आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब
===
हे होते महाभारतातील सर्वांत शक्तिशाली योद्धे जे अत्यंत शक्तिशाली होते.
भारताच्या मुख्य प्राचीन ग्रंथामधील एक असलेल्या महाभारतातील युद्ध हे एक सर्वांत मोठे युद्ध होते. आणि तेच युद्ध आता एक ऐतिहासिक गाथा म्हणून आपल्या सर्वासमोर महाभारत ग्रंथ आहे.
युद्ध, राजनीती, धर्म, अधर्म या सर्व तत्वांचा उल्लेख असलेला महाभारत ग्रंथ हा प्राचीन ग्रंथातील सर्वांत मोठा ठेवा आहे.
महाभारताच्या कौरव विरुद्ध पांडव या महाभयंकर युद्धात अनेक शूरवीर योद्ध्यांनी आपले युद्ध कौशल्य दाखवुन दिले होते. यातील काही योद्धे हे इतके महापराक्रमी होते की, यातील एकएक योद्धा संपूर्ण श्रुष्टिवर विजय मिळवण्याची ताकत सांभाळून होता.
एवढंच नही तर जगातील सर्वांत शक्तिशाली हत्यारांचा वापर सुद्धा याच युद्धात केला गेला होता.नक्कीच आपल्या मनात हा प्रश्न असेलच की एवढ्या शक्तिशाली योद्ध्यांमध्ये सर्वांत शक्तिशाली कोण होते?
तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत.
चला तर मग जाणून घेऊया महाभारताच्या शक्तिशाली योध्यांमध्ये सर्वांत शक्तीशाली कोण होते?
दुर्योधन:

सर्वात अगोदर बोलूया दुर्योधन विषयी.. कौरवांतील सर्वांत मोठा भाऊ असलेला दुर्योधन हा एक शक्तिशाली योद्धा होता. जो गदा चालवण्यामध्ये महारथी होता. त्यावेळी गदा चालवणाऱ्यांमध्ये दूर्योधन सर्वशक्तिशाली होता.
दुर्योधन जवळ शारीरिक शक्ती मोठ्या प्रमाणात होती. ज्यामुळे छोट्या मोठ्या जखमांनी त्याला काहीही फरक पडत नसे. असंही म्हटले जाते की दुर्योधनमध्ये जवळपास 1000 लोकांचा सामना करू शकेल एवढी शक्ती होती. दुर्योधनाला युद्ध कलेचे ज्ञान गुरु द्रोणाचार्य आणि गुरु कृपाचार्य यांनी दिले होते. आणि गदा चालवण्याची कळलं दुर्योधनला बलराम तानी शिकवली होती.
पितामह भीष्म:
पितामह भीष्म यांना पराजित करणे जवळपास सर्वासाठी अशक्यच होते. कारण त्यांना इच्छामृत्यूचे वरदान प्राप्त होते. युद्धाचे पहिले 10 दिवस भीष्म यांनी कौरव सैनेचे नेतृत्व केले होते.त्यांचे 10 दिवसाचे युद्ध कौशल्य पाहून पांडव समजून गेले होते की त्यांना पराजित करणे सोपे नाही.
भीष्म यांनी महाबली परशुराम यांना सुद्धा पराजित केले होते जे स्वतः श्रीविष्णू यांचे अवतार समजले जायचे.
10 दिवस होऊन पण युद्धात भीष्म यांना हरवता येत नाही हे पाहून श्रीकृष्ण यांच्या सांगन्यावरून अर्जुन ने श्रीखंडी ला समोर करून भीष्म यांच्यावर अनेक बाण चालवले आणि ते युद्धभूमीत पडले. युद्धाच्या शेवटी भीष्म यांनी स्वतः आपल्या इच्छेने मृत्यू स्वीकारला होता.
कर्ण :
दानशूर असलेला कर्ण हा महाभारतातील एक शक्तीशक्ती योद्धा होता. त्याच्याकडे असलेले कवच आणि कुंडले जोपर्यंत त्याच्याजवळ आहेत तोपर्यंत त्याला कोणीही पराजित करू शकत नाही. हे श्रीकृष्ण चांगले जाणून होते.
म्हणूनच कपट करून कर्णाचे कवच आणि कुंडले काढून घेण्यात आले. तरी सुद्धा कर्नाला युद्धात हरवने अशक्य होते. जेव्हा कर्णाच्या रथाचे चाक खड्डयात फसले तेव्हा अर्जुनाने त्यावर बाण चालवून कर्णाचा वध केला.
कर्नाला वर मिळाला होता की, त्याच्या कवच आणि कुंडलाना कोणतेही अस्त्र भेदून जाऊ शकत नसे. कर्णाने युद्धात नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर यांणा सुद्धा हरवले होते. परंतु कुंतीला दिलेल्या वचनाप्रमाणे कर्ण फक्त अर्जुनचा वध करणार होता म्हणून त्याने त्यांना सोडून दिले.
द्रोणाचार्य :
द्रोणाचार्य हे सुद्धा भीष्म यांच्यासारखेच महापराक्रमी होते. त्यांनी कौरव आणि पांडव या दोघांनाही युद्ध नीती आणि राजनीतीची शिक्षा दिली होती. द्रोणाचार्य यांच्याजवळ सर्व शश्त्राचे उत्तर होते. त्यांच्याकडे पशुपअस्त्र, ब्रह्मास्त्र यांसारखे महाविध्वंसक अस्त्र होते. युद्धात गुरु द्रोणाचार्य यांनी पराजित करणे शक्य नव्हते.
तेव्हा श्रीकृष्णाने भीमला सांगून अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारले आणि सर्व रनभूमीत अश्वत्थामा मारल्या गेल्याची अफवा पसरवली. हे ऐकून द्रोणाचार्य यांनी शस्त्र त्याग केला.आणि द्रोणाचार्य यांचा वध झाला.
श्रीकृष्ण :
महाभारताचे सर्वांत शक्तिशाली योद्धा श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे अवतार होते. महाभारतात एकसुद्धा हत्यार न वापरता सामील झालेले श्रीकुष्ण एकमेव योद्धा होते.
श्रीकृष्ण यांच्या युद्धनीतीमुळेच पांडव कौरव सैनेतील एवढ्या महापराक्रमी योध्यांना पराजित करू शकले. जर श्रीकृष्ण यांनी हत्यार उचलेल असते तर एकाच दिवसात आपल्या सुदर्शन चक्राने कौरव सैनेचा विनाश करून युद्ध संपवले असते.
कारण श्रीकृष्ण यांच्यासमोर कोणताही योद्धा अमर नव्हता. महाभारतात कृष्णने अर्जुनाला आपले विराट रुप दाखवले होते. सोबतच कृष्ण यांनी हे सुद्धा म्हटले होते की जेव्हा जेव्हा धर्तीवर अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा ते अवतार घेऊन अधर्मीयांचा विनाश करत राहतील.
हे होते महाभारतातील अतिशय शक्तीशाली योद्धे ज्यांनी आपल्या ताकतीचा जोरावर रनभुमीत हाहाकार माजवला होता.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते.