आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब
===
सोन्यापेक्षा महाग विकल्या जातेय हे पनीर, पहा काय आहे खासियत…!
पनीर चा उपयोग प्रत्येक घरात केला जातो. आपल्या सर्वाना माहिती आहे कि पनीर हे गाय, म्हैस आणि बकरीच्या दुधापासून बनवले जाते. अनेक पोषक तत्वे जसे कि कैलशियम, आयरन, मैग्नीशियम आणि जिंक दुधामध्ये असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषक असतात.
परंतु युरोप मधील सर्बिया या देशातील पनीर सर्वांत महाग विकल्या जातो. याची खास गोष्ट ही आहे कि हे पनीर बनवण्यासाठी गाढवांच्या दुधाचा उपयोग केला जातो.
या पनीरची किंमत एवढी जास्त आहे कि थोडक्यात तुम्ही सोन्याच्या भावाने पनीर खरेदी करताय असच तुम्हाला वाटेल. होय तुम्हाला वाचून आच्छर्य वाटेल परंतु सर्बिया मधील हे पनीर जवळजवळ ७८००० रु प्रती किलो ने विकल्या जाते.
जगातील हे सर्वात महाग पनीर समजल्या जाते. जे युरोपीय देश सर्बियामधील एका फार्महाउस मध्ये बनवल्या जाते. या पनीरचे उत्पादन सुद्धा फार कमी होते म्हणूनच याला दुर्लभ पनीर सुद्धा सजले जाते.
हे पनीर बनवण्यासाठी गाढवाच्या एका विशिष्ट जातीच्या दुधाचा वापर केला जातो.
किंमत ७८००० रु प्रती किलो.
दुधापासून तयार होनाऱ्या उत्पादनापैकी एक महत्वपूर्ण उत्पादन म्हणजे पनीर.आपल्या इकडे गाय- म्हैस यांच्या दुधापासून बनवल्या गेलेल्या पानिराला ३००/६०० रु प्रती किलो भाव मिळतो परंतु तुम्ही हे वाचून हैराण व्हाल कि सर्बियातील गाढवाच्या दुधापासून बनवल्या गेलेल्या पानिराला तब्बल ७८००० रु प्रती किलो एवढा भाव आहे. एवढ्या जास्त भावाने विकल्या जाणारे हे जगातील पहिले पनीर आहे.
या गाढवीणच्या दुधाचे पनीर सुद्धा सर्बियात अत्यंत कमी प्रमाणत उपलब्ध आहे. परंतु बाजारात याची मागणी उत्पादनापेक्षा जास्त असल्यामुळे हे पनीर एवढा भाव देऊन जाते.
का आहे एवढे महाग हे पनीर ?
या पानिरात असलेल्या खास गुणांमुळे या पनीरची किंमत एवढी महाग आहे. जगात याची डिमांड यामुळेच आहे कि गाय आणि म्हशीपासून बनवलेल्या पनिरापेक्षा या पनिरात काही विशिष्ट गुणधर्म सापडतात.
सर्वांत महत्वाच म्हणजे जगातील मोजक्याच देशात गाढवीनीच्या दुधापासून पनीर निर्मिती केली जाते. या पानिराला खरेदी करणारे जास्त करून विदेशी पर्यटक असतात. एवढच नाही तर सर्बियातील फार्म हाउस मध्ये गाढवीनीच्या दुधापासून साबण आणि दारू सुद्धा बनवली जाते.
हा फार्म हाउस उत्तर सर्बियामध्ये आहे जेथे मोठ्या प्रमाणत गाढवांचे पालन केले जाते. गाढवीनीच्या दुधाचे पनीर याच ठिकाणी बनवले जाते. या फार्म हाऊसचे नाव आहे जैसाविका.
उत्तर सर्बिया च्या या फार्म हाउसमध्ये जवळपास २०० पेक्षाही जास्त गाढवांचे पालन केले जाते. भारतातील जर्शी गाय एका दिवसात ३० लिटर दुध देण्याची क्षमता सुद्धा ठेवतात परंतु एक गाढवीन एक लिटर दुध सुद्धा मोठ्या मुश्किलीने देऊ शकेल.
म्हणूनच या फार्म हाउसमधील सर्व गाढवांचे दुध मिळून सुद्धा फार फार १५ / २० लिटर दुध देत असतील. ज्यातून १०/१२ किली पनीरची निर्मिती शक्य आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्वच गाढवीनीच्या दुधापासून पनीरची निर्मिती होत नाही.
बाल्कन प्रजातीचे जे गाढव आहेत त्यांच्याच दुधापासून या पनीरची निर्मिती केली जाते. कारण फक्त त्यात प्रजातीच्या गाढविणीचे दुध सर्वांत पौष्टिक मानले जाते. या प्रजातीचे गाढव जास्त करून सर्बिया आणि मोन्टेनेग्रो मध्ये पाहायला मिळतात.
या बिमारीवर गुणकारी आहे हे पनीर..
सर्बियातील पनीर उत्पादकांच्या मते गाढवीण आणि महिलांच्या दुधात एक सारखेच गुणधर्म असतात. शिवाय त्यात अनेक प्राक्रचे पौष्टिक गुणधर्म सुद्धा मिळतात.
जर अस्थमा आणि ब्रोंकाइटीसिड या आजारांचे रोगींना जर हे पनीर खायला दिले तर त्यांना याचा खूप लाभ होतो.तर दुसरीकडे अनेक लोकांना गायीच्या दुधापासून बनवलेल्या पनीरची एलर्जी असतेते गाढविणीचे दुध अथवा पनीरचा वापर करू शकतात.
उत्पादकांच्या मते या पनीरचे उत्पादन जरी फार कमी असेल तरी सुद्धा अनेक लोक पनीर खरेदी साठी अगोदरच ऑर्डर देऊ ठेवतात. यामुळेच या पनीरच भाव हा सोन्यापेक्षाही महाग होत चालला आहे.
२०१२ मध्ये सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचयाच्याबद्दल सुद्धा म्हटले जाऊ लागले कितो या पनीरचा वापर आपल्या जेवणात करतो. परंतु मोठ्या चर्चेनंतर जोकीवीचने या गोष्टीचे खंडन केले होते.
सद्यस्थितीला सर्बियात अनेक ठिकाणी गाढवीनीच्या दुधापासून पनीरची निर्मिती करण्याचे काम सुरु आहे. आणि दिवसेंदिवस या पनीरची किंमत ही वाढतच चालली आहे हे विशेष..
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते.