आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

तिरूपती बालाजीच्या ह्या 8 रहस्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?


दक्षिण भारतात अनेक आकर्षक मंदिरे आहेत.जे त्यांच्या त्यांच्या विशेषतेमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. या मंदिरांची बनावट, सजावट आणि आकृती अशी आहे की येथे येणाऱ्या प्रत्येकाला एक वेगळी  ऊर्जा मिळते.

या सर्व मंदिरांपैकी एक मंदिर आहे ते म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर जो फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.

भारतीय प्राचीन वास्तुकला आणि शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आंध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात स्थित असलेले तिरुपती बालाजी मंदिर हे एक अतिशय भव्य मंदिर आहे जेथे भक्तांची मोठ्या प्रमाणात वर्दळ नेहमी सुरु असते. भारताच्या मुख्य हिंदू तीर्थस्थळांपैकी एक तिरुपती बालाजी मंदिर सुद्धा आहे.

new google

तिरूपती बालाजी

मंदिराचे खरे नाव व्यंकटेश मंदिर असे आहे. कारण येथे भगवान व्यंकटेश विराजमान आहेत. आणि भगवान व्यंकटेश स्वतः भगवान विष्णूंचे अवतार आहेत.

प्राचीन मंदिर तिरुपती पहाडीच्या सातव्या दगडावर वेंकटचला स्थापित आहे. असेही म्हटले जाते की वेंकट पहाडीचे स्वामित्व व्यंकटेश त्यांचाकडे असल्यामुळे भगवान विष्णुंना व्यंकटेश असे नामकरण करण्यात आले आहे.

तिरुपती बालाजीच्या मंदिराची शिल्पकला अद्भुत आहेच शिवाय या मंदिराविषयी अश्या काही आश्चर्यकारक रहस्य आणि तथ्य आहेत जे या मंदिराला इतर मंदिरांपेक्षा वेगळे बनवतात.

चला तर मग जाणून घेऊया काय आहे या मंदिराचे रहस्य जे या मंदिराला अलौकिक बनवतात.

मूर्तीची स्थिती:

तिरुपती बालाजी

जेव्हा तुम्ही मंदिरात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला वाटते की भगवान व्यंकटेश यांची मूर्ती मंदिराच्या गर्भाशयात मध्यभागी स्थित आहे. तुम्ही दर्शन वगैरे घेऊन जसे गर्भाशयाच्या बाहेर येता तर अचंबित होऊन जाता कारण बाहेर आल्यानंतर असे दिसती की जसे भगवान व्यंकटेश यांची मूर्ती डाव्या बाजूला स्थित आहे.

याबाबत रोचक माहिती ही आहे की, मंदिरात मूर्ती अश्या पद्धतीने बसवण्यात आली आहे की मंदिरात येणाऱ्या सर्वांना मूर्ती एकसारखी दिसायला हवी. तर मग साहजिकच प्रश्न पडतो की बाहेर आल्यानंतर मुर्ती डाव्या बाजूला का वाटते?
आता हे सर्व भक्तांचा भ्रम आहे का व्यंकटेश्वरांची लीला याचा शोध आजपर्यंत कोणीही लावू शकले नाहीये.

महिला आणि पुरुष दोघांचे वस्त्र पारिधान करतात व्यंकटेश.

असं मानले जाते की व्यंकटेश यांच्या या रूपात माता लक्ष्मी सुद्धा आहे. यामुळेच मूर्तीला स्त्री आणि पुरुष दोघांचे वस्त्र परिधान करण्याची परंपरा आहे. व्यंकटेशाचे हे देखणे रुप पाहण्यास लाखो भक्त याठिकाणी येत असतात.

बालाजी यांच्या मूर्तीला येतो घाम..

मंदिरात भगवान बालाजी यांची खूप आकर्षक अशी मूर्ती आहे ही मूर्ती एका विशिष्ट प्रकारच्या दगडापासून बनवली गेली आहे. परंतु ही मूर्ती एवढी जिवंत वाटते की जसे भगवान व्यंकटेश स्वतः तेथे विराजमान आहेत.

असे अनेक वेळा म्हटले गेले आहे की बालाजीच्या मूर्तीला घाम येतो. घामाचे थेंब मूर्तीवर दिसू नये यामुळे मंदिराचे तापमान कमी ठेवण्यात येते.

बालाजी यांचे अनोखे गाव :

तिरूपती बालाजी

व्यंकटेश्वर स्वामी मंदिरापासून 23 किमी दूर एक असे गाव आहे जेथे गाववाल्यांशिवाय अन्य बाहेरील व्यक्ती प्रवेश करू शकत नाही. येथील लोक खूप अनुशासक आहेत आणि नियमांचे पालन करणारे आहेत. मंदिरात चढवले जाणारे पदार्थ जसे की फुल, फळ, अगरबत्ती, दूध, दही सर्वकाही याच गावातून येते.

प्रत्येक गुरुवारी बालाजीच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावल्या जातो. लेप लावल्यानंतर अदभूत रहस्य समोर येते. लेप लावून दुधाने अंघोळ घातल्यानंतर देवाच्या छातीवर चंदनाच्या लेपाने माता लक्ष्मीची प्रतिकृती दिसून येते.

मंदिरातील कधीही न विजणारा दिवा:

श्री व्यंकटेश स्वामी यांच्या मंदिरात एक दिवा नेहमी तेवत असतो. जो कधीही कोणत्याही कारनाने विजल्या जात नाही.
आश्चर्यकारक बाबा तर ही आहे की या दिव्यात कधीही तेल अथवा तूप टाकले जात नाही. एवढंच नाही तर कुणालाही हे सुद्धा माहिती नाही की या दिव्याला सर्वात अगोदर कोणी आणि केव्हा प्रज्वलित केले होते.

खरे आहेत बालाजी यांचे केस.

तिरुपती बालाजी

असं म्हटले जाते की भगवान बालाजी यांचे केस खरे आहेत. जे केव्हाही ना गुंतता नेहमी मुलायम राहतात. हे एक कोडंच आहे की एका मूर्तीवर असलेले केस खरे कसेकाय असू शकतात.

मंदिरात ठेवलेली अदभूत काठी.

मंदिराच्या डाव्या बाजूला एक काठी ठेवलेली असते. ही ती काठी आहे जेव्हा लहानपनी याच छडीने बालाजी यांना मारण्यात आले होते.
यादरम्यान याच काठीने बालाजीच्या माथ्यावर मार लागला होता, ज्यावर चंदनाचा लेप लावण्यात आला होता. याच कारणामुळे आज सुद्धा बालाजीच्या मूर्तीवर चंदनाचा लेप लावल्या जातो

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. पळून गेलेल्या प्रेमी जोडप्यांसाठी वरदान ठरणारे महादेव मंदिर ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here