकांच्या मनात काम करताना तणाव निर्मान होतो.

कामाचा तणाव, ईतर तणाव या सर्वामुळे तुमच्या रोजच्या जीवनावर पारिणाम होत असतो. कोरोना सारख्या महामारीमुळे जवळपास बऱ्याच लोकांचे काम हातातून गेले असल्यामुळे ते सुद्धा या स्थितीत तणावातून जात आहेत.

आज आम्ही तुम्हाला अश्याच काही टिप्स देणार आहोत ज्या तुम्हाला या काळात तणावमुक्त राहण्यासाठी नक्कीच मदत करतील.

काम करतांना आंनदी राहून काम करणे फार गरजेचे असते. यासाठी सर्वांत महत्वाचा आणि चांगला मार्ग हाच आहे की आपल्या मनाला या दरम्यान शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

 तणाव

स्वतःची मनःस्तिथी अशी करा की तुम्हाला कामात 100% द्यायचे आहेत, त्याचे यश हे देवाच्या हाती असतील. त्यामुळे माझ्यासोबत तेच होईल, जे देवाच्या मनात असेल. तुमची मेहनत व चिकाटी पाहून देव नक्कीच त्या कामात तुम्हाला यश देईल, याबद्दल कोणालाही शंका नसेल..

कामाच्या वेळात सुद्धा घरच्यांसोबतचे संबध सांभाळा..

तणाव

अनेक वेळा असे होते की, जास्त कामाच्या वेळी तुम्ही तुमच्या पारिवारातील सदस्यांना वेळ देऊ शकत नाहीत.  सध्या तर घरातून काम असल्यामुळे सुद्धा बरेच जण दिवसभर लॅपटॉप समोर काम करत असतात अश्या वेळी तुमच्या घरातील सदस्यांना तुम्ही तेवढा वेळ नाही देऊ शकत ज्यामुळे तुमच्यातील दुरावा वाढून ह्या गोष्टी तुम्हाला तणावदायक वाटू शकतात.

शक्य तेवढे आपल्या प्रियजनांसोबत संवाद साधत राहा, ज्यामुळे तुम्हाला काम करण्यात सुद्धा मदत होईल.

प्रत्येक वेळी हो म्हणणे सुद्धा तणावाचे कारण बनू शकते.

जर तुमच्यावर अगोदरच ऑफिसच्या कामाच्या अनेक जीम्मेदाऱ्या आहेत. तरी तुम्हाला आजून कोणतेतरी नवीन काम आणि ते पूर्ण करण्याची जिम्मेदारी दिली जात असेल तर अश्या वेळी तुम्हाला तुमच्या उच्च अधिकाऱ्यांना याविषयी सांगायला हवे.

बऱ्याच वेळा नोकरी जाण्याच्या भीतीने काही लोक देतील तेवढी कामे हो म्हणून घेतली जातात. आणि मग ती वेळेवर नाही होत आली तर तुम्ही तणावात जाता. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.

ऑफिसमधील सहकार्यासोबत मैत्रीपूर्वक संबंध जोपासा..

तणाव

लॉकडाऊन दरम्यान अनेक ऑफिस सुरु झाले असले तरी सर्व जण निश्चितच कोरोनाच्या भीतीमुळे एकटे एकटे राहत आहेत. अश्या वेळी आपल्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी बातचीत करा. ऑफिस मधील वातावरण चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले वर्तन करणे फार गरजेचे असते.

ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसोबत जेवण..

सोशल डिस्टंसिंग पाळत असताना तुम्हाला ऑफिसमध्ये सुद्धा काळजी घेने गरजेचे आहे.  परंतु याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही एकटे वेगवेगळे जेवण करा. सोशल डिस्टंसिंग पाळत तुम्ही आपल्या सहकाऱ्यांसोबत बसून जेवणाचा आनंद घ्या या दरम्यान आपल्या सहकाऱ्यांशी  आपुलकीने संवाद साधा. याचा फायदा नक्कीच
सहकाऱ्यांच्या मनात असलेली भीती कमी होण्यासाठी होईल. आणि तुम्ही सुद्धा तणाव फ्री व्हाल.

तर ह्या होत्या काही टिप्स ज्या लॉकडाऊन दरम्यान कामाच्या वेळेत तुम्हाला तणावापासून दर ठेवण्यात मदत करतील. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ४०० वर्षांपासून जिवंत आहे हा संत ? वाचा सविस्तर…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here