आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

चीन मध्ये बऱ्याच दिवसांपासून उइगर मुस्लीम समुदायावर तेथील सरकारकडून अत्याचार करण्यात येत आहे.

चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये ७० टक्के उइगर मुस्लिमांची लोकसंख्या आहे असे असूनही स्थानिक प्रशासन त्यांच्यासोबत अतिशय हिनपनाची वागणूक करत आहे.

आता तर सरकारने शिनजियांग प्रांतातील एक मशिद पाडून त्याजागी सार्वजनिक शौचालय बनवले आहे. तशी ही घटना पहिली नाही आहे यापूर्वी पण २०१९ मध्ये शिनजियांग प्रांतातील अजना मशिद उद्वस्त करून त्याठिकाणी एक स्टोअर ची निर्मिती करण्यात आली होती. ज्याठिकाणी आज दारू आणि सिगारेट विक्री केली जात आहे. त्याच प्रमाणे होतन शहरातील एक मशिद पाडून त्याजागी कपड्याचा कारखाना टाकण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून चालू आहेत.

एका अहवालानुसार चीनमध्ये मागील ३ वर्षात उइगर लोकांच्या १० ते १५ हजार मशिदी उद्वस्त करण्यात आल्या आहेत. किंबहुना बऱ्याच लोकांना याबद्दल माहित नसेल, आज आपण जाणून घेऊया कोण आहेत हे उइगर मुसलमान आणि चीन सरकार यांच्यावर का अत्याचार करत आहे याबद्दल. वाचा सविस्तर…!

उइगर मुसलमानांचा इतिहास:

चीन

काही इतिहासकारांच्या मते उइगर  मुसलमानांचा संबंध मंगोलियाच्या ९००० वर्ष जुन्या उईगर खगनाट या जातीशी आहे. त्याच प्रमाणे काही लोकांच्या मते यांचा इतिहास हा ८-९ व्या शताब्दीचा असल्याचे सांगतात. याठीकानीच्या काही दगडी लेण्यामध्ये तसेच डोंगरांमध्ये दगडांवर उईगर जातीच्या राजाची कलाकृती बनलेली आहे. यावरून यांचे अस्तित्व हे खूप वर्षांपासून आहे हे सिध्द होते.

इस्लाम मानणारे उइगर समुदायाचे लोकं हे प्रामुख्याने चीनच्या पश्चिमेकडील सर्वात मोठ्या शिनजियांग या प्रांतामध्ये राहतात. या प्रदेशाची सीमा ही मंगोलिया आणि रशिया समवेत अन्य ८ देशासोबत लागते. उइगर मुस्लिमांची जनसंख्या या भागात १ कोटीहून अधिक आहे.

एकेकाळी यांची गणना बहुसंख्याक म्हणून केली जायची, परंतु आजच्या वेळी या परिसरात चीनी समुदाय हान यांची जनसंख्या वाढल्याने आणि याठिकाणी चीनी सैन्य तैनात झाल्याने परिस्थिती फार बदलली आहे. तुर्क जातीचे उईगर मुस्लीम हे अफगानिस्तान आणि कजाकिस्तान च्या काही भागातही आढळतात.

चीनमधील उइगर मुस्लिमांची आजची परिस्थिती:

चीनमधील अधिकांश लोकं हे नास्तिक आहेत ज्यांचा मुख्यतः कोणत्याही धर्माशी संबंध नाही. त्यामुळेच चीन सरकार या प्रदेशातील उइगर मुस्लिमांची  लोकसंख्या कमी करण्यात गुंतले आहे. एवढेच नव्हे तर चीनच्या हान जातीच्या लोकांनी शीनजियांगमध्ये स्थायिक होण्यास सुरवात केली आहे.

चीनच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या देशात इस्लाममध्ये लोकांची रुची वाढत आहे. ज्यामुळे त्यांच्या देशात दहशतवाद वाढण्याची शक्यता आहे. म्हणून येथे मुसलमानांना नमाज, प्रार्थना केल्याबद्दल आणि मुस्लीम धर्माशी संबंधित कोणतेही धार्मिक कार्य केल्यावर कठोर शिक्षा दिली जात आहे. तसेच येथे रोजा ठेवण्यास आणि इस्लामी पेहराव वापरण्यासही सरकारकडून बंधी घालण्यात आली आहे.

चीनचा असा विश्वास आहे की काही दहशतवादी संघटना ह्या चीनमध्ये आपले पाय मुळे पसरवत आहेत त्यांच्याकडून देशात दहशतवाद पसरविण्याचा धोका आहे. म्हणूनच या सर्व परिस्थितींचा सामना करण्यासाठी चीन सरकार इतके कठोर निर्बंध लावत आहे. चीनमध्ये कोणतीही व्यक्ती आपल्या मुलाचे नाव मुस्लिम धर्माशी संबंधित ठेवू शकत नाही. ही गोष्ठ खूपच वाईट आहे.

उइगर  मुस्लिमांवर अत्याचार :

चीन

चीनमध्ये राहणाऱ्या मुसलमान लोकांचे म्हणणे आहे कि, चीनी सरकार आता त्यांच्या स्वातंत्र्याच्या अधिकरालाही हिसकाऊ पाहत आहे. चीनी अधिकाऱ्यांनी मुस्लिमांना कुराण आणि चटई (ज्यावर बसून अल्लाहची प्रार्थना केली जाते) यांना सरकारकडे जमा करण्याचा आदेश दिला आहे.

तसेच यासाठी जर कोणी नकार दिला तर त्या व्यक्तीला कठोर दंड देण्यात येत आहे. तसेच त्यांच्याकडून खरेदी करण्यात आलेल्या मालाची तपासणी करणे देखील आवश्यक आहे. एवढेच नाही तर उइगर  मुस्लिमांना बाहेर कुठे फिरण्यासाठी जायचे असेल तर सर्वप्रथम सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. त्यांना परवानगी द्यायची कि नाही हे सरकारच्या मनावर असते.

चीनी सरकार उइगर मुस्लिमांच्या वार्षिक कामाच्या आधारे याबद्दल निर्णय घेते. एवढेच नव्हे तर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने वर्षभर त्यांच्यावर नजर ठेवली जाते आणि थोडासा जरी संशय आला तर त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात येते.

उइगर  मुस्लीम आणि हान चीनी यांच्यात झालेल्या हिंसक चकमकी:

चीन

चीनच्या डाव्या विचारसरणीच्या सरकारच्या भूमिकेमुळे या प्रदेशात हान चिनी आणि उइगर  मुस्लीम यांच्यात संघर्ष होण्याच्या बातम्या नेहमीच ऐकण्यास मिळत आहेत.

२००८ मध्ये शिनजियांग प्रदेशाची राजधानी उरुमची मध्ये झालेल्या हिंसाचारात २०० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता ज्यामध्ये अधिकांश लोकं हे हान चीनी जातीचे होते.

याचप्रमाणे २००९ मध्ये उरुमची मधेच पुन्हा घडलेल्या दंगलींमध्ये १५६ उइगर  मुस्लीम मारल्या गेले होते. याघटनेची तुर्कीने निंदा करून घटनेला नरसंहार म्हणून संबोधले होते.

तसेच २०१३ मध्ये आंदोलन करणाऱ्या २७ उइगर मुस्लिमांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. २०१६ मध्ये बीजिंग मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणीही उइगर  मुस्लिमांवर आरोप ठेवण्यात आले.

ही तर ती प्रकरने आहेत जी विदेशी मिडीयाच्या सक्रियतेमुळे जगासमोर आले आहेत अन्यथा अशी शेकडो प्रकरने  चीनी सरकारकडून दडपवण्यात येतात.

भारतामध्ये एखादी घटना घडली तरी चमचेगिरी करणारे अनेक शेजारी राष्ट्र चीनच्या या व्यवहाराबद्दल काहीही बोलण्यास धजावत नाहीत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  या कारणामुळे चीनी वस्तू एकदम स्वस्त असतात…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here